पेशवाई"
लेखनविषय (Tags)
पेशवाई"
एक आठवण
खूप म्हणजे खुप दिवस झाले.
पुण्यात सदाशिव पेठ पोस्ट ऑफिस जवळ एक छोटे खानी उपहार गृह होते.
उपहार गृहाचे नाव "पेशवाई"
त्या हॉटेल ची खासियत म्हणजे "मटार उसळ"
अप्रतिम चवदार उसळ असायची त्या हॉटेल मध्ये
अर्थात बाकीचे पण मराठी पदार्थ असायचे पण त्या काळी प्रत्येकाची मोनोपॉली ठरलेली असायची वडा म्हटला की प्रभाचा..मिसळ. बेडेकर वा वैद्यांची.
लहानसे उपहार गृह होते कोप~यात एक नोकर रोज ताज्या मटारचा ढीग सोलत बसलेला असायचा.
एकदा वेटरला रेसिपी विचारली तर नारळाची खव व नारळाच्या दुधाचा वापर करीत असे त्यामुळे उसळीस छान चव यायची.
मटार उसळ ब्रेड स्लाइस व चहा मस्त नाश्ता व्हायचा ..
जुन्या पद्धतींचे लाकडी काउंटर व खुर्चीवर बसलेले वयस्कर मालक..
कानाला यंत्र लावलेले असायचे.बहुतेक कमी ऐकू येत असावे.
काउंटर लहानच होते पण त्याच्या काचेखाली अतिशय वळणार अक्षरात काही सुभाषिते व विनोद लिहिलेले होते.
त्यातला एक मार्मिक विनोद आजही लक्षात आहे..तो असा
लंडन च्या हित्रो विमान तळावर २ प्रवाशांचा संवाद
प्रवासी..भारतात निघालो खरा पण गडबडीत घड्याळ घरीच विसरलो..
सह प्रवासी..काळजी करू नका भारतात नाही तरी लोक घड्याळ शोभेसाठीच मनगटावर बांधत असतात ..
पुढे बहुतेक मालक देवाधरी गेले व एका नगर सेवकाने ते हॉटेल विकत घेतल्याचे कळले.
काही दिवस चालले पण नंतर त्याने त्याचे बिअर बार मध्ये रुपांतर केले ..
व त्या उपहार गृहाची पार रया गेली..
नंतर तो बार हि बंद पडला ..
आता तेथे टोलेजंग इमारत होत आहे. असे कळते
मटार उसळ खाण्याचा प्रसंग आला की पेशवाई ची याद येते
प्रतिक्रिया
अच्छा हे होय मला वाटले की
अगदी असंच वाटलं !
चखना कुठाय?
बरोबर आहे...
नवीन
हा हा हा सहमत!!!
मला त्याचं बियर बार रूपच
आयच्या गावात !
नाय हो परा. पण मी मएसोच्या