1

ॠषीकुमाराचे प्रश्र्ण

Primary tabs

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in काथ्याकूट
6 Feb 2013 - 3:12 pm
गाभा: 

एका माळरानावर एक हरीणाची जोडी निवांतपणे चरत होते. अतिशय सुंदर गोजीरवाणी जोडी होती ती. दोघांनीही नुकतेच यौवनात पदार्पण केले होते. सहजीवनाचा हा त्यांचा पहिलावहीला अनुभव होता. तारुण्याचा उन्मादाच्या शिखरावर होते ते दोघेजण. एकमेकांच्या तोंडावर तोंड घासत. एकमेकांना ढुशा मारत त्यांचे प्रणयाराधान सुरु होते. नुकत्याच झालेल्या पावसा मुळे मोठे छान लुसलिशीत गवत उगवलेले होते. नविनच उगवलेल्या या कोवळ्या गवता मुळे त्यांना पोट भर खायला मिळत होते. त्यामुळे खुश झालेली जोडी इकडे तिकडे हुंदडत फिरत गवताचा आस्वाद घेत होती. त्यांच्या गवतात फिरण्या मुळे गवतातले किडे पण उडत होते. त्या उडणार्‍या किड्यांना मटकवण्या साठी काही चिमण्या त्याच्या भोवताली घिरट्या घालत होत्या. त्या चिमण्यांशी खेळत बागडत मधेच गवतात लोळत ते दोघे एकमेकांशी खेळत होते. त्यांच्या आयुष्यातल्या सोनेरी क्षणांचा अनुभव घेत ते तॄप्त होत होते.

चिमण्यांना पण नुकतीच पिल्ले झाली होती. त्या पिल्लांसाठी चिमणचारा गोळा करण्या साठी त्यांची लगबग चालली होती. हरीणांची जोडी माळरानात घुसल्यावर त्या लगबगीने त्यांच्या भोवती घिरट्या घालू लागल्या आणि त्यांची पण चंगळ सुरु झाली. भराभर उडणारे किडे पकडुन त्या आपल्या पिल्लांना भरवत होत्या. पिल्लांचे पोट भरल्यावरही काही किडे त्यांनी जास्त पकडुन ठेवले. नंतर कधीतरी खाण्यासाठी. हरीणांचा दंगा, चिमण्यांच्या चिवचिवाट, अल्हाददायक हवा यामुळे वातावरण एकदम प्रसन्न बनले होते.

एक ॠषीकुमार दुर एका झाडाखाली बसुन हे सगळे पहात होता. त्याच्या आचार्यांनी नुकत्याच शिकवलेल्या काही नव्या श्लोकांचे तो मनन करत होता. आजुबाजुच्या वातावरणामुळे त्याचे मनही प्रसन्न झाले होते. हरीणांची प्रणयक्रिडा, चिमण्यांची लगबग तो मुग्ध होउन पहात होता. फारच रम्य संध्याकाळ होती ती.

त्या कुमाराला काही माकडांचे आवाज ऐकु आले आणि तो सावध झाला. सतत जंगलात राहिल्या मुळे त्याला प्राण्यांची बोली अवगत होती. त्याला जाणवले आजुबाजुला काहीतरी धोका आहे आणि तो चटकन झाडावर चढुन बसला. झाडावर गेल्यावरही त्याचे हरीणांच्या जोडीकडले लक्ष कमी झाले नव्हते.

इतक्यात एका हरणाचा पाय त्या किड्यांच्या घरट्यावर पडला आणि त्यांचे घरटे मोडुन गेले. नुकतीच त्या किड्यांनी अंडी घातली होती. सगळी अंडी फुटुन गेली. पण हरीणाला याची कल्पना सुध्दा नव्हती तो मस्त पैकी त्याच्या धुंदीत फिरत होता. पण त्या किड्यांमधे मात्र हाहाक्कार उडाला होता. सगळे किडे सैरभैर आणि हवालदील झाले होते. किड्यांचा राजा हरीणांच्या त्या जोडीवर भयंकर संतापला आणि तो उडत उडत हरिणांकडे गेला आणि त्यांना म्हणाला "दुष्टांनो तुमच्या उन्मादा मुळे आमचे घरटे तुटले. हजारो अंडी फुटुन गेली. अनेक किडे तुमच्या मुळे चिमण्यांची शिकार झाले. गवतावर तुम्ही लो़ळलात तेव्हा बरेच जण तुमच्या अंगा खाली चिरडले गेले. आमची सगळी वस्तीच तुम्ही उध्वस्त करुन टाकलीत. हे दुष्टांनो तुमच्यावरही काळ अशीच झडप घालेल. मला जे दु:ख तुम्ही दिलेत त्याच दु:खाच्या आगीत तुम्ही देखील होरपळाल." हे वाक्य पूर्णव्हायच्या अधिच एका चिमणीने किड्यांच्या राजावर झडप घातली आणि त्याला चोचीत पकडुन घेउन गेली. हरणांना यातले काहीच समजले नाही. त्यांना हे ही समजले नाही की मरता मरता किड्यांच्या राजाने त्यांना शाप दिला. झाडावर चढुन बसलेल्या ॠषीकुमाराला प्राण्यांच्या भाषा येत असल्या मुळे मात्र सगळे समजले.

