Skip to main content

अमृत वाणी

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 04/08/2013 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
संत राज प.पु अनंत स्वामी ,तासगावकर ,यांची अमृत वाणी शारीरिक मिलन क्षणिक सुख देते,मनोमिलन सदैव सुख देते. मन खंबीर असेल तर गंभीर रोग सुद्धा बरा होतो. देवास कधी मंदिराच्या गाभाऱ्यात शोधू नका ,तो मनाच्या गाभाऱ्यात सापडेल निसर्ग सर्वात मोठा गुरु आहे ,निसर्गाशी जवळीक साधा मनावर ताबा ठेवण्यास शिका,कोणत्याही संकटास सामोरे जाता येईल . भगवी वस्त्र,. जटा ,भस्म लावून काही होत नाही,मनाची निर्मलता असावी लागते . प्रेमानीच प्रेम मिळते ,रुपया पैशांनी नाही मना पासून जोडलेली नाती कायम असतात,रुपया,पैशांची नाती टिकत नाहीत .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1340
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

खूपच छान . तुमच्या कविता, लेख खूप वेगळ्या प्रकारचे आणि खूप छान असतात.