प्रेमदिनानिमित्त खास ब्लॅक फॉरेस्ट रसगुल्ला केक

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
15 Feb 2013 - 1:42 am

.

साहित्यः

२ रेडीमेड चॉक्लेट स्पाँज केक मिक्स (हे नाही मिळाल्यास बेसीक स्पाँज केकची पाकृ खाली दिली आहे)
१२० मिली पाणी (केक मिक्सच्या पाकिटावर पाणी आणी अंड्याचे जसे प्रमाण दिले आहे तसे घ्यावे)
४ अंडी
फ्रेश क्रीम
२-३ चमचे साखर व्हॅनिला एसेन्स
चेरीज सजावटसाठी
किसलेले चॉक्लेट
केशर रसगुल्ले (तुम्ही पांढरे रसगुल्ले ही वापरु शकता)

.

पाकृ:

ओव्हन १७० डिग्री सेंटीग्रेडवर प्री-हीट करा.
एका मिक्सींग बाऊल मध्ये एक पॅकेट केक मिक्स, २ अंडी व १२० मिली पाणी एकत्र करुन फेटून घेणे.
केक टीनला बेकींग पेपर लावून घ्यावा किंवा बटर ने ग्रीज करून घ्यावे.
टीनमध्ये फेटलेले केकचे मिश्रण ओतावे व प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये केक टीन ठेवून २०-२५ मिनिटे बेक करणे.
विणायची सुई घालून पहावी, सुई स्वच्छ निघाली म्हणजे केक तयार झाला समजावे.
केकला कुलिंग रॅकवर गार होण्यासाठी काढून ठेवावे.

.

केक गार होतोय तोपर्यंत क्रीम व्हिप करुन घ्यावे.
एका भांड्यात बर्फाचे पाणी घ्यावे व त्यावर मिक्सींग बाऊल ठेवावा.
त्यात गार असलेले फ्रेश क्रीम ओतावे व बीटरने २-३ मिनिटे फेटावे. (असे केल्याने क्रीम लवकर फेटले जाते)
आता त्यात चवीपूरती साखर व १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालावे.
पुन्हा २-३ मिनिटे क्रीम घट्ट व सॉफ्ट पिक्स तयार होईपर्यंत फेटावे.

.

केक पूर्ण गार झाला की त्यावरचा क्रस्टी भाग कापून घ्यायचा आहे, असे केल्याने केक एक-मेकांवर ठेवायाला सोपे जाते.
केकला केक बोर्ड्वर ठेवून त्यावर रसगुल्ल्याचा पाक थोडा थोडा करुन घालावा, म्हणजे केक मॉईस्ट राहील.
केकवर फेटलेले क्रीम पसरवून घ्यावे. त्यावर अर्धे कापलेले रसगुल्ले व चेरीज लावून घ्यावे.
थोडे किसलेले चॉक्लेट लावावे.
आता त्यावर केकचा दुसरा भाग हलक्या हाताने दाबून ठेवावा व पुन्हा त्यावर रसगुल्ल्याचा पाक लावून घ्यावा.
केकला सगळीकढून क्रीम लावून घ्यावे. कडेला किसलेले चॉक्लेट लावून घ्यावे.

.

मी थोडेसे फेटलेले क्रीम पायपींग बॅगमध्ये काढून केकवर सजावट केली.
वर रसगुल्ले, चेरीज व चॉक्लेट ने सजावट करावी.
तयार केक फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

.

हा केक तुम्ही आज तुमच्या प्रियजनांबरोबर प्रेमदिन मस्त साजरा करून खा :)

.

.