त्याचे लक्ष सहज झाडाखाली गेले. तो मगाशी जिथे बसला होता तिथे आता एक सिंहीण दबा धरुन उभी होती. तिचे लक्ष हरणांच्या जोडी कडेच होते. माकडांचा कलकलाट वाढला होता. पण हरणांचे मात्र त्या कडे अजिबात लक्ष नव्हते. सिंहीणीने अचानक झडप घालुन नर हरीण पकडले आणि त्याच्या मानेत आपले सुळे रुतवले. हरीणी जीवाच्या भीतीने दुर पळुन गेली. एकाक्षणात सगळ्या रंगाचा बेरंग झाला होता. भीतीने आणि दु:खाने हरीणी सैरभैर झाली होती. त्यातच तिच्या तोंडुन शापवाणी बाहेर पडली. "रती मग्न असलेल्या आमची तु कायमची ताटातुट केलीस. दुष्टे तुझे तळपट होइल. आयुष्यात तुला या पेक्षा भयंकर दु़:ख भोगावे लागेल" असे म्हणुन आसवे गाळात ती तिकडुन निघुन गेली.

चिमण्या दुसरी कडे चारा शोधण्या साठी उडाल्या. जिवंत राहिलेले किडे एकत्र येउन परत घर बांधायला लागले.

सिंहीणीला मात्र हरीणीच्या दु:खाची किंवा बाकी सगळ्या घटनांची काहीसुध्दा जाणीव नव्हती. उलट तिला फार आनंद झाला होता. बर्‍याच दिवसंनी तिला शिकार मिळाली होती. ते हरीण ओढत ओढत तिने आपल्या गुहेपाशी आणले आणि आपल्या चार दिवस उपाशी असलेल्या बछड्यांना बोलावले. सगळे बछडे त्या हरीणावर तुटुन पडले आणि सिंहीण मोठ्या मायेने त्या पिलांच्या अंगावरुन जीभ फिरवत त्यांना स्वच्छ करु लागली.

ॠषीकुमार हे सगळे पाहात होता. तो सावध पणे झाडावरुन खाली उतरला. त्याने प्रथम माकडांचे आभार मानले. कारण माकडे ओरडली नसती तर हरणाच्या ऐवजी आज सिंहाचे बछडे त्यालाच खात असते. या घटनेव विचार करताना मग त्याला काही प्रश्र्ण पडले

हरणाचे काही चुकले होते का?

किड्यांच्या राजाचा व हरणाचा मॄत्यु नक्की कशा मुळे झाला?

तो का वाचला?

सिंहीणीचे आता काय होईल?

वाचक हो या सगळ्या प्रश्र्णांमुळे ॠषी कुमार अस्वस्थ झाला होता फार विचार केल्या नंतरही त्याला या प्रश्र्णांची समाधानकारक उत्तरे सपडली नाहीत.

तुम्ही त्याला उत्तर शोधायला मदत करु शकता का?

समजा असाच काहीसा प्रसंग आपल्या आजुबाजुच्या माणसांसोबत घडला म्हणजे घटना थोडीफार बदलुन प्राण्यांच्या जागी माणसे असती तर आपले वरील प्रश्र्णांची उत्तरे बदलली असती का?

प्रतिक्रिया

इरसाल's picture

6 Feb 2013 - 4:00 pm | इरसाल

वाचुन असे वाटले की मिपावरील नवीन लग्न झालेल्या जोड्यांबद्दल लिहीत असावेत.
आता उत्तरे

हरणाचे काही चुकले होते का?

हो त्यांनी आजुबाजुला लक्ष ठेवायला हवे होते. काय करणार कामातुरः न भय ना....

किड्यांच्या राजाचा व हरणाचा मॄत्यु नक्की कशा मुळे झाला?

किड्यांचा राजा चिमणीमुळे आणी हरीण सिंहीणीमुळे मेले :))

तो का वाचला?

पशु-पक्ष्यांची भाषा समजुन झाडावर चढल्यामुळे

सिंहीणीचे आता काय होईल?

मी पण तोच विचार करतोय. काय होईल बरे ? त्या सिंहीणीचा पंडु तर नाय होणार ना ?

सुहास..'s picture

12 Feb 2013 - 9:04 pm | सुहास..

ओ पैजारबुवा ? काय चालले आहे ?

हरिणी भेटली की काय पुन्हा ;)

नाना चेंगट's picture

6 Feb 2013 - 4:01 pm | नाना चेंगट

>>हरणाचे काही चुकले होते का?

