गालिर्क सुप इन ब्रेड बाउल

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
3 Apr 2013 - 12:43 am

सहित्यः

राऊंड ब्रेड - १
लसुण पाकळ्या - ८-१०
बटाटा - १
चिकन स्टॉक - ३ कप
ब्रेड स्लाईस - २
काळि मिरी पावडर - १/२ चमचा
बेसिल - १/४ चमचा
ओरेगानो - १/४ चमचा
चीज - २ चमचे
बटर - २ चमचे
मिठ चवीनुसार

कृती:

१. लसुण पाकळ्या सोलुन बारीक चिरुन घ्याव्या. बटाट्याचे देखिल काप करुन घ्यावेत.
२. कढईत butter गरम करावे. त्यात चिरलेला लसुण व बटाटा टाकुन परतुन घ्यावे.
३. ते थोडे परतल्यावर त्यात चिकन स्टॉक टाकुन, १०-१५ मिनिटे किंवा बटाटे शिजे पर्यंत सुप उकळु द्यावे.
४. सुपला उकळी आल्यावर त्यात २ ब्रेडच्या स्लाईसचे तुकडे करुन टाकावेत.
५. सुप मधे काळि मिरी पावडर, बेसिल, ओरेगानो व चवीनुसार मिठ टाकुन गॅस बंद करावा.
६. हे सुप मिक्सर मधे १-२ वेळा फिरवुन घ्यावे. त्यामुळे सुप smooth होईल.
७. राउंड ब्रेडचा वरचा थोडासा भाग कापुन, आतला ब्रेडचा भाग काढुन घ्यावा. साधारण पणे त्याला बाऊलचा आकार यायला हवा.

1

८. आता ब्रेड बाऊलला आतुन थोडे बटर लावुन, ओव्ह्न मधे २४० degree celcius ला ५-७ मिनिट भाजुन घ्यावा. त्यामुळे ब्रेड मस्त crispy होतो.
९. तयात झालेल्या ब्रेड बाऊल मधे सुप ओतुन, वरतुन चिज टाकुन, गरम-गरम serve करावे.

2

3

टिपः

१. तुम्ही हवे असल्यास ब्रेड घरी देखिल करु शकता. ब्रेडचि पाकृ तुम्ही येथे पाहु शकता.
२. कृती सर्व सारखीच असेल, फक्त ब्रेडचा आकार थोडा मोठा करावा लागेल.
3. तुम्ही चिकन स्टॉक ऐवजी व्हेज स्टॉक देखिल वापरु शकता.
४. मी हा ब्रेड घरी बनवला आहे. त्यामुळे मी मध्यम आकाराचा ब्रेड बनवला होता.

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

3 Apr 2013 - 1:18 am | कवितानागेश

सुप छान लागेल.

पण हा पदार्थ खायचा कसा?
मला पाणीपुरीबद्दलपण नेहमी असाच प्रश्न पडतो... :(

चमच्याने सुप प्यायचे आणि जसे जसे सुप संपत जाते, तसे तसे साईडचा ब्रेड तोडुन खायचा. हा सुप मधे भिजलेला ब्रेड खुप छान लागतो. :D नक्की ट्राय करुन बघा.

आईग्ग! किती कौतुक करू तुझं! ब्रेड घरी बनवलास, ग्रेट!
दोन ब्रेड स्लाईसेस तुकडे करून सुपात टाकण्याऐवजी जर बाऊल तयार करताना काढलेला ब्रेड त्यात घातला तर?

कवितानागेश's picture

3 Apr 2013 - 1:50 am | कवितानागेश

दोन ब्रेड स्लाईसेस तुकडे करून सुपात टाकण्याऐवजी जर बाऊल तयार करताना काढलेला ब्रेड त्यात घातला तर?>
अगदी हेच मनात आलं होतं. wpta. ;)

हो.. अगदी बरोबर आहे... तोच ब्रेड टाकला तरी चालेल.. पण मी जेव्हा सुप केले, तेव्हा माझा ब्रेड तयार नव्हता झाला. म्हणुन मी मग त्यात २ ब्रेडचे स्लाइस वापरले होते. ;) :D

उपास's picture

3 Apr 2013 - 2:12 am | उपास

पनेरा ब्रेड आठवले! छान रेसिपी.