नोटः

ज्यांना केक मिक्स सहज उपलब्ध नाही त्यांनी घरीच स्पाँज केकचे मिश्रण तयार करावे.
त्यांनी १७५ ग्राम मैदा चाळून घ्यावा.
१२५ ग्राम बटर आणी १२५ ग्राम साखर एकत्र हलके होईपर्यंत फेटावे.
त्यात एक-एक करत २ अंडी घालून चांगले फेटावे.
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालून पुन्हा फेटावे.
त्यात चाळून घेतलेला मैदा ५ टेस्पून कोको पावडर थोडे थोडे करून घालावे व मिश्रण फोल्ड करावे.
पुढिल कृती वर दिल्याप्रमाणे करावी.

प्रतिक्रिया

सही.... छान दिसतोय केक... Happy valentines day!!! :)

अभ्या..'s picture

15 Feb 2013 - 1:51 am | अभ्या..

सानिकातै तुमच्या घड्याळात अजून आहे प्रेमदिन. ;)
तरी पण तू एवढ्या प्रेमाने आणि नेहमीच्याच सुगरणपणाने दिलेल्या पाकृ बद्दल खूप खूप धन्यवाद.
नेहमीप्रमाणेच सॉल्ल्लीड फोटो आणि रेसेपी. :)
आम्ही परत आजपण प्रेमदिन साजरा करु :)

अभ्या..'s picture

15 Feb 2013 - 2:40 am | अभ्या..

सानिकातैच्या पाकृ निर्विवादपणे अप्रतिम असतातच पण मला जास्त कौतुक वाटते ते प्रेझेंटेशनचे.
काय एकेक अ‍ॅक्सेसेरीज वापरलेल्या असतात आणि त्यापण रेसेपीला अगदी सूट होतील अशा. काय जबरा त्यांचे काम्पोझीशन दिसते. कलरस्कीम, लाईट आणि टेक्श्चर यातून एकदम अप्रतिम डिझाइनिंग सेन्स जाणवतो. आत्तापर्यंतच्या सगळ्या पाकृच्या फायनल इमेज पार ईंटरनॅशनल ब्रोशर्स च्या तोडीच्या आहेत.

चिगो's picture

15 Feb 2013 - 6:08 pm | चिगो

आणखी काय बोलणार..

सानिकास्वप्निल's picture

15 Feb 2013 - 12:18 pm | सानिकास्वप्निल

पाकृ डकवली तेव्हा राणीच्या देशात प्रेमदिन सुरुच होता रे अभ्या :)

धन्यवाद रे :)

अग्निकोल्हा's picture

15 Feb 2013 - 2:24 am | अग्निकोल्हा

पाहता हा केक साला, कलिजा खलास झाला|
भरविता आपुलकिने तिजला, प्रेमोमाळे वाहती||

किसन शिंदे's picture

15 Feb 2013 - 2:58 am | किसन शिंदे

खल्लास!!

मिपाकरांची एखादी पंगत तुमच्या घरी पडावी अशी त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना करतो.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Feb 2013 - 12:43 am | अत्रुप्त आत्मा

@मिपाकरांची एखादी पंगत तुमच्या घरी पडावी++++++++१११११११११११
येस येस.......... हम भी किसन द्येव के साथ, भारी मात्रा ;-) मे सेहेमत है। http://www.sherv.net/cm/emoticons/party/big-party-smiley-emoticon.gif

रेवती's picture

15 Feb 2013 - 3:52 am | रेवती

आता काय बरं म्हणू! ;)
कौतुक करायला शब्दच शिल्लक ठेवले नाहीस तू!
अगदी वेगळा आणि भारी केक! ग्रेट!
अश्या केकची कल्पना कधीही केली नव्हती त्यामुळे आवाक झाले.

सानिका काय आत्मविश्वासाने आपण सादर करता पाकृ. फारच छान सादरीकरण. १००/१०० मार्क.
केक सुद्धा आवडला.

मीनल's picture

15 Feb 2013 - 7:08 am | मीनल

क्लास !!!
व्हिडिओ खूप उपयुक्त!!

स्पंदना's picture

15 Feb 2013 - 7:22 am | स्पंदना

फारच छान!

