Skip to main content

कागा रे कागा रे

लेखक प्रशु यांनी बुधवार, 13/02/2013 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
मरणसन्न अवस्थेत 'ती' पडलीय, पतीसह सासरच्या मंडळीनी तीचा त्याग केलाय. का? असा काय गुन्हा केलाय तिने तर तीने प्रेम केलय ते सुद्धा पाटलाच्या पोरावर!!! आणी साधसुधा नाहि हा लोकविलक्षण प्रेम केलय. पण तो तीचा प्रेमी सुद्धा आज तिच्यापाशी नाही. परंतु त्याला फक्त बघण्याची आस तीच्यात उरलीय, शरीराचे लचके तोडायला आलेल्या कावळ्यांना पण 'ती' हेच सांगतेय.. ||कागारे कागारे मोरी इतनी अरज तोसे चुन चुन खाईंयो मांस | अरजीया रे खांयो ना दो नैना मोरे, खांयो ना दो नैना मोरे, पिया के मिलन की आस || (हे कावळ्यांनो, माझ्या शरीरावरचे सगळे मास खा, पण माझे डोळे तेवढे सोडा, कारण प्राणप्रिय सखा दिसायची ती आस ह्या डोळ्यांनीच पुर्ण होईल) पुढे काय झालं? आलि का 'ती'ची दया कोणाला? पतिला? कि प्रियकराला? कोणास ठाऊक? इतिहास 'ती' च्या बाबतीत गप्प आहे. वर्तमान मात्र सगळ्या जगाला ओरडुन 'ती'च्या प्रेमाची साक्ष देत आहे. काय म्हणता कुठे आहे? जरा देवळात जाऊन पहा, प्रियकराच्या बाजुला हसतमुखानं उभी आहे, हो तोच तो, सावळ श्याम, आनि तिच 'ती' राधा......
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 979
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया