पाकिस्तान एक प्रगतीशील राष्ट्र

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
22 May 2013 - 9:47 pm

पाकीस्तान -
पाक म्हणजे पवित्र.
पाकीस्तान म्हणजे पवित्र भूमी किंवा पुण्यवंतांचा देश.
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. येथील भारतीय जनता स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढत होती.
पण याच वेळी काही लोक हा विचार करीत होते की केवळ इंग्रजांपासून मुक्ती पुरेशी नाही तर आपल्याला भारतापासूनही स्वातंत्र्य आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला आपली प्रगती साधता येणार नाही आणि मग सुरू झाला प्रयत्न हरतर्‍हेने.
विशेषतः आजच्या सीमाभागात तत्वासाठी लढणारे योद्धे लढू लागले. ध्येय ठरल्यावर मग त्या दिशेने प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागते. हेच ध्येयनिष्ठ माणसाचे प्रमुख लक्षण आहे. अखेर ज्यासाठी केला होता अट्टाहास त्या पाकिस्तानची निर्मिती झाली आणि मग सुरू झाली घोडदौड विकासाकडे.
नवा देश उभा राहीला तेव्हा राज्यव्यवस्था कोणती हवी याची चाचपणी सुरू होती. सुरुवातीला इंग्रजी पद्धतीची लोकशाही अवलंबिली.

याचा फायदा उठवत
--स्त्रिया शिकू लागल्या. कॉलेजमधे जाऊ लागल्या. हे एवढ्यावरच थांबले नाही.
त्या घरदार सोडून दिवसभर नोकरीला जाऊ लागल्या. हे सारे लोकशाहीमुळे होऊ लागले. पण लवकरच यामधील दोष ध्यानात येऊ लागले.
लोकशाही म्हणजे लोकांना स्वातंत्र्य. बोलण्याचे स्वातंत्र्य, वागण्याचे स्वातंत्र्य मुख्य म्हणजे विचारांचे स्वातंत्र्य
पण
यामुळे शिस्त राहत नाही. विकासासाठी शिस्त हवीच आणि शिस्त हवी असेल तर कायद्याचा धाक हवा. धाक हवा तर ज्याच्याकडे दंडशक्ती आहे त्याच्याकडेच ही जबाबदारी सोपवायला हवी आणि म्हणूनच लष्करानेदेखील पाकिस्तानमधे वेळोवेळी सत्ता ताब्यात घेऊन राष्ट्राची भरकटणारी गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न केला.
विकासाकडे जायचे तर शिस्त हवी, शिस्त मोडणार्‍यांना शासन हवे.
भले ती शिस्त मोडणारा देशाचा पंतप्रधान का असेना. झुल्फिकार अली भुट्टो तत्त्वांपासून लांब जाताहेत असे लक्षात येताच
लष्करप्रमुख झिया उल हक यांनी सत्ता ताब्यात घेऊन भुट्टो यांना कैद केले आणि नंतर न्यायालयीन प्रक्रीया राबवून त्यांना फासावर लटकविले. भुट्टो यांना झालेली शिक्षा झिया यांनी ठोठावलेली नव्हती. तो न्यायालयाचा निर्णय होता.
झिया यांनी पाकिस्तानला तत्त्वज्ञानापासून मात्र दूर जाऊ दिले नाही.
अनेकांनी याबाबत झिया यांना दोष दिला पण देशाच्या भल्यासाठी त्यांना हा वाइटपणा स्वतःकडे घेणे भाग होते.
--
प्रगतीच्या पुढील टप्यात
मुल्ला ओमर, लादेन यांचेही मोलाचे मार्गदर्शन या देशातल्या नव्या पिढीला लाभले. असे मार्गदर्शन लाभलेले तरुण प्राणांची पर्वा न करता देशाच्या विकासाठी आणि मुख्य म्हणजे तत्त्वांसाठी झटताहेत स्वतःच्या बलिदानाने देश मोठा करीत आहेत.
विकासाच्या या घोडदौडीमधे अशा अनेकांचा मोठा वाटा आहे
आज पाकिस्तान इतका पुढे का या प्रश्नाचे उत्तर आहे, या देशातल्या नागरीकांना स्वस्थ बसणे अजिबात मान्य नाही.
ज्या तत्त्वांची कास देशाच्या निर्मात्यांनी धरली त्या तत्त्वांचे पालन होते आहे का नाही हे डोळ्यात तेल घालून पाहीले जाते.
देशातला प्रत्येक नागरीक आज या लढाईमधला सैनिक बनला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधे शारदादेवीचे देऊळ होते. आज त्याचे काय झाले ? उत्तर सोपे आहे. तत्त्वांची अंमलबजावणी झाली, तिथे तडजोड अजिबात नाही.
या झाल्या पूर्वीच्या बातम्या पण अलिकडेदेखील जागरुकता कमी झालेली नाही.संख्येने कमी असलेले काही समूह इथे आहेत जे सुंदर मूर्ती घडवतात नि त्याची पूजा करतात.
पण पाकिस्तानातील जागरुक नागरीक तत्त्वांना सोडून असलेल्या या आचरणावर कडाडून टीकेचे आसूड ओढतात.
या मूर्ती भंग करतात. सुंदर मूर्ती घडवणार्‍यांना कसा कळणार मूर्ती तोडण्यामधला आनंद ? जिथे अशा मूर्ती ठेवलेल्या असतात अशा देवळांचे काय !
इथले तत्त्वनिष्ठ लोक तत्त्व सोडून असलेली कोणतीच गोष्ट खपवून घेत नाहीत. देवळांसारख्या गोष्टी सरकारच्या आदेशाची वाट न पाहता इथले वॉलेंटियर्स नष्ट करतात. कुणीतरी हे महत्कार्य करेल म्हणून वाट पाहणारा इथला तरुण नाही.
देऊळ नाहीसे केल्यावर ती जागा बळकावता येते. तिथे हॉटेल टाकता येते. भौतिक विकास साधता येतो. हा फायदा ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे.
तुमचा देव कदाचित पुढच्या जन्मात देत असेल कर्माची फळे. पण इथे झटपट फलप्राप्ती आहे. इथे काहीजण देऊळ उध्वस्त करण्याचा संबंध मूर्तीपूजेला विरोध इ. ला लावतील पण मूर्त, अमूर्त, सगुण, निर्गुण अशा खोल खोल चिंतनात जायचे कारण नाही. आम्हाला केवळ एक कारण हवे असते लूटालूट करायला. असे कारण असले की आमच्या स्वार्थाला सगळ्या समाजाची मान्यता मिळते. हे यातले सौंदर्य आहे.