काहीही नाही.

>>किड्यांच्या राजाचा व हरणाचा मॄत्यु नक्की कशा मुळे झाला?

निसर्गचक्रातील एक घटना एवढेच.

>>तो का वाचला?

ज्ञान (प्राण्यांच्या भाषेचे या उदाहरणापुरते) असल्याने.

>>सिंहीणीचे आता काय होईल?

काय होणार? ती तिच्या नेहमीच्या जीवनक्रमात मश्गुल राहील. शिकार्‍यापासून अथवा जीवघेण्या जखमा/हल्ले यातून वाचली तर वृध्द होऊन शांतपणे मृत्युच्या स्वाधीन होईल. अन्यथा आधी जीवनयात्रा संपेल.

>>तुम्ही त्याला उत्तर शोधायला मदत करु शकता का?

थोडी मदत केली अल्पमतीने

>>>समजा असाच काहीसा प्रसंग आपल्या आजुबाजुच्या माणसांसोबत घडला म्हणजे घटना थोडीफार बदलुन प्राण्यांच्या जागी माणसे असती तर आपले वरील प्रश्र्णांची उत्तरे बदलली असती का?

नाही.

केदार-मिसळपाव's picture

6 Feb 2013 - 4:23 pm | केदार-मिसळपाव

तो का वाचला?

पशु-पक्ष्यांची भाषा समजुन झाडावर चढल्यामुळे

ज्ञान (प्राण्यांच्या भाषेचे या उदाहरणापुरते) असल्याने.

हे जास्त महत्वाचे आहे. बाकी सर्व "निसर्गचक्र"

संजय क्षीरसागर's picture

6 Feb 2013 - 4:30 pm | संजय क्षीरसागर

हा खरा प्रश्न आहे!

तो वाचला नसता तर सगळे प्रश्न संपले.

पण ॠषीकुमारासारखे आपणही स्वतःला विसरून दुनियेचे विचार करत बसतो!

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Feb 2013 - 4:45 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुम्हाला काय म्हणायचे आहे ते समजले असे वाटते पण परत एकदा खात्री करुन घेतो.
देवाने मेंदु नावाचा अवयव देउन मानवावर सुडच घेतला आहे असे आपल्याला वाटते का?
पैजारबुवा,

नाना चेंगट's picture

6 Feb 2013 - 4:47 pm | नाना चेंगट

>>>देवाने मेंदु नावाचा अवयव देउन मानवावर सुडच घेतला आहे असे आपल्याला वाटते का?

कोणाला? ;)

माणसाचा मेंदू हाही नैसर्गिकच आहे. स्वतःच्याच विनाशाचं बीज सिस्टीममधे असणं कदाचित आपापतः बनणार्‍या प्रत्येक सिस्टीममधे आवश्यक ठरत असेल म्हणा किंवा तसं न बनण्यापासून रोखणारं कोणी नसेल म्हणा..

आपल्याला वाटते का?

आपण वाचलो याचा धन्यवाद वाटण्याऐवजी ॠषीकुमार जी दुनियादारी करतोय, तेच प्रत्येक माणूस करतोय. पुढचा श्वास नक्की आहे असं गृहित धरून तो सगळं करतोय. आणि त्यामुळे नाहीनाही ते विचार चालू आहेत.

मेंदू हा शाप नाहीये, त्याचा उपयोग करता येत नाहीये. विचारांची प्रक्रिया नियंत्रणाबाहेर गेलीये.

हर एक सवाल का उत्तर दिया गया है.....

हरणाचे काही चुकले होते का?

उत्तरः नशीब.

किड्यांच्या राजाचा व हरणाचा मॄत्यु नक्की कशा मुळे झाला?

उत्तरः नशीब.

तो का वाचला?

उत्तरः नशीब.

सिंहीणीचे आता काय होईल?

उत्तरः नशीब.

तुषार काळभोर's picture

6 Feb 2013 - 5:00 pm | तुषार काळभोर

शेवटी नशीब
(असं कुठंतरी ट्रकच्या मागं लिहिलं होतं)

अभ्य's picture

6 Feb 2013 - 5:10 pm | अभ्य

चावट ॠषीकुमार..

चावट असला तरी प्रसंगावधान राखुन होता.....

अहो साहेब हा निसर्गाचा नियमच आहे ... मोठा प्राणी लहान प्राण्याला खातो.. ससा पाला खातो .. लांडगा सश्याला खातो.. त्यात एवढ विचार करण्यासारखं काही नाही...

