हात जोडुन विनंती करतो. हे असले शेंडा बुडखा नसलेले धागे टाकु नका हो. काहितरी लिहा. त्या आकाशदिव्याकडे बघुन काय करु नाहितर आम्ही. आणि तो फ्रोक (फ्रॉक म्हणायचे असावे बहुधा तुम्हाला) नक्की कुणाचा आहे? सन्नी लिओन, कॅटरिना, करीना कपूर वगैंरेंचा असेल तर आम्ही किमान आशाळभूतपणे बघु तरी. हे नुसतेच असले फोटो काय टाकताय?
स्वतीश्रीबापट, तुम्ही आकाशदिव्यावर घेतलीत तशीच थोडी अजून मेहनत शुद्धलेखनावर आणि ज्याचा फोटो टाकाल ती वस्तू कशी कशी बनवली, ही माहिती लिहिण्यावर घेतलीत तर धाग्यात अर्थ निर्माण होईल.
हा आकाशदिवा कसा केला ते सांगा ना ताई! आम्हालाही ट्राय करता येईल. असे एकोळी धागे टाकण्याची परवानगी मिपावर नाही हे धोरणांमध्ये लिहिले आहे. नवीन असल्यामुळे जर आपणास टंकण्यास अडचण येत असेल तर आधी सराव करावा ही विनंती. फारतर दोनेक दिवसांच्या सरावाने साधे लिहिणे जमून जाते. अगदी काही वेगळी अक्षरे टंकणे लक्षात ठेवण्यासाठी आठ पंधरा दिवस लागतात. आधी इतरांच्या धाग्यांवर प्रतिसाद द्या. तुमची ओळख इतरांना होईल. आता जी चेष्टा होत आहे ती होण्याची 'शक्यता' कमी होईल. तरीही राग मानू नका.
धोरणांमध्ये याबद्दल उल्लेख आहे व ती नव्या सदस्यांनी वाचणे अपेक्षित आहे. शिवाय नवीन असताना आधी दुसर्यांना प्रतिसाद द्याल की नाही? अनेकदा नवे सदस्य येतात आपले चार दोन फोटू टाकून, कौतुक करून घेऊन पुन्हा फिरकत नाहीत. बरं, हजारो सदस्यांमध्ये कोण कुणाला शोधत बसणार? रेवति, रेवती, रेवती १, रेवतीमी अश्या नावाच्या सत्राशेसाठ सदस्या असल्या तर किती लक्ष द्यायचे? हे असे कुठे लिहिता येत नाही म्हणून मग आम्ही सदस्यांवरच सोडतो. ते हे काम बरोब्बर करतात. ;)
हे असे कुठे लिहिता येत नाही म्हणून मग आम्ही सदस्यांवरच सोडतो. ते हे काम बरोब्बर करतात. - आणि सदस्य हे काम जास्त उत्साहानं करायला लागले की त्यांना संपादक बनवता हो क्की नाही रेवतीआज्जी.
धन्यवाद. 7 Dec 2012 - 12:37 am | परिकथेतील राजकुमार
कोणीतरी संपादक हा विषय काढण्याची वाटच बघत होतो. धन्यवाद.
धोरणांमध्ये याबद्दल उल्लेख आहे व ती नव्या सदस्यांनी वाचणे अपेक्षित आहे.
आपण जेव्हा एखादे सॉफ्टवेअर इंस्टॉल करतो, अगदी गेला बाजार फ्लॅश प्लेयर किंवा रिडर ऑनलाईन अपग्रेड करतो तेव्हा कितीवेळा आणि कोण कोणत्या सॉफ्टवेअरची धोरणे आपण वाचलेली असतात ? आपल्यापैकी किती लोकांनी फेसबुक / ऑर्कुट / जीमेल वर सभासदत्व घेताना तिथली सर्व धोरणे वाचली आहेत ? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली की मग संस्थळाची धोरणे वाचण्याची अपेक्षा धरणे किती गंमतीचे आहे ते लक्षात येईल.
शिवाय नवीन असताना आधी दुसर्यांना प्रतिसाद द्याल की नाही? अनेकदा नवे सदस्य येतात आपले चार दोन फोटू टाकून, कौतुक करून घेऊन पुन्हा फिरकत नाहीत. बरं, हजारो सदस्यांमध्ये कोण कुणाला शोधत बसणार? रेवति, रेवती, रेवती १, रेवतीमी अश्या नावाच्या सत्राशेसाठ सदस्या असल्या तर किती लक्ष द्यायचे?
सदस्यत्व नोंदवल्यावरती जी ऑटो इमेल जायची व्यवस्था करण्यात आली आहे, त्या इमेल बरोबरच काही महत्वाची धोरणे पाठवण्याची व्यवस्था करणे शक्य होईल काय ? किंवा 'सभासदत्व घ्या' वरती क्लिकल्यावरती आधी धोरणांचे पान येईल आणि तिथून मग सभासदत्वाकडे जाता येईल असे काही करता येईल का ?