त्यामुळेच सगळी देवळे नष्ट केल्यावर आमचे कार्य थांबेल काय. अजिबात नाही. त्यानंतर जे शिल्लक राहील तेही आम्ही लूटत राहू, फोडत राहू. चांगल्या सवयी का सोडायच्या ? छोट्या छोट्या गोष्टीतून या राष्ट्राची प्रगती आणि तत्त्वनिष्ठा दिसून येते.

सिंध प्रांतातील घटना इथे सांगण्यासारखी आहे. एक गावात लोक शुक्रवारी भगवंताच्या प्रार्थनेकरता जमले होते.
प्रार्थना झाली. एक मूल एकटेच राहीले. ते रडू लागले. त्याचे आईबाप बराच शोध घेऊनही सापडेनात.
प्रार्थनास्थळाच्या प्रमुखाने जाहीर केले. ज्याअर्थी याचे आईवडील पुढे येत नाहीत त्याअर्थी हे पापातून जन्मलेले मूल आहे.
पाप आहे हे ठरल्यावर ते नष्ट करण्याची जबाबबदारी आली. त्याने लगेच जाहीर केले. या मुलाला जमिनीत गाडूया. मान डोके तेवढे वर ठेवूया. आपण सर्वजण या पापाला दगडाने ठेचून नष्ट करूया. खरेच किती सुंदर कल्पना आहे. सर्वांनी मिळून पाप आपल्या हाताने नष्ट करायचे. असे पाप सतत नष्ट करण्याची दक्षता घेतल्याने आता इथे केवळ पुण्यवंतच उरले आहेत. कदाचित हे लोक भारतातच राह्ते तर आपल्या हाताने पाप नष्ट करण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले नसते.
वेगळा देश बनवल्यानेच पाकिस्तानची प्रगती एक्सप्रेस वेगाने धावते आहे.