दादा कोंडके's picture

6 Feb 2013 - 6:03 pm | दादा कोंडके

अहो साहेब हा निसर्गाचा नियमच आहे ... मोठा प्राणी लहान प्राण्याला खातो

कोल्ह्याने, लांडग्याने, किंवा तस्तम प्राण्याने झेब्रा किंवा इतर मोठ्ठे प्राणी खाणे अनैसर्गिक आहे का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Feb 2013 - 6:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

कारण कोण कोणाचे भक्ष्य हे आकारमानावर नाही तर भक्षण करण्याच्या शारिरीक व बौद्धीक ताकदीवर आणि प्राणिशास्त्रीय (biological) सवयीवर आहे.... मोठ्या आकारमानाचा अभाव अनेक प्राणी सांघीक शिकार करून / टोळीने राहून संरक्षण करून भरून काढतात

उदा: (१) पिरान्हा हा मासा त्याच्यापेक्षा शेकडो पटींनी मोठ्या प्राण्यांचा चट्टामट्टा करतो... आणि हत्ती तर मुंगीसुद्धा खात नाही. (२) माणसाने व्हेलची शिकार करून त्यांना नष्ट करू नये याकरिता जंगी प्रयन्त करावे लागत आहेत.

आवांतरः या जगात माणूसच असा प्राणी आहे जो सर्वभक्षी आहे... अगदी माणूसही (cannibalism) खायला कमी करत नाही :)........ आणि इतर प्राणी पोट भरले की शिकार करायचे थांबतात पण माणूस मात्र सतत अतृप्तच...

अति-आवांतरः हल्ली व्यवस्थानशास्त्रानेही "Big fish eats small fish." हे सूत्र मोडीत काढून "Fast fish eats slow fish." हे सूत्र वापरायला सुरुवात केली आहे.

आनंद घारे's picture

6 Feb 2013 - 5:33 pm | आनंद घारे

हरणाचे काही चुकले होते का? ............................... नाही आणि हो.
त्याने उड्या मारण्यात कसलीही चूक केली नाही, पण माकडांची भाषा समजत नसली तरी ती ओरडतात तेंव्हा आजूबाजूला कसला तरी धोका असावा, आपण सावध व्हायला हवे एवढे निरीक्षण त्याने केले नव्हते. वन्य पशू असे करतात असे मी वाचलेले आणि टीव्हीवर पाहिले आहे. सावध होऊन ती जोडी पळाली असती तरी त्यातल्या एकाचा बळी जाण्याची शक्यता होतीच, म्हणून हो आणि नाही.
किड्यांच्या राजाचा व हरणाचा मॄत्यु नक्की कशा मुळे झाला? .......................... जीवो जीवस्य जीवनम हा निसर्गक्रम
तो का वाचला? .............................. त्याचेकडे असलेले प्राण्यांच्या भाषांचे ज्ञान आणि हरिणांचे अज्ञान.
सिंहीणीचे आता काय होईल? .................... जे काही भविष्यकाळात घडेल तसे होईल. या घटनेचा त्यावर काही परिणाम होणार नाही. शाप वगैरे काही नसते. पापाचे फळ वगैरे असते असे समजले तरी आपले भक्ष मिळवण्यात तिने पापाचरण केलेले नाही. तिचे मनही तिला खाणार नाही.
समजा असाच काहीसा प्रसंग आपल्या आजुबाजुच्या माणसांसोबत घडला म्हणजे घटना थोडीफार बदलुन प्राण्यांच्या जागी माणसे असती तर आपले वरील प्रश्र्णांची उत्तरे बदलली असती का? ............ माणसांकडे सदसद्विचार असावा, तसेच आपल्या कृत्याचे परिणाम काय होतील याचा त्याने विचार करावा अशी अपेक्षा असते. त्यात मतभिन्नता असते. यामुळे या प्रश्नाचे एक उत्तर येणार नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Feb 2013 - 6:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

जीवो जीवस्य जीवनम् ... आणि जो जगलावाचला तो का जगलावाचला हे समजवायला तर डार्विनने त्याचा जगप्रसिद्ध सिद्धांत मांडला. जग हे या दोन सिद्धांतावरच चालते...

फक्त ते कसे चालते हे— जगण्यावाचण्यासाठी / जगवण्यावाचवण्यासाठीची (आणि तारण्या / मारण्या साठीची) कारवाई / धडपड कशा प्रकारे केली जाते— यावर ठरते.

कवितानागेश's picture

6 Feb 2013 - 8:41 pm | कवितानागेश

नका हो. परत त्या डार्विनला आणू नका. :(

केदार-मिसळपाव's picture

6 Feb 2013 - 9:38 pm | केदार-मिसळपाव

सहमत आहे.

विकास's picture

6 Feb 2013 - 9:51 pm | विकास

डार्विनच्या माकडांमुळेच तर ॠषिकुमार वाचला ना! ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Feb 2013 - 10:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे एक शास्त्रीय उत्तर आहे. याचा दुसर्‍या कोणत्याही धाग्याशी काहीही संबंद्ध नाही. या मताबरोबर सहमती नसल्यास कोणीही त्याचे लॉजीकल / शास्त्रीय खंडन करू शकतो.