खादाड_बोका's picture

3 Apr 2013 - 4:33 am | खादाड_बोका

हाच आजचा प्रयोग...फक्त ब्रेड पनेरा किंवा कॉस्ट्को मधुन आणवी लागणार

सानिकास्वप्निल's picture

3 Apr 2013 - 3:53 am | सानिकास्वप्निल

भन्नाट दिसतोय ब्रेड व सूप लज्जतदार :)
सूप सर्व्ह केलेला पहिला फोटो खूप खूप आवडला

Wow, That Was Incredible.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Apr 2013 - 8:20 am | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink022.gif

सकाळी सकाळी अत्याचार आहेत हे.

यशोधरा's picture

3 Apr 2013 - 8:56 am | यशोधरा

अ ति श य भा हा री ही ही!

स्पंदना's picture

3 Apr 2013 - 8:58 am | स्पंदना

देवा परमेश्वरा!!
या मृणालिनीला माफ कर.
एव्हढ खतरनाक प्रेझेंटेशन !!
वर आणि सांगतेय मी ब्रेड घरी बनवला.

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2015 - 5:39 pm | पिलीयन रायडर

खरंय..

माफ कर बाबा हिला.. पुढल्या जन्मी सानिका, मृणालिनी अशा बायकांचा नवरा होण्यासाठी काय व्रत करावे लागेल..?

(मुद्द्याचा प्रश्नः- व्हेज स्टॉक नसेल तर कसं करायचं हे सुप?)

Mrunalini's picture

19 Mar 2015 - 6:31 pm | Mrunalini

हाहाहा... धन्स गं.
व्हेज स्टॉक नसेल तर साधे पाणी वपरलेस तरी चालेल.

रेसिपी जर भारी आहेच, पण तुमची फोटोग्राफी खत्र्याच. विशेषतः दुसरा फोटु, पांढर्‍या प्लेटमधला ब्राऊन ब्रेड, त्यातलं पांढरं सूप, बाजूचे लसूण, चमचा आणि रंगीत कूक बूक. बहोत बढिया. भूक चाळवायला पुरेसे आहे एव्हढे. :)

प्रभाकर पेठकर's picture

3 Apr 2013 - 10:30 am | प्रभाकर पेठकर

मस्तं. आणि आकर्षक पाककृती. लसूणाचे सेवन आरोग्यदायीही असते. त्यामुळे सर्व कोनातून, एक उपयुक्त पाककृती असेही म्हणता येईल.

ब्रेड पोखरून काढलेला पावाच्या मऊ भागाला भरपूर बटर लावून, वर भरडसर दळलेली काळीमिरी पुड टाकून प्लेटमध्ये सूपच्या शेजारी ठेवून सादर करतात. सुप खाता खाता मध्ये पावाचा तो तुकडा खायलाही मजा येते.

चिकन चाऊडरसुद्धा असे सर्व्ह केले जाते.

धन्यवाद पेठकर काका. तुमची आयडिया पण आवडली. पुढच्या वेळी नक्की ट्राय करुन बघेल. :)

एका फोटोत लसणाचा बोके झालेला आहे. बाकी लिहिण्यासारखं काही नाही.

मृत्युन्जय's picture

3 Apr 2013 - 10:46 am | मृत्युन्जय

लैच खास. लैच खास. खुपच आवडेश. काय भन्नाट आयडिया आहे.