इथे भगवंताच्या प्रार्थनेकरता लोक एकत्र जमले होते असा मगाशी उल्लेख झाला. भगवंत म्हणजे तोच जो पाकिस्तानातील लोकांना परोपकार, त्याग, परमार्थ, राष्ट्रभक्ती इ गोष्टींसाठी प्रेरणा देत असतो.('इथे भाव तसा देव' हे भगवदगीतेतील वचन लक्षात ठेवावे) पाकिस्तानच कशाला अफजलखान आणि खिलजी यांचीही तीच प्रेरणा होती.

अफजलखान याचा जनानखाना ६४ बायकांचा होता. याच उज्वल परंपरेतला आणखी एक जण म्हणजे औरंगजेब. तत्त्वांचे पालन करीत असताना त्याने वाटेत येणार्‍या वडील आणि भाऊ यांचीही पर्वा केली नाही. वडीलांना तुरुंगात टाकले आणि भावांना ठार केले. त्यामुळे प्रजेच्या मनात त्याच्याबद्दल एक कर्तव्यकठोर हीच भावना होती. आपल्या भावांना ठार केल्यावर त्यांचे जनानखाने याने वार्‍यावर सोडले नाहीत. आपल्या जनानखान्याला जोडून घेतले आणि फार मोठी भौतिक प्रगती साधली.

या मुघल बादशहांचे जनानखाने मॅनेज करण्यासाठी काही स्त्रिया काम करीत असत आणि वेळोवेळी जगभरातील हिरे माणकांची भर त्या जनानखान्यात घालत असत आणि बादशहांना खुश ठेवत असत. मुघल त्यातही औरंगजेब हा पाकिस्तानातील नागरीकांचा आदर्श आहे.

परवाची गोष्ट इथल्या एका प्रार्थनास्थळामधील घंटा चोरीस गेली. चोर सापडला. चोराने उजव्या हाताना चोरी केली. उजवा हात होता म्हणून तर चोरी केली. तो हातच कलम केला तर... त्याला त्या हाताने पुन्हा कधीच चोरी करता येणार नाही. किती फूलप्रूफ उपाय आहेत इथले आणि न्यायही किती झटपट. Justice delayed is justice denied असं कुणीतरी म्हणून
ठेवलय. आता हा न्याय करणारे कुणी कायद्याचे पदवीधर नाहीत. पण तरीही न्यायाची कायद्याची केवढी समज आहे या लोकांना. खरच विलक्षण !

आमच्याकडे फास्टट्रॅक न्यायालयांची फक्त चर्चा होते. पाकिस्तानात मात्र त्याची अंमलबजावणी होते. यामुळेच पाकिस्तान एक प्रगत राष्ट्र बनत चालले आहे. काहीजण सांगतात. या न्यायदानामागे सौदी अरेबियाचा आदर्श आहे. तिथेही अशीच
काटेकोर न्याययंत्रणा आहे. तिथेही ज्या हाताने चोरी केली तो हात कलम करण्याची, मोठा गुन्हा असेल तर जमिनीत गाडून पाप सामूहीक रीतीने नष्ट करण्याची पद्धत आहे. गुन्हेगार जर स्त्री असेल तर पाप जमिनीत गाडण्याचा उत्साह ओसंडून वाहतो. फक्त गुन्हा करणारी वृत्तीच नव्हे तर गुन्हेगारच संपवण्याची पद्धत इथे असल्याने इथे गुन्ह्याचे प्रमाण
शून्य आहे. त्यामुळे लादेन किंवा अल जवाहीरीसारखे पुण्यवंतच आता तिथे शिल्लक आहेत. (जवाहिरी मूळचा सौदीचा नाही याची आम्हास कल्पना आहे)

पण पाकिस्तानमधे घंटा चोरणार्‍याचा हात कलम करण्याची अंमलबजावणी करीत असताना काही प्रश्न उद्भवले.
तोडल्यावर हा हात ठेवायचा कुठे ? प्रार्थनास्थळामधे, म्युन्सिपाल्टीमधे की राज्यसरकारकडे ? शेवटी प्रश्न तत्त्वाचा आहे. असे तात्त्विक वाद घालणारे विचारवंत हे पाकिस्तानचे भूषण आहेत.

शिक्षणासारखी गोष्ट जी मुख्यतः पाश्चात्य असते त्या गोष्टीवर होणारा वायफळ खर्च अतिशय कमी करत आणला आहे. शिक्षणासारख्या बाबीवर सर्वात कमी खर्च करणार्‍यांमधे जगभरात पाकीस्तानचा पहिल्या पाचात क्रम लागतो.

