भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच.
नुकतेच ह्या इटलीच्या एका हेलिकॉप्टर कंपनीने भारताला अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वापराकरता डझनभर हेलिकॉप्टरे अफाट भावात विकली. त्यात मोठी लाचखोरी झाली अशा आरोपाखाली इटलीच्या सरकारने त्या कंपनीच्या प्रमुखाला अटक केली. ते झाल्यावर आपले धुतल्या तांदळासारखे स्वच्छ संरक्षण मंत्री व बाकी उच्चपदस्थ खडबडून जागे झाले. आता ते ह्या प्रकरणाची "सखोल" चौकशी करणार म्हणत आहेत.
नेहमीच्या स्वच्छ परंपरेनुसार इथेही काळ्या पैशाचे आकडे डोळे पांढरे करणारे आहेत.
मात्र महाराणींच्या माहेरची कंपनी असल्याने प्रश्न प्रतिष्ठेचा बनू शकतो. त्यामुळे शक्य तितके प्रयत्न करून भारत सरकार काखा वर करणार असे दिसते आहे. क्वात्रोचीजींचे उदाहरण ताजे आहे.
मागेही तंत्रज्ञानक्रांतीसूर्य राजीवजींच्या कारकीर्दीत ह्याच कंपनीने निकृष्ट हेलिकॉप्टरे भारताच्या गळ्यात मारली आणि नंतर ती नगण्य भावात विकली गेली. पण ते प्रकरणही दडपले गेले असावे.
इतक्या वर्षाच्या अनुभवाने इतक्या मोठ्या रकमांचा अपहार करताना नामानिराळे कसे रहायचे, कायद्याच्या कचाट्यातून कसे वाचायचे हे अगदी व्यवस्थित माहित झाल्याने कुणी उच्चपदस्थ ह्यात अडकतील अशी सुतराम शक्यता नाही. फारतर सैन्यातील कुणी ज्याने त्या मलिद्यातील दोन चार चमचे गिळले असतील त्याला बळीचा बकरा बनवतील आणि सारे कसे शांत होईल.
जय सोनियाजी!
http://www.loksatta.com/sampadkiya-news/one-more-scam-61041/
वाचने
2459
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
सदर कंपनीचा आणि सोनीयाजींचा
जय हिंद जय महाराष्ट्र जय
In reply to सदर कंपनीचा आणि सोनीयाजींचा by नाना चेंगट
अनुमोदन.
सहमत/असहमत
In reply to अनुमोदन. by तर्री
अमेरीकेने नाकारले ते भारताने
निष्पक्ष चौकशी व्हावी
गुलाबी वळण?
सोनियांचे माहेर इटलीचे
ओह!
टेंडर स्पेसिफिकेशनमध्ये बदल