दिपक.कुवेत's picture

3 Apr 2013 - 11:56 am | दिपक.कुवेत

फोटो, पाकॄ, प्रेझेंटेशन.....सर्व बाबतीत काहि बोलायला शब्दच नाहि. ईकडे राउंड ब्रेड मिळेल कि नाहि शंका आहे....एनी वे पण आम्हि साध्या बाउल मधे करुन पीउ :)

इशा१२३'s picture

3 Apr 2013 - 12:36 pm | इशा१२३

ब्रेडची रेसेपिही सोपी वाटती आहे.मस्तच!

गणपा's picture

3 Apr 2013 - 12:39 pm | गणपा

कल्पना एकदम भारीच आहे.
आधी ब्रेड नरम पडेल की काय अशी शंका आली होती पण तो भाजुन घेतल्याने लगेच नरम पडणार नाही.

ब्रेडही फक्कड झालेला दिसतोय. :)

कच्ची कैरी's picture

3 Apr 2013 - 12:46 pm | कच्ची कैरी

जबरदस्त सादरीकरण, मादक फोटो आणि झक्कास पाककृती ,वाह क्या बात है !!!!!

स्मिता.'s picture

3 Apr 2013 - 2:51 pm | स्मिता.

काय, म्हणावं काय या कल्पकतेला??? बाकी सुप छानच लागत असेल. हा गोल ब्रेड बेकरीमधे मिळाला तर नक्की करून बघेन :)

सूड's picture

3 Apr 2013 - 2:56 pm | सूड

क ह र !!

ब्रेड अन सूप, दोन्ही मस्त !
मृणालिणितै, माझी एक बाळ्बोध शंका....
सूप संपेपर्यंत ब्रेड बाऊल अभेद्य राहतो का ? सूप गळत नाही का खाली ?

प्यारे१'s picture

3 Apr 2013 - 3:59 pm | प्यारे१

त्यासाठी ब्रेड बाऊल चिनीमातीच्या मोठ्या बाऊलमध्ये घ्यावा. ;)
मग ब्रेड बाऊलमधल्या सुपात कालवून... बास्स!

छान आहे पाकृ!

प्यारेंची आयडिया आवडली. ;)
ब्रेडचा बाउल करताना आतुन तो अगदी काठोकाठ रिकामा नाही करायचा.. आतुन साधारण १ सेमी तरी जाड असला पाहिजे. ब्रेड भाजुन घेतल्यामुळे तो लगेच मऊ पडत नाही आणि तसेही इथे हे सुप थंडी मधे पीताना, एवढा वेळ ठेवावेच लागत नाही. सुप लगेच संपते.:D

सुहास झेले's picture

3 Apr 2013 - 4:38 pm | सुहास झेले

जबरदस्त.... फोटो आणि सादरीकरण भन्नाट

पाकृ आणि फोटो आवडल्या बद्दल सगळ्यांचे धन्यवाद. :)

नजरच हटत नाहीय फोटोवरून!!

मला तर दिसतच नाहीये फोटो ;)

प्रेझेन्टेशन मात्र सानिका आणि म्रुनालिनी जबरदस्त असतं तुमचं .... डीसेन्ट ......

एक रीक्वेश्टे दोघीना .... तुम्ही दोघी जे बनवता ते आयतं चवी चवीने खानार्‍या प्राण्यांचे पण फोटो टाका की ...
लय जळायला होतं मला तर :-/ :-/

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये खेकड्याचं सूप ब्रेड बोल मधून प्याले होते . अगदी तस्सा म्हणजे अगदी तस्सा ब्रेड दिसतो आहे. कमाल आहे तुझ्या पाक-नैपुण्याची.

वा.. खेकड्याचे सुप... :) पाकृ टाक ना असेल तुझ्याकडे तर..

पिंगू's picture

4 Apr 2013 - 10:56 pm | पिंगू

खपलो..

अभ्या..'s picture

5 Apr 2013 - 1:42 am | अभ्या..

लैच क्रीयेटीव्ह