मगाशी उल्लेख झाला, देवळे तोडण्याचा वगैरे. आता प्रश्न पडू शकतो की ज्यांचा देवळाशी संबंध नाही. जे आपल्याच संस्कृतीला मानणारे आहेत, त्यांच्यावर हल्ले का ? त्यांना बाँबस्फोटामधे का संपवल जातय. या मागे काय आहे कारण ?

इथे कारण महत्त्वाचे नाही. रीझल्ट महत्त्वाचा. देऊळ मानणारे असोत वा आमच्यासारखेच देऊळ तोडणार्‍यांपैकी असोत
या लोकांना संपवल्यानंतर त्यांचे घरदार, संपत्ती, पशुधन हे सारे आम्हाला आपोआप नाही का मिळत.

इथे ज्याला मारू त्याची संपत्ती, घरदार, पशुधन, स्त्रिया, कोवळी मुले उपभोगायला मिळतात. अल्लाउद्दीन खिलजी,
मो बिन कासिम, मलिक काफूर(जो कोवळा असल्यापासून खिलजीचा लाडका गुलाम होता) यांनी घालून दिलेला हा आदर्श आहे.

आमचे पाकिस्तानी तत्त्वज्ञान असे याच जन्मात फायदा करून देणारे आहे. इथे कर्मफलासाठी पुनर्जन्माची वाट पहायची गरज पडत नाही. हेही एक अति आकर्षक फीचर आहे आमच्या तत्त्वज्ञानाचे.
या तत्त्वज्ञानाला आपण दुसर्‍याची संपत्ती लाटण्याचे किंवा जमीन लुबाडण्याचे
शास्त्र म्हणू शकतो.
या तत्त्वज्ञानाला अनेक अनुयायी मिळाले आहेत. पण अजूनही या अनुयायांची संख्या कमी आहे. या तत्त्वज्ञानाला असेच अनुयायी मिळोत आणि भारतीय उपखंडाची प्रगती होत राहो.

मागे वळून पाहताना वाटते, हे लोक भारतातच राहत असते तर या स्वातंत्र्याला मुकले असते.
अशी प्रगती जनतेला करून घेता आली नसती. म्हणूनच म्हटलय पाकिस्तान एक प्रगतीशील राष्ट्र.

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

22 May 2013 - 9:49 pm | आशु जोग

भारतातील नेत्यांना लँड रीफॉर्म्समधे फार इंटरेस्ट होता. जमीनदारी मोडून काढायची होती
पण पाकिस्तानच्या भाग्यविधात्यांनी भारतात न येऊन याही गोष्टीपासून मुक्ती
मिळवली.

त्यामुळे झरदारी अंकल, भुट्टो इ. लोकांचे काही हजार एकरचे जमीनदारी वैभव टिकून
राहीले
त्याला भारताची नजर लागू शकली नाही.

भुट्टोंकडे अडीच लाख एकर चे वैभव होते. त्यांच्या मंत्रींडळातील काहींकडे
मुघलकाळापासून पंचेचाळीस हजार एकर होते, आजही आहे.

पाकिस्तान जन्मला तेव्हा तिथे टाटा नव्हते, बिर्ला नव्हते.
पण
या प्रतिकूलतेवर देशाने खूप कष्टाने मात केली.
झरदारी असोत किंवा शरीफ बंधू यांनी पाणी, वीज यांच्या बिलाचे भय सामान्य
माणसाप्रमाणे कधी भय बाळगले नाही
इंपोर्ट ड्युटीलाही कधी भीक घातली नाही. अशा प्रकारे पैसा पैसा वाचवला आणि
विकास करून दाखवला.
आज या देशाने टाटा आणि बिर्ला यांचे बाप त्यांनी पैदा केलेत.
जगातील सर्वात मोठा साखर कारखाना कोणाचा याचे उत्तर आहे नवाझ शरीफ यांचा.

परराष्ट्रमंत्री खारुताई आणि त्यांचे कुटुंबीय यांनीही असेच कष्ट करून प्रगती
साधली आहे
या लोकांनी पाणी आणि वीजेच्या बिलाचा धसका कधीच घेतला नाही.
निर्भयपणे प्रगती साधली.