खेडूत's picture

6 Feb 2013 - 7:28 pm | खेडूत

>> आचार्यांनी नुकत्याच शिकवलेल्या काही नव्या श्लोकांचे तो मनन करत होता.
मुळात आपले अध्ययन घरी करायचे सोडून त्याने का भटकावे असा प्रश्न मात्र पडला! (टी व्ही पुढे अभ्यासाला बसलेला आजचा कुमार डोळ्यासमोर आला.)

पण उत्तरे वरीलप्रमाणेच.

>>> समजा असाच काहीसा प्रसंग आपल्या आजुबाजुच्या माणसांसोबत घडला म्हणजे घटना थोडीफार बदलुन प्राण्यांच्या जागी माणसे असती तर आपले वरील प्रश्र्णांची उत्तरे बदलली असती का?

होय. पण '' अंदाज करणे कठीण'' असे आजकाल माणसेही वागत आहेत!

केदार-मिसळपाव's picture

6 Feb 2013 - 9:41 pm | केदार-मिसळपाव

>> आचार्यांनी नुकत्याच शिकवलेल्या काही नव्या श्लोकांचे तो मनन करत होता.

म्हणजे घोकम्पट्टी पेक्षा (practical ला मराठी शब्द काय हो)- तेच महत्वाचे असेच ना...

विकास's picture

6 Feb 2013 - 9:57 pm | विकास

अश्वं नैव गजं नैव ,व्याघ्रं नैव नैव च ,अजा पुत्रं बलिम दद्यात दैव दुर्बल घातकः

अर्थात, या गोष्टीत बळाने श्रेष्ठ असलेली सिंहीण, सर्वत्र नजर ठेवून असलेले (सावधपणात श्रेष्ठ) माकड आणि प्राण्यांची भाषा आणि हालचालींवरून अंदाज घेण्याचे ज्ञान आत्मसात करणारा मानव (ऋषिकुमार) हे त्यांच्या त्यांच्य ठिकाणी श्रेष्ठ असल्याने वाचले. बाकी (हरीण आणि किडे) दुर्बल होते... (आणि चिमण्या उडून गेल्या!)

केदार-मिसळपाव's picture

6 Feb 2013 - 11:12 pm | केदार-मिसळपाव

वाटला.

तिमा's picture

13 Feb 2013 - 5:32 pm | तिमा

अजा पुत्रं बलिम दद्यात दैव दुर्बल घातकः

'अजापुत्रं बलि दद्यात देवो दुर्बल घातकः' असे पाठ केल्याचे आठवते.
बाकी असल्या प्रश्नांची उत्तरे फक्त युधिष्ठिरच देऊ शकतो.

अग्निकोल्हा's picture

6 Feb 2013 - 10:54 pm | अग्निकोल्हा

हरणाचे काही चुकले होते का ?

चुकणार्‍यांचेच वाटोळे होउ शकते हा गैरसमज बाळगु नये...

किड्यांच्या राजाचा व हरणाचा मॄत्यु नक्की कशा मुळे झाला ?

किड्यांच्या राजाला शाप द्यायचा किडेबाजपणा नडला, तसही हरीण सिहीणीच्या टप्यात आल्यावर मरणारच होते... भलेही ते सेक्स्च्या मुडमधे नसते तरीही....! (होय सिंहीण हॉर्नी हरणांनाच मारते असा अजिबात नियम नाही)

तो का वाचला ?

अलर्टनेस व अनुकुल परिस्थीतीमुळे. तसेच सिंहीण नरभक्षक नसावी व तिला तिच्या पिलानाही नरभक्षक निर्माण करण्यात बहुदा रस नसावा म्हणुन!

सिंहीणीचे आता काय होईल ?

योग्य वेळी ती आजि बनण्याची शक्यता आहे. आफ्टर ऑल, शि इज लिवींग एक्स्ट्रिमली हेल्दि लाइफ स्टाइल! पण ह्या ॠषी कुमारचं काय होइल हा खरा विचारात घ्यायचा प्रश्न आहे.

वाचक हो या सगळ्या प्रश्र्णांमुळे ॠषी कुमार अस्वस्थ झाला होता फार विचार केल्या नंतरही त्याला या प्रश्र्णांची समाधानकारक उत्तरे सपडली नाहीत ?

जिवावर बेतल्याची भावना निर्माण झाल्यानं ॠषी कुमारचं मानसिक संतुलन ढळले आहे, संकटकाळी हे प्रत्येकाच्या बाबतितही होउ शकतं, पहिल्यांदाच हे घडलं असेल तर त्याला थोड्याफार कौनसेलिंग नंतर त्याचं आयुष्य पुन्हा पुर्ववत होउन जाइल, ह्या घटना क्रमात त्याने अस्वस्थ होण्यासारखं काहीही नाही.

तुम्ही त्याला उत्तर शोधायला मदत करु शकता का ?

