सर्पमित्र
शप्पत, जॅक डी ची थट्टा करण्यासाठी नाही लिहीलेलं, बरंच आधी लिहीलेलं आज आठवलं,
**********
" तुमच्या ऑफीसला मघापासून फोन करतेय, कुणीच उचलत नाहीये "
" त्या तुम्ही होतात होय ? मला वाटलं परत कुणीतरी मस्करी करतंय, हल्ली लोकांना काही सिरीयसनेसच राहीला नाही. म्हणे "मी मुंगूस बोलतोय मला सापाची भीती वाटतेय", काय पण.. "
" बरोबर आहे मुंगूसच बोलत होता फोनवरून "
" म्हणजे त्या तुम्ही होतात ? आणि वर तोंड करून परत ऑफीसला येऊन मस्करी करताय ? हे पहा, हे एका सेवाभावी संस्थेचं ऑफीस आहे, टाईमपास कसला करताय.."
" ऐकून तर घ्या, आमचं आडनांव मुंगूस, मघाशी फोनवर बोलत होता तो माझा नवरा.."
" मुंगूस असून सापाला घाबरता ? "
" तुमचं आडनांव काय ? "
" मानकापे.. "
" किती मुंडकी छाटलीत आजवर ? "
" भावना पोचल्या, सांगा साप कुठाय ते .."
" ते सांगते हो पण तुमची हत्यारं कुठायत ?"
" कसली हत्यारं ? मी सर्पमित्र आहे शत्रू नाही.. "
" नाही म्हणजे पुंगी वगैरे.."
" मी गारूडी वाटलो का तुम्हाला ? माझ्याकडे पुंगी नाही "
" कमाल आहे, असूदे हे घ्या गाजर "
" हे कशाला ? "
" याची पुंगी करून वाजवा ना ! "
" पण ही वाजेल का ? "
" नाही वाजली तर मोडून खाऊन टाका, `गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहितर मोडून खाल्ली' "
" आता म्हणी म्हणून संपल्या असतील तर आपण साप पकडू या ?"
" पण मला एक सांगा हो तुम्ही साप कसा पकडता ?"
" त्याचं काय आहे, आधी त्याच्या पायात पाय घालून पाडतो आणि पडला की पकडतो, तुम्हाला काय करायचंय ? ती एक कला आहे,"
" मलाही शिकायचेय,"
" आधी साप विषारी आहे की बिनविषारी ते समजून घ्यावं लागतं ! "
" ते कसं कळणार ?? "
" सोबतच्या माणसाला सांगायचं ना ! "पकड तो साप बिंधास्त मी आहे ना !" मग साप त्याला चावतो, मग आपण अर्धातास थांबायचं "
" ते कशाला ? लगेच हॉस्पिटलला न्यायला नको का ? "
" मग आपल्याला कसं कळणार साप विषारी की बीन विषारी ? समजा तो मेला, तर साप विषारी "
" ओह असं आहे काय "
" चला पकडताय ना साप ? बिंधास्त पकडा मी आहे ना ! "
" माझ्यावरच प्रयोग कसला करताय ? माझ्या घरातला साप पकडा `तुम्हीच' "
" आधी मला सांगा तो कसा दिसत होता ?"
" लंबूळका.... "
" बसं ? फक्त लंबूळका ? त्याचा काही रंग काही वर्णन ?"
" म्हणजे बघा तो असा लांब होता, त्याच्या पाठीवर काळे पांढरे पट्टे होते, असं लांब शेपूट होतं " ..
" झुपकेदार असेल ना ! "
" हो, आणि जोरात धावत होता "
" बाई घरात नक्की साप शिरलाय की झेब्रा ? असा साप नसतो नीट सांगा "
" नाही म्हणजे , तो पिवळा होता, असा दणकट होता पांढर्या मिशा, आयाळ..."
" हे सिंहाचं वर्णन सांगताय तुम्ही सापाचं सांगा "
" मला नाही आठवत, मी घाबरलेले त्या सापड्याला पाहून "
" सापाला सापड्या म्हणता तुम्ही ? "
" उपरोधानं म्हणतेय हो, कळत नाही का ? "
" आणि मग नाग असेल तर ? "
" नाग.. काहीही काय विचारताय ? बरं मला सांगा तुम्हाला एखादा विषारी साप चावलाय का हो कधी ? "
" हो, नाग चावलेला एकदा "
" अरे बापरे मग ? मेलात का तुम्ही ?"
" काय बाई आहे, मेलो असतो तर इथे आलो असतो का ? सिरीयल आहे का ही ? मेलं की पब्लिकडिमांड म्हणून परत यायला ?"
" सॉरी पण मग नाग चावल्यावर पुढे काय झालं ? "
" काय होणार ? एक आठवडा आय सी यू त "
" अरे बापरे, पण तरी वाचलात हे काय कमी आहे का ? "
" मी नाही तो नाग होता आय सी यु त "
" तो कसा काय ? "
" त्याचं काय झालं आधी नाग मला चावला मग मी त्याला चावलो, सत्तेचाळीस टाके पडले त्याला "
" ओके, मी हे सगळं रेकॉर्ड केलेलं आहे "
" काय लेख वगैरे लिहीणार आहात का ? वर्तमानपत्रात ? फोटो पण घ्या की, कुठल्या पेपरच्या वार्ताहर आहात तुम्ही ?"
" वार्ताहर नाही मी, सर्पोद्यानातून आलेय, तो जखमी नाग आमच्याकडेच आहे, आणि हे पुरावे घेऊन मी तुमच्यावर केस टाकणार आहे "
" ओ..ओ बाई मी सगळं फेकत होतो हो, मी सापच काय साधा गांडूळही पकडलेला नाही आजवर "
" माहित होतं मला, मी न्युज रिपोर्टर आहे, आजची ब्रेकिंग न्युज मिळाली मला, नकली सर्पमित्राचा पर्दाफाश.."
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काळजी नसावी, माझी थट्टा होणार
मला माहित होतं, तुम्ही लाईटली
धमाल!
ओऽऽ???
कित्ती कित्ती निरागस हो आमचा धमु
मस्तच........
मस्त,
अपमान
(No subject)
हाहाहाहा!
हा हा हा...
धन्यवाद मंडळी,
मस्त रे भावा.
(No subject)
हाण्ण तिच्यायला!!!
घे रे धम्या पाहीजे तर अजून
चाफ्या, लेका काय जबदरस्त
मस्त!
मस्त..
मस्त !!!
झक्कास!
-
जबरा !!
आधी नाग मला चावला मग मी त्याला चावलो, सत्तेचाळीस टाके पडले त्याला=)) =))भन्नाट!
जबरीच! गुणगुण वाचून मग उतारा
हसण्यासाठि परत एकदा वाचलं
आवडले संवाद.
@" झुपकेदार असेल ना ! ">>>
(No subject)