काळा पहाड's picture

23 May 2013 - 1:50 am | काळा पहाड

प्रगती कसली? पाकिस्तान हा देश भिकेला लागला आहे. विजेची अपार् टंचाई, पाण्याबाबतीत भारतावर अवलंबित्व, कर्ज, संरक्षण खर्चात अमाप वाढ आणि ढासळलेली अर्थव्यवस्था हे तिथले चित्र. येत्या दशकात हा देश पुसला जावून त्याचे चार तुकडे होतील असा अंदाज व आशा.

आशु जोग's picture

23 May 2013 - 9:13 am | आशु जोग

फक्त शीर्षकच वाचलेत का ?

श्री गावसेना प्रमुख's picture

23 May 2013 - 10:03 am | श्री गावसेना प्रमुख

ह्यांचा आदर्श भारतीय मुस्लिमांनी घ्यावा काय?

श्रीगुरुजी's picture

23 May 2013 - 2:30 pm | श्रीगुरुजी

मेलेल्याला काय मारायचे! पाजीस्तानसारख्या तद्दन फालतू देशाबद्द्ल आणि त्या देशातल्या फालतू जनतेबद्दल काहीही लिहायची गरज नाही.

आशु जोग's picture

24 May 2013 - 1:46 am | आशु जोग

पाजीस्तानसारख्या तद्दन फालतू देशाबद्द्ल आणि त्या देशातल्या फालतू जनतेबद्दल काहीही लिहायची गरज नाही.

बर साहेब
तुम्ही म्हणाल तसं

खटपट्या's picture

24 May 2013 - 2:07 am | खटपट्या

सहमत

भुमन्यु's picture

23 May 2013 - 2:45 pm | भुमन्यु

खबरदार!!!! या देशात अफजलखान, औरंगजेब, यांना काही वाईट म्हणाल तर... नुकत्याच
लागलेल्या जावई शोधानुसार औरंगजेब हा सुफी संत होता औरंगजेब हा सुफी संत होता...

सो अजुन असे काही शोध जाणत्या (?) राजाचे पाईक लावतील आणि तुमच्यावर भावना दुखावल्या म्हणुन "देशद्रोहाचा" खटला भरतील

-----
रागा
-----

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2013 - 2:29 am | अत्रुप्त आत्मा

@सो अजुन असे काही शोध जाणत्या (?) राजाचे पाईक लावतील आणि तुमच्यावर भावना दुखावल्या म्हणुन "देशद्रोहाचा" खटला भरतील>>> मि.वागळे याच्यावर आजचा सवाल घेतिल काय??? :)

भुमन्यु's picture

24 May 2013 - 3:09 pm | भुमन्यु

>>>> नाही घेणार मि. वागळेंच्या द्रुश्तीन्व द्रुष्टीने तो व्यक्ती-स्वातंत्र्याचा प्रश्न असेल

----
रागा
----

जे.जे.'s picture

28 May 2013 - 3:23 am | जे.जे.

हे मात्र खर आहे. औरंगजेबाला सुफी सन्गिताचि प्रचन्ड आवड होती. एवढेच नाही तर त्याचा मुख्य व्यवसाय 'टोप्या विणणे' (टोप्या घालणे नव्हे) होता.

प्रसाद गोडबोले's picture

24 May 2013 - 2:13 am | प्रसाद गोडबोले

व्हेरी गुड .!
अगदी ब्रिटिश सर्क्यॅझम सारखं लिहिण्यात आपण यशस्वी झालेला आहात ! अभिनंदन !!
( वरील वाक्ये सरकॅस्टीक नाहीत . )

पण

आपण आपल्या देशातल्या पाकिस्तान बद्दल चर्चा करुया का ह्यापेक्षा ?
त्या पाकिस्तानवर लिहा पाहु एक असाच फक्कड लेख !!
आमची आपली नम्र विनंती समजा ...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 May 2013 - 2:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वाचायचा
प्रयत्न
केला
पण एवढ्या
ठिकाणी
एंटर
बटण
दाबलं
नसतं तर
पूर्ण लेखन
वाचलंही
असतं.

क्षमस्व.

पैसा's picture

24 May 2013 - 8:09 am | पैसा

छान उपरोध! लेख आवडला.

नितिन थत्ते's picture

24 May 2013 - 8:24 am | नितिन थत्ते

सहमत आहे.

