Skip to main content

संस्कृती

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 20/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृती जाहली मरणप्राय जगवणारी तुरळक गणती मेली संस्कृती केंव्हाच सर्वत्र जाहिरात होती ll १ ll संपली, काळवंडली संस्कृती उजळवणारी तजवीज थोडी गाडून टाकणारी तिजला गर्दी संपत नव्हती ll २ ll जमवाया लोक जागृतीस मित्रास कळविला मोर्चा बघू उद्या म्हणाला दुरूनच हात केला ll ३ ll दुष्परिणाम कथित प्रगतीचे तुडवीत संस्कृती होते मात्र लोकांना याचे अप्रूप काहीच नव्हते ll ४ ll रक्षणास बोलावता आले उपायास नव्हते विकृतीचे बसता फटके ते मोर्चात सामील होते ll ५ ll
लेखनविषय:

वाचने 678
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया