शोध कवितेचा.
आजच बर्याच दिवसांनंतर एक चांगला कार्यक्रम बघायला / ऐकायला मिळाला. गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झालेला कार्यक्रम गर्दीने खचोखच भरला होता. आपल्या शाळैय कवितेचा आस्वाद, आंनद आणि आठवणी जागवतांना मन लहानपणात समरस होत होते.
लहानपणी मराठीशाळेतील मराठीचा तास आणि त्यातील कविता वाचणे किंवा गाणे हा किती सुझद आणि समृद्ध अनुभव असतो हे शाळा झाल्यावरच लक्षात येते.
श्री महेश पाटणकर यांनी(१४ कलाकारासह) हा कार्यक्रम सादर केला आणि सर्वांची वाहव्वा मिळवळी.
या कार्यक्रमात पडु आजारी मौज वाटे भारी, श्रावणमासी हर्ष मानसी, खबरदार जर टाच मारुनी, घाल घाल पिंगा वार्या, आजीचे घड्याळ, तुम्ही फक्त लढ म्हणा अश्या अनेक कविता चालीसह ऐकायला मिळाल्या आणि धन्य धन्य वाटले.
कार्यक्रम झाल्यानंतर अजून कितीतरी कविता ऐकायच्या राहुनच गेल्या असे पुन्हा पुन्हा वाटत राहिले.
कलंत्री, पुणे.
(आजचा कार्यक्रम ७७ वा कार्यक्रम होता. महेश पाटणकरांचा संपर्क क्रमांक ९२२५५ २३९५० असा मिळाला.)
वाचने
1141
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
अरे वा! चांगला दिसतो कार्यक्रम? आणखी थोड लिहा ना, लोकांची दाद, सादरकर्त्यांचे वैशिष्ठ्य. अनेक बाजु मांडता येतील.
अरे वा! चांगला दिसतो