दीपा माने's picture

15 Feb 2013 - 8:15 am | दीपा माने

सानिका, हा वेगळ्या पध्दतीचा केक अगदी ईस्ट आणि वेस्टचे फुजन वाटले. छानदार आणि निगुतीने नटवलेला केक आवडला.

शिद's picture

15 Feb 2013 - 8:24 am | शिद

ज ब र द स्त...!!! दुसरे शब्दचं नाहीत. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Feb 2013 - 8:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

झक्कास...रसगुल्ला आणि केक वर जिवापाड प्रेम आहे माझं. :)...दोन्ही एकदम मिळत असेल तर ते सोन्याहुन पिवळंचं :)..!!

प्रचेतस's picture

15 Feb 2013 - 8:33 am | प्रचेतस

जहबर्‍या

५० फक्त's picture

15 Feb 2013 - 8:39 am | ५० फक्त

लई भारी, धन्यवाद.

खल्लास आणि क्लास..

- पिंगू

ए सानिका .. पूढच्या जन्मासाठी स्वप्निल ची च्छुट्टी बर्का :-/
माझा नंबर लावुन ठेवलाय हं मी ....
च्यायला या जन्मी काश मय लडका व्होती :-/

जेवढी छान दिसतेस तेवढा सुंदर केक आहे :)
हॅप्पी वॅलेन्टाइन्स डे डीअर :)

स्मिता चौगुले's picture

15 Feb 2013 - 9:45 am | स्मिता चौगुले

केक आणि रसगुल्ला याचे हे अप्रतिम कोम्बिनेशन्...आहाहा...
आणि केकच्या सूंदर सजावटीचे फोटो,जबरदस्त
खरच खूप आवडले...मी नक्की करून बघेन हा केक

धन्यवाद सानिकाताई

अत्यंत सुंदर केक दिसतो आहे, प्रेझेंटेशनविषयी वेगळं बोलायलाच नको. झक्कासच.

रसगुल्ला आणि तत्सम अन्य चोथट्ट मिठायांशी अजिबात जमत नसल्याने तेवढा भाग वगळून बाकीचा केक आवडला.

या बंगाल्यांना दूध पाहताच ते आटवण्याऐवजी फाडावं असं का वाटतं कोण जाणे.. असं (बहुधा पुलंनी) म्हटलं आहे ते योग्यच ... :)

ऋषिकेश's picture

15 Feb 2013 - 10:27 am | ऋषिकेश

केक छान दिसतोय. मी ब्लॅक फॉरेस्ट अनेकदा करतो. हे इम्प्रोवायझेशन ट्राय करायला हवं..

बाकी, 'फूड फोटोग्राफी' वरसुद्धा एक स्वतंत्र लेख येऊ दे ही विनंती! काय क्लास फोटोज असतात हो!

bharti chandanshive१'s picture

15 Feb 2013 - 10:57 am | bharti chandanshive१

खुप छान केक आहे

पैसा's picture

15 Feb 2013 - 11:19 am | पैसा

अगदी परिपूर्ण कलाकृती!

nishant's picture

15 Feb 2013 - 1:01 pm | nishant

शेवटून दुसरा फोटो जब्राट आलाय! :) खास आवडला..

हासिनी's picture

15 Feb 2013 - 1:13 pm | हासिनी

जबरदस्त दिसतोय केक! प्रेझेंटेशन अगदी जबरा!!
:)

तुमचा अभिषेक's picture

15 Feb 2013 - 1:16 pm | तुमचा अभिषेक

हे असले केक शॉपमध्ये नसतात का हो.. काय जबरी दिसत आहे..

यशोधरा's picture

15 Feb 2013 - 1:22 pm | यशोधरा

अग्गागागागागा!! ही अशी रेसिपी आणि मुख्य म्हंजे असे फोटो डकवल्याबद्दल तुमचा प्रेमळ निषेध!! :D

धनुअमिता's picture

15 Feb 2013 - 1:49 pm | धनुअमिता

खुपच छान झालाय केक. लगेच खावासा वाटतो आहे.