आमच्या हातातले प्रयत्न करायला आमची हरकत नाही.

सस्नेह's picture

7 Feb 2013 - 9:14 pm | सस्नेह

फारच ब्वा प्रश्ण पडतात तुमच्या रुशीकुमाराला...
अभ्यास करावे, फस्टकलास मिळवावा अन कुठतरी मस्त राजर्षी नाहीतर महर्षी व्हायचं सोडून प्रश्ण कशाला करत बसावं ?

रमताराम's picture

10 Feb 2013 - 5:09 pm | रमताराम

मग त्या ऋषीकुमाराने त्या शिंविणीला 'मा शिंविणी कश्चित...' वगैरे शाप दिला का? की प्रणयोत्सुक जोडीबाबत घडलेल्या प्रसंगातून प्रेरणा घेऊन त्या ऋषीकुमाराने एखादे नवे रामायण लिहिले? मग त्याचा कॉपिराईट एव्हाना संपला असेल ना? म्हणजे ५०/- रु. पुस्तक योजनेत छापायला आता परवानगी मिळाली असेल ना? त्या मागे राहिलेल्या हरिणीला जोडीदार मिळाला की नाही दुसरा? का हरणांमधेही गतधवा स्त्रियांनी उरलेले आयुष्य एकटे व्यतीत करण्याची सक्ती आहे? त्या सिंहिणीच्या पिल्लांचे काय झाले? आपल्या आईच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून त्यांन कल्याण गंगवाल यांच्याबरोबर 'शाकाहाराचा पुरस्कार करण्याची' शपथ घेतली? की हरणीला नंतर पिल्ले झाली नि 'हमारे बाप के खून का बदला लेंगे' म्हणत त्यांनी 'नि:सिंह पृथ्वी करण्याची गर्जना केली?' बरेच प्रश्न पडले आहेत या भिल्लकुमाराला पण सध्या टंकाळा आल्याने एवढेच पुरेत.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Feb 2013 - 2:19 pm | परिकथेतील राजकुमार

झाडावरती बसून भलते सलते विचार करणे आणि ते प्रश्नरुपानी इतरांवरती फेकणे हा प्रकार मिपा अस्तित्वात आल्यापासून सुरु झाला असे मला वाटत होते. पण हा प्रकार फार प्राचीन दिसतो.

ऋषिकेश's picture

12 Feb 2013 - 2:34 pm | ऋषिकेश

बरं मग काय ठरलं? ;)

नानांकडून प्रश्न साभार :)

प्रतिसादाबद्दल सगळ्यांना मनापासुन धन्यवाद,

सत्य किंवा खरे म्हणजे काय हा प्रश्र्ण मला बर्‍याच दिवसांपासुन सतावतो आहे. "सत्य म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे ते" "नेहमी खरे बोलावे" "खोटे बोलणे पाप आहे." इत्यादी लहानपणापासुन आपल्या मनावर बिंबवले जाते. मग आपण जगातल्या प्रत्येक गोष्टीची दोन प्रकारात विभागणी करायला शिकतो. खरे किंवा खोटे, चांगले किंवा वाईट. आपल्या दॄष्टीने समोर येणारा प्रत्येक माणुस हा राम असतो किंवा रावण. एकदा त्यांची या प्रकारात विभागणी झाली की मग आपण त्याच दॄष्टीकोनातुन त्यांच्या कडे पाहु लागतो.

चिरीमीरी घेणारा ट्रॅफिक पोलीस दिसला की आपली प्रचंड तळमळ होते. तो लगेच रावणाच्या कप्यात जातो. पण जेव्हा आपण या रावणाच्या तावडीत सापडतो तेव्हा आपणही चिरीमीरी देउन निसटण्याचा प्रयत्न करतो किंवा "मी कोण आहे तुला माहित नाही बघुन घेईन" असले काहीतरी बोलत सुटतो. आपण वहातुकीचे चे नियम तोडले म्हणुन आपण सापडलो हे आपल्याला मुळी मान्यच नसते त्या वेळी.

रस्त्यावरुन उलट दिशेने येणारे प्रत्येक वाहन आपल्या मनाला प्रचंड यातना देते. पण आपण जेव्हा उलट दिशेने जातो तेव्हा मात्र आपली ती मजबुरी असते.

मोबाईल फोनचा उपयोग तर आपण खोटे बोलण्यासाठीच करत असतो. "अरे जरा एका अर्जंट मिटींग मधे आहे" असे आपण किती वेळा खरेखरे सांगतो?