हे असे कुठे लिहिता येत नाही म्हणून मग आम्ही सदस्यांवरच सोडतो. ते हे काम बरोब्बर करतात.
आणि मग अशा सदस्यांचे नावाने शिमगा करत काही संपादकच मालकांकडे धाव घेतात. :)
सर्व तांत्रिक कामांसाठी मालकांना भेटावे. जे सदस्य अतिदंगा करतात त्यांचे प्रतिसाद संपादकमंडळ अप्रकाशित करते. त्यापुढील आगावूपणा मालकांच्या कानावर घालण्याची सूचना मालकांकडूनच आहे त्याचे संमं पालन करते. ज्यांना हे मान्य नाही त्यांनी तर संपादकांविषयीच्या आपल्या तक्रारी घेऊन मालकांना लगोलग प्रत्यक्ष, फोनवर किंवा जसे जमेल तसे भेटावे. मी यापुढील कोणतेही एक्सप्लनेशन देणे लागत नाही हे स्पष्टपणे सांगू इच्छिते.
मी यापुढील कोणतेही एक्सप्लनेशन देणे लागत नाही हे स्पष्टपणे सांगू इच्छिते.
मी कधी आणि कुठे एक्सप्लनेशन मागितले बॉ ? मी तर उलट 'असे काही करता येईल का?' ह्या सदरात २/३ तांत्रिक चौकशा मिपाच्या पटलावरती ठेवल्या आहेत. संबंधीत (तांत्रिक विभागाशी) लोक्स ते वाचतील आणि विचार करतील. ते व्हायलाच पाहिजे, किंवा करायलाच हवे असा आमचा आग्रह नाही. रादर ज्यांना मिपावरती काय करता येईल ह्याची जाण आहे त्यांना ऑलरेडी त्यांचा संबंधीत पदभार मिळालेल आहे, ते त्याचा विचार करतीलच. त्यामुळे मालकांना वैग्रे भेटून त्यांच्या व्यस्त वेळात त्रास देण्याची इच्छा नाही. ह्या चौकशा फाट्यावरती मारल्या तरी आम्हाला काही अडचण नाही. आम्हाला फाट्यावरती मारले तरी देखील हरकत नाही.
बाकी शेवटच्या ओळीतील प्रतिसाद हा 'लेकी बोले सुने लागे' ह्या धर्तीवरती आहे हे सांगावे लागेल काय? ;) आणि मुख्य म्हणजे आम्हाला काय मान्य आहे आणि काय मान्य नाही, ह्याचा संबंधच कुठे येतो? आम्ही कोण मोठे टेकोजीराव लागून गेलो आहोत बॉ ?
आणि सगळ्यात महत्वाचे :- संपादकांच्या (दिव्य) दृष्टीने कोण सभासद अतिदंगा करणारा आहे किंवा आगाऊपणा करणारा आहे त्याच्याशी आम्हाला काय करायचे आहे ? मी कुठेही संपादकांनी काय करावे आणि काय करू नये असे सुचवलेले नाही. मी फक्त 'काही संपादक' काय करतात ते स्पष्ट भाषेत लिहिलेले आहे. ते योग्य आहे / चुक आहे/ त्यांनी तसे करावे / करु नये ह्या विषयी मी कुठलेही मतप्रदर्शन केलेले नाही.
मी यापुढील कोणतेही एक्सप्लनेशन देणे लागत नाही हे स्पष्टपणे सांगू इच्छितो. (विचारणार कोण आहे हा भाग वेगळा)
प्रतिक्रिया
6 Dec 2012 - 6:21 pm | मृत्युन्जय
हात जोडुन विनंती करतो. हे असले शेंडा बुडखा नसलेले धागे टाकु नका हो. काहितरी लिहा. त्या आकाशदिव्याकडे बघुन काय करु नाहितर आम्ही. आणि तो फ्रोक (फ्रॉक म्हणायचे असावे बहुधा तुम्हाला) नक्की कुणाचा आहे? सन्नी लिओन, कॅटरिना, करीना कपूर वगैंरेंचा असेल तर आम्ही किमान आशाळभूतपणे बघु तरी. हे नुसतेच असले फोटो काय टाकताय?
6 Dec 2012 - 6:21 pm | परिकथेतील राजकुमार
असा 'आकश दीव' गेल्या १०००० वर्षात बनला नाही आणि बनणार नाही !
6 Dec 2012 - 6:36 pm | किसन शिंदे
:D
(दुरूस्ती केल्या गेली आहे.)
6 Dec 2012 - 7:14 pm | तिमा
लहानपणी दोन पैशाच्या छोट्या पतंगाला मारुतीएवढी लांब शेपटी लावून उडवायचो, त्याची आठवण झाली.
वो तेरी यादमें अब याद आया!
शंका: आकाशदिव्यांत दिवा का नाही ?