छान लिहिलय हो जोगसाहेब,

मागे वळून पाहताना वाटते, हे लोक भारतातच राहत असते तर या स्वातंत्र्याला मुकले असते.
अशी प्रगती जनतेला करून घेता आली नसती.

अगदी पटेश..

नितिन थत्ते's picture

24 May 2013 - 11:23 am | नितिन थत्ते

चांगला आहे पण.....

त्यातून आपल्या देशाच्या सुरुवातीच्या नेत्यांना अप्रत्यक्ष क्रेडिट मिळतंय ना !! ;)

रमताराम's picture

24 May 2013 - 4:11 pm | रमताराम

ह्ये थत्तेचाचांना न्हेमी वायलंच कायतरी असतंय. असं गैरसोयीचं बोलायचं नस्तंया. कंदी सम्जायचं तुमास्नी. समूर घंटा टांगलीया न्हवं, ती वाजवा, 'शंभो हर हर' म्हणा नि व्हा बाजूला. आम्ही लायनीतले मागले सम्दे खोळांबलोय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 May 2013 - 9:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अश्लील, अश्लील, अश्लील.

सोत्रि's picture

24 May 2013 - 9:08 pm | सोत्रि

बरं ठीक!

ह्या उपरोधामागचा नेमका मुद्दा काय?

-(प्रगतीशील पुरोगामी) सोकाजी

आशु जोग's picture

25 May 2013 - 10:04 pm | आशु जोग

पाकिस्तानची प्रगती

गुलाम's picture

27 May 2013 - 5:31 pm | गुलाम

अगदी असेच म्हणतो. आंधळा पाकिस्तान व्देष सोडला तर लेखामधून काहीच हाती लागत नाही.

वूडहाऊसचं एक प्रसिध्द वाक्य आहे- " I don't hate in the plural"
बाकी आपली-आपली मते, विचार वगैरे वगैरे!!!
----------------------------------------------------

आशु जोग's picture

27 May 2013 - 8:02 pm | आशु जोग

चला तर मग तुम्ही पाकप्रेमाबद्दल काही लिहा

आशु जोग's picture

3 Aug 2018 - 8:32 pm | आशु जोग

गुलाम साहेब,

खरे आहे. पाकिस्तानकडे अधिक डोळसपणे पहायची गरज आहे.

कलंत्री's picture

10 Aug 2018 - 11:00 pm | कलंत्री

डोळसपणापेक्षा तेही आपली शेजारी राष्ट्र आहे आणि भारत आणि पाकिस्तानमधील शांतता प्रेमी जर एक आले तर भारत ही आजही महासत्ता होवू शकते. भारत, पाक, बांगला, अफगाण, नेपाळ, म्यानमार यांनी व्यापारी महासंघ बनवायला हवा.

चामुंडराय's picture

12 Aug 2018 - 8:25 pm | चामुंडराय

नको ! युरो झोन सारखे व्हायचे.
हि सगळी शेजारी राष्ट्रे भारतावरच मदतीसाठी अपेक्षा ठेवतील.

आशु जोग's picture

19 Aug 2018 - 1:33 pm | आशु जोग

संघर्ष कमी झाल्यास संरक्षणावरचा तोच खर्च इतर चांगल्या कामांसाठी वापरता येइल

उद्दाम's picture

27 May 2013 - 1:32 pm | उद्दाम

अफजलखान, अकबर, मोघल...... एवढं ५०० वर्षापूर्वीचं शिळं पाकं का चघळताय? ते नवीन कुणी तरी वंदे मातरम नको वगैरे बोलले... त्याच्यावर लिवा आता.

पाक्यानी मंदीर मोडून हॉटेल बांधून च्यापान्याची तरी सोय केली.. तुम्ही मशीद पाडून देऊळ बांधणार होते ना? त्याचे काय झाले?

आशु जोग's picture

27 May 2013 - 4:17 pm | आशु जोग

५०० वर्षे कशाला
आजच्याच अ‍ॅचिवमेंटस लिहिल्या आहेत ना !

चौथा कोनाडा's picture

8 Aug 2018 - 10:49 pm | चौथा कोनाडा

अतिशय उपरोधानं लिहिलयं, धारधार लिहिलंय, त्वेषाने लिहिलंय !

ज ब र द स्त !