म्हणजे एका बाजुला तथाकथीत असत्याचा आधार घेतल्या शिवाय आपल्याला जगता येत नाही. आणि तेच असत्य वाईट असते असे आपण आपल्या पुढच्या पिढीला मात्र ठासुन शिकवत असतो. जर घरात मुलगा खोटे बोलला तर केवढा गहजब होतो? पालक त्याला रागावतात, मारतातही, कधीकधीतर देवापुढे उभा करुन शपथ घ्यायला लावतात परत खोटे बोलणार नाही म्हणुन. ती शपथ खरोखर खरी असते का? आपण खोटेपणाने वागत असताना आपल्या आजुबाजुच्या लोकांनी मात्र खरेपणानेच वागावे असे आपल्याला सतत का वाटत असते?

मुद्दामच नेहमीच्या व्यवहारातली साधी उदाहरणे घेतली आहेत. जसजशी आपण विचारांची पातळी उंचावत जाउ तशी ही खर्‍या खोट्याची व्याख्या अधिकच गहन होत जाते. माझी जात, माझा धर्म, माझे राष्ट्र असे सगळे विचार आपल्या डोक्यात भिनवले जातात. आणि मग त्या त्या प्रकारच्या चष्म्यातुन आपण प्रत्येक गोष्टीकडे बघायला लागतो.

उदा तालिबानने अमेरीकेवर हल्ला केला. अनेक निरपराध नागरीक या हल्ल्यात मारले गेले. हा हल्ला करणारे तालिबान्यांच्या दॄष्टीने फार चांगले होते. कारण त्यांनी धर्मरक्षणासाठी हा हल्ला केला होता. पण अमेरीकन लोकांच्या तळपायाची आग मात्र मस्तकात गेली. त्यांनी लगेच शस्त्रे पारजून अफगाणीस्तानवर हल्ला केला. पण त्या हल्ल्यांमधे शेकडो निरपराध अफगाण नागरीकही मारले गेलेच ना? मग नक्की बरोबर कोण होते? या घटनेवर बर्‍याच भारतियांची प्रति़क्रीया होती बरे झाले अमेरीकेचा माज आता उतरेल. पण जेव्हा मुंबईवर अतिरेकी हला झाला तेव्हा?

म्हणजे एकाच घटनेकडे वेगवेगळ्या नजरेने पाहीले तर सत्य बदलु शकते. मग मी जेव्हा सत्य बोलत असतो तेव्हा मी फक्त एखाद्या घटने बद्दलचा माझा दॄष्टीकोन मांडत असतो.

समाजाने मान्य केलेल्या दॄष्टीकोनातुन जो वागत नाही आपण त्याला गुन्हेगार किंवा वेडा ठरवुन मोकळे होतो. त्या साठी आपण एक न्याय व्यवस्था सुध्दा उभी केली आहे. पण खरोखर आपण कोणाचा न्याय करण्यास पात्र आहोत का? परिपूर्ण सत्य समजल्या शिवाय केलेला न्याय हा न्याय असु शकतो का? आणि परिपूर्ण सत्य आपल्याला कधी समजु शकते का?

ज्याच्या पापांचा रांजण भरला होता त्या वाल्याचा वाल्मीकी झाल्यावर शिकार्‍याला शाप द्यायचा अधिकार मिळाला? कदाचित ही गोष्ट अतीरंजित किंवा खोटीही असेल पण लहान पणापासुन माझ्या डोक्यावर मारली गेली. आणि तेच चांगले असते असे मला शिकवले गेले. पण आपण करत असलेल्या तथाकथीत न्यायाची भलावण करण्या साठी अशा अनेक गोष्टी रचुन त्या लहानपणापासुन आपल्या मनावर बिंबवल्या जातात. नशीब, दैव, पुर्वसंचीत इत्यादी हे त्याचेच प्रकार.

चांगले चांगले नाही आणि वाईट वाईट नाही हे समजल्या पासुन मी गोंधळात पडलो आहे. चांगले / सत्य किंवा वाईट / असत्य कसे ठरवायचे हेच मला कधीकधी समजत नाही मग मी असले काहीतरी प्रश्र्ण विचारतो.

अग्निकोल्हा's picture

13 Feb 2013 - 6:19 pm | अग्निकोल्हा

चांगले चांगले नाही आणि वाईट वाईट नाही हे समजल्या पासुन मी गोंधळात पडलो आहे. चांगले / सत्य किंवा वाईट / असत्य कसे ठरवायचे हेच मला कधीकधी समजत नाही मग मी असले काहीतरी प्रश्र्ण विचारतो.

सर्वप्रथम इतिहासातुन व कल्पना रंजनेतुन बाहेर या, वर्तमानात विचाराने स्थिर व्हा. जग परमेश्वराच्या न्हवे तर फक्त व फक्त माणसाच्या नजरेतुनच बघायला शिका. कारण परमेश्वरच मुळात माणसाच्या नजरेतुन बघितला जातोय म्हणून ओ आहे अथवा नाहीच्या फंदात पडु नका.