जबरदस्त प्रेझेंटेशन जानेमन :)
काय मस्त झालाय केक.
तू फार सुरेख बोलतेस....गोड आहे आवाज तुझा. शब्दफेक सुद्धा सही !!
ओव्हरऑल......अफलातून .... जियो :)

स्पा's picture

15 Feb 2013 - 2:59 pm | स्पा

ख ला स ................................................................

स्मिता.'s picture

15 Feb 2013 - 3:11 pm | स्मिता.

माझीही स्थिती रेवतीताईसारखी झालीये. आता आणखी काही शब्दच उरले नाहियेत कौतुक करायला.

एकदा महिनाभराची सुटी घेवून तुझ्याकडे रहायला येईन आणि जाडजूड होवूनच परत जाईन ;)

पियुशा's picture

15 Feb 2013 - 3:12 pm | पियुशा

___/\___ आमचा दंडवत :)

अक्षया's picture

15 Feb 2013 - 3:36 pm | अक्षया

दर वेळी काय लिहायचे प्रश्न पडतो. शब्द नाहीत. :)

विशाखा राऊत's picture

15 Feb 2013 - 3:58 pm | विशाखा राऊत

:)

प्यारे१'s picture

15 Feb 2013 - 4:35 pm | प्यारे१

मिसळपाव हे पाकृ दहशतवादाचं ट्रेनिंग सेंटर आहे नि त्यावर आम्ही लवकरच कारवाई करु...

- प्यारेलकुमार शिंदे.
(५० रावांच्या प्रतिक्रियेशी सहमत -प्यारे)

मिसळपाव खाद्योत्सव ठेवा रे कुणीतरी!

सस्नेह's picture

15 Feb 2013 - 4:35 pm | सस्नेह

प्रेमदिन 'गोड' झाला..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Feb 2013 - 7:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

___/\___

-दिलीप बिरुटे

वेताळ's picture

16 Feb 2013 - 11:37 am | वेताळ

तुम्ही ह्या पा़कृ बरोबर वजन कमी कसे करावे ह्याचे पण फोटो डकवत चला.असले फोटो बघुन हालत खराब होते.

वेल्लाभट's picture

16 Feb 2013 - 11:39 am | वेल्लाभट

खासच वाटतोय ! करायला हवा. (आय मीन, सांगायला हवं करायला :प)

दिपक.कुवेत's picture

16 Feb 2013 - 1:47 pm | दिपक.कुवेत

रसगुल्ला हा केकचा मुख्य घटक होउ शकतो हि कल्पनाच खुप नविन आहे. खुप छान सानिका. खरच तु़झ्या ओव्हरऑल प्रेझंटेशनपुढे शब्दच सुचत नाहित.

सुहास झेले's picture

16 Feb 2013 - 3:00 pm | सुहास झेले

व्वा व्वा... एकदम झक्कास :) :)

स्वाती दिनेश's picture

17 Feb 2013 - 8:27 pm | स्वाती दिनेश

केक छान आहे, वेगळेपणा आहे.
स्वाती

आरोही's picture

14 Feb 2015 - 12:53 pm | आरोही

1

आज केलाय !!खूप धन्यवाद या सानिका मस्त केक बद्दल !!

आरोही's picture

14 Feb 2015 - 12:54 pm | आरोही

2

सानिकास्वप्निल's picture

14 Feb 2015 - 4:27 pm | सानिकास्वप्निल

अगदी सुरेख दिसतोय केक आरोही ....क्लास!!

इथे आवर्जून कळवल्याबद्दल अनेक धन्यवाद व शुभेच्छा :)

सविता००१'s picture

14 Feb 2015 - 2:30 pm | सविता००१

सही दिसतोय केक