शाळा - दहावी.
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
10th ची exam declare झाली. आयुष्यातला beautiful period खल्लास. Fundoo मजा केली शाळेत. बंटीची बॉडी उतरली, तरी बरे बंटीने ९ वीत सिगारेट सोडली. मला पण जाम कंटाळा येतो आजकाल सिगरेटचा. पमी कधी कधी कंपनी देते, पण ली भित्री आहे, चोरून चोरून ओढते. पमी पहिली टायगरची compass होती. त्यानेच तिला सिगरेट ओढायला लावले. साला तिला घेवून सिनेमेक्स ला morning show जायचा. टायगर च्या बापूची transfer झाली , कोण म्हणतो uncle ला हाकलले. तो साला पाहिजे होता १० वीत. टायगरला रोबर्टपण घाबरायचा. Science period ला रोज पमी ला घेवून बसायचा बाजूला. कधी कायपण बोलला नाय रोबर्ट त्याला. तशी पमी सहावीतच upgrade झाली होती. Do not know पम्मी पण ब्रेनी आहे .आकाश आणि टायगर दोघेपण पम्मीच्या मागे लागलेले. टायगरला एक वर्ष पम्मीला पटवायला. तो गेला आणि ती साली एकदम म्हातारी दिसायला लागली. जाऊदे आपली भाभी आहे. त्या आकाश बेवाड्याने टीन ला प्रपोज मारले ती नाही म्हणाली तर दिप्डी ला पटवले. दिप्डी काय CUG account आहे.
रोबर्ट साला कोणालाच काय बोलायचा नाय. North India Picnic पोरांनी जाम धमाल केली. रोबर्ट देखून पाहून पण गप्प. आकाश तर full charge. रोबर्टने monkey cap घातलेली, ओळखलच नाय तो रोबर्ट आहे , त्यालाच सांगतो – सोडा पाहिजे होता, नुसत्या पाण्यात मजा नाय. आकाश ने बापूची चोरली की चाचूची god knows. योगेश सर असते तर आकाश ला hang केले असते. योगेश सर जाम कडक, मिलीटरीत होता, कशाला घाबरेल? तो पिकनिक ला आला नाही bcoz बबली आली नाही.
बबली चा holder seriel मध्ये act करतो, मजबूत आहे, पण तरी तीला हा मिलिटरीमन हवा. योगेश सर तर बोलतात widower आहे, कोण बोलतो त्याने बायकोचा खून केला. रोबर्ट समोर smoke केले तर बोलतो, शाळेत जो कोणी smoke केले तर मामुला सांगेन. कोण घाबरताय त्या मामुला? सगळे फाट्यावर मारतात ....आणि तो पण ओढतोच ना.
टीनची फिल्म tube आहे, साली 9 th ला असेल त्यावेळी पण BJ काय मारलाय. तो पोरगा पाचगणीला public school ला आहे. टीनला Bollywood जायचे आहे. सालीची पहिली फिल्म इतकी hit – hot गेली.
राम आणि बनी 8th पासून स्टेबल आहेत. ते तर दोघे लग्न झाल्यासारखेच वागतात, घरी जातात एक दुसऱ्याच्या, study करतात एकत्र. दोघांचे parents family friends आहेत. आपली rank 3rd. हया दोघांची competition. राम्या पण साला अभ्यासाला कडक. तासाला जरापण नजर नाही जात बनीवर. साले kissing, fondling करतात पण नंबर काढतात. माझी GF असती तर मला काय एवढे नंबर घेता आले नसते – 3 rd rank चे. पण राम्याने त्याच्या anniversary फक्त मलाच KFC त नेले. राम्या, बनी आणि मी – १००० रपये झाले. साले एकदम नवरा नवरी सारखे वागतात. २ वर्षे झाली दोघांना पण साले serious प्रेम करतात time pass नाय. आकाश जळतो राम्यावर पण राम्या नाय घेत, नाय फुकत – त्याला अभ्यास आणि बनी सोडून दुनियाच माहित नाय. आणि हा आकाश भडवा huch dog सारखा पोरींचा वास काढत फिरतो. Parents चा D झाला, म्हणून teachers पण sympathy दाखवतात. आकाश ची मम्मी झाली सोज्वळ दिसायची, काय झाले काय माहित? बाप बेवडा आहेच आता हा पण बेवडा. बिजनेस चाचू बघतो असे आकाश सांगतो. बापाला जाम कर्ज आहे असे पण बोलला एकदा पम्मी जवळ. पम्मी काय मिठीबाई ला जाईल. मग भेटणार नाय. टायगर गेला तरी आपल्याशीच close राहिली. आकाश तर फेल जाणार आहे – साला रोज पितो, काय अभ्यास करणार. राम्या – बनी वृध्दाश्रमात जाणार – रुपारेलच्या की रुईया च्या वृध्दाश्रमात तेवढे पहायचे. मला नाय जायचे त्या घाटी वृध्दाश्रमात. साठे पण वृध्दाश्रमच. confusion आहे. बापू तर पैसे फेकेल नुसते – मम्मी ला काय समजते. जावू दे. exam होवू दे result लागू दे मग पाहू. टीन म्हणते ती पाचगणी ला जाणार. मग काय रोज हनिमून. तिची friend शेफाली चा काय problem कळत नाय. कोण म्हणत तिला gynac problem आहे कोण म्हणतो तिचे summer vacation ला abortion झाले. ती काय जाणार नाही येथून – मारवाडी community मध्ये असे पोरींना hostel वर नाही ठेवणार. तिचा बाप शेअर मध्ये जाम छापतो. मामू चा जिगरी दोस्त आहे असे टायगर सांगायचा. आपल्या बापूने पण शेअर मध्ये लावले होते पैसे – मम्मी भांडायची – बुडाले असणार. आपला बापू एकदम casual आहे. सिगारेट पिताना मला पाहून पण काय बोलला नाय – मला वाटले होते, वाजणार एक कानाखाली – मम्मीला मारतो तशी – पण काय झाले – काय माहित. एकदा समजले बरे झाले आता tension नाय.
पम्मी जिथे जाईल तेथेच जावू या. सिगारेट ला पण कंपनी होईल. टायगर ने दुसरा आय.डी घेतला पण असेल. पम्मी जिथे काय रुपारेल रुईयात येणार नाही. भवन्स ला आली तर आपण जावू तेथेच. तिलाच मारू propose –– pre owned म्हातारी. १२ पर्यन्त राहील पुढचे पाहू पुढे.
प्रतिक्रिया
अतिशय वास्तववादी! प्रातिनिधीकच म्हणाव असं नसुनही...
दिल्से
बरंचसं समजलं नाही...
बापरे!
हम्म..
वर्सोवा ते अंधेरी स्टेशन .
तर्री, तुम्हाला लय कळतं राव!
प्रत्यक्षात याच्या पेक्षाही वाईट अवस्था आहेत....
चुकून पुन्हा उघडले