आणि महत्वाचं म्हणजे चांगलं केलं की त्याचे रिटर्न चांगले येतात वाइट केलं कि त्याचे रिटर्न वाइट येतात (कधी ना कधी आज ना उद्या अथवा नेक्स्ट जन्मात ) हा गोड गैरसमज सर्वप्रथम नाहीसा करा, बाकिच्या सगळ्या गोश्टी आपोआप सोप्या होतील.

मार्कस ऑरेलियस's picture

13 Feb 2013 - 5:40 pm | मार्कस ऑरेलियस

हे ह्या अशा गोष्टी होतच राहतात ...

आपण साक्षी स्वरुप होवुन पहात रहावे , आपले कर्म करत रहावे इतकेच ...बस्स .

कशात गुंतुन पडु नये !!

रमताराम's picture

13 Feb 2013 - 8:28 pm | रमताराम

आम्हाला तर यत्र तत्र गुंतून घ्यायला आवडते. गुंतवणूक झाल्यावर त्यातून निर्माण होणार्‍या सुख-दु:ख, माया-वैर, सहकार-स्पर्धा या सार्‍या सार्‍यातून आम्हाला आमच्या माणूसपणाची खात्री पटते. आम्ही चुका करतो म्हणून आमच्या जगण्यात मजा आहे. चुका दुरूस्त करण्यात, स्वत:ला आणखी आणखी समृद्ध करत जाण्यात आयुष्याचा आनंद घेत नि देतही जातो आम्ही. तेव्हा हे असं साक्षीभावाने राहणं वगैरे एकतर फारच टोकाचे आणि आयुष्याकडे पाठ फिरवून बसण्यासारखे. आखाड्यात उतरून दोन द्याव्यात दोन घ्यावात, मग दोघांनी मिळून मस्त ठंडाईचा एक एक पतियाळा मारावा असे मस्त आयुष्य असावे. आमचे बाकीबाब आम्हाला सांगून गेलेत ते तंतोतंत पटतं बघा आम्हाला.

॥ मज लोभस हा इहलोक हवा ॥

स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा ।
तृप्ती नको, मुक्ती नको, पण येथील हर्ष नी शोक हवा ॥

शोक हवा, परि वाल्मिकीच्या परी, सद्रव अन् सश्लोक हवा ।
हर्ष हवा, परि स्पर्शमण्यापरि त्यात नवा आलोक हवा ॥

शंतनुचा मज मोह हवा, अन् ययातीचा मज देह हवा ।
पार्थाचा परि स्नेहविकंपित सार्थ सदा संदेह हवा ॥

इंद्राचा मज भोग हवा, चंद्राचा हृद्रोग हवा ।
योग असो, रतिभोग असो, अति जागृत त्यात प्रयोग हवा ॥

तापासह अनुताप हवा, मज पापासह अभिशाप हवा ।
शिळेत पिचता, जळातुनी मज निळा निळा उ:शाप हवा ॥

मार्क्साचा मज अर्थ हवा अन् फ्रॉयडाचा मज काम हवा ।
यां असुरापरि राबविण्या घरी गांधींचा मज राम हवा ॥

लोभ हवा मज गाधिज मुनिसम, अखंड आंतरक्षोभ हवा ।
पराभवातही अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षोभ हवा ॥

पार्थिव्यातच वास हवा, परि दिव्याचा हव्यास हवा ।
शास्त्राचा अभ्यास हवा परि मानव्याचा ध्यास हवा ॥

विश्व हवे, सर्वस्व हवे अन् मृत्यु समोर सयंत्र हवा ।
शरात ही विव्हलता परि, उरात अमृतमंत्र हवा ॥

हविभुक् सुरमुख मी वैश्वानर, नित्य नवा मज ग्रास हवा ।
हे सुख दुर्लभ, वाढविण्या मज चौर्याशीत प्रवास हवा ॥

- बा. भ. बोरकर

पैसा's picture

13 Feb 2013 - 8:31 pm | पैसा

मला पण असे हावरट व्हायला लै आवडेल!

विकास's picture

13 Feb 2013 - 8:40 pm | विकास

रामायण-महाभारत आणि चौर्‍यांशी योनी देखील (मान्य) हव्यात. :-)

एनी वे, माझी देखील ही आवडती कविता आहे. पुलंच्या तोंडून प्रत्यक्ष (लाईव्ह) कार्यक्रमात ती ऐकताना तर अक्षरशः डबल मजा है... असे झाले होते :-)

मार्कस ऑरेलियस's picture

13 Feb 2013 - 9:10 pm | मार्कस ऑरेलियस

नशीबवान आहात रमताराम !

आपल्याला जो मार्ग आवडतो तो आपण आचरणात आणु शकताहात ... हेवा वाटतो आम्हाला तुमचा !!

आमचा मार्ग कदाचित रुक्ष आहे पण आम्हाला तोच बरा वाटतो कारण तुमचा मार्ग स्विकारला तर आम्ही "जोकर" होवुन जाऊ नक्कीच !!

-----------------------------------------------------------------------
I am an angel of chaos.