6 Dec 2012 - 7:27 pm | कवितानागेश
दिवा आकाशात असतो! :D
6 Dec 2012 - 10:59 pm | अत्रुप्त आत्मा
6 Dec 2012 - 6:25 pm | शिद
मिपाचे लवकरच चेपू होणार बहुतेक...तुमच्या सगळ्या कला एकत्रितपणे एकाचं धाग्यात संदर्भासहीत टाकल्यास फार उत्तम होईल...
6 Dec 2012 - 7:02 pm | कवितानागेश
स्वतीश्रीबापट, तुम्ही आकाशदिव्यावर घेतलीत तशीच थोडी अजून मेहनत शुद्धलेखनावर आणि ज्याचा फोटो टाकाल ती वस्तू कशी कशी बनवली, ही माहिती लिहिण्यावर घेतलीत तर धाग्यात अर्थ निर्माण होईल.
6 Dec 2012 - 7:44 pm | जेनी...
बिच्चारीने ईन मीन तीन शब्द लिवलेत , त्यात पण मेलं हे शुद्धलेखन तपासायचं का?? :-/
माझा बै निसेध :-/
6 Dec 2012 - 7:15 pm | स्वातीश्रीबापट
प्रतिसादा बद्दल धन्यवाद. मी मि पा वर नवीन आहे.
6 Dec 2012 - 7:21 pm | जेनी...
अय्या खरच ??? ;) :)
मी पण मी पा वर नविन आहे :) :D
6 Dec 2012 - 7:38 pm | अभ्या..
थोडासा उशीर झाला बघा :(
नाहीतर हा दिवा आपण मिपाच्या दिवाळीअंकाच्या कव्हरवर टांगला असता.
6 Dec 2012 - 7:54 pm | श्रीमत
तो आकशदिवा आहे अस सान्गअव पन लाग्त........
6 Dec 2012 - 8:30 pm | रेवती
हा आकाशदिवा कसा केला ते सांगा ना ताई! आम्हालाही ट्राय करता येईल. असे एकोळी धागे टाकण्याची परवानगी मिपावर नाही हे धोरणांमध्ये लिहिले आहे. नवीन असल्यामुळे जर आपणास टंकण्यास अडचण येत असेल तर आधी सराव करावा ही विनंती. फारतर दोनेक दिवसांच्या सरावाने साधे लिहिणे जमून जाते. अगदी काही वेगळी अक्षरे टंकणे लक्षात ठेवण्यासाठी आठ पंधरा दिवस लागतात. आधी इतरांच्या धाग्यांवर प्रतिसाद द्या. तुमची ओळख इतरांना होईल. आता जी चेष्टा होत आहे ती होण्याची 'शक्यता' कमी होईल. तरीही राग मानू नका.
6 Dec 2012 - 8:46 pm | स्वातीश्रीबापट
रेवती ताई आपल्या प्रेमळ सल्ल्या बद्दल खूप खूप आभारी आहे.
7 Dec 2012 - 10:46 pm | प्यारे१
वरील प्रतिसादाने आपल्या नवखेपणा बद्दल बुचकळलो गेलो आहे. ;)
7 Dec 2012 - 11:44 pm | हारुन शेख
मिश्कीलपणाची हद्द आहे.
6 Dec 2012 - 8:36 pm | सस्नेह
नवीन सदस्यांना 'पासवर्ड' देताना अलिखित नियमांचीही थोडीफार कल्पना द्यावी. यामुळे नवीन सदस्यांचा हिरमोड होणे बंद होईल अन मिपाचीही प्रतिष्ठा राखली जाईल.
6 Dec 2012 - 8:46 pm | रेवती
धोरणांमध्ये याबद्दल उल्लेख आहे व ती नव्या सदस्यांनी वाचणे अपेक्षित आहे. शिवाय नवीन असताना आधी दुसर्यांना प्रतिसाद द्याल की नाही? अनेकदा नवे सदस्य येतात आपले चार दोन फोटू टाकून, कौतुक करून घेऊन पुन्हा फिरकत नाहीत. बरं, हजारो सदस्यांमध्ये कोण कुणाला शोधत बसणार? रेवति, रेवती, रेवती १, रेवतीमी अश्या नावाच्या सत्राशेसाठ सदस्या असल्या तर किती लक्ष द्यायचे? हे असे कुठे लिहिता येत नाही म्हणून मग आम्ही सदस्यांवरच सोडतो. ते हे काम बरोब्बर करतात. ;)
6 Dec 2012 - 11:20 pm | ५० फक्त
हे असे कुठे लिहिता येत नाही म्हणून मग आम्ही सदस्यांवरच सोडतो. ते हे काम बरोब्बर करतात. - आणि सदस्य हे काम जास्त उत्साहानं करायला लागले की त्यांना संपादक बनवता हो क्की नाही रेवतीआज्जी.
7 Dec 2012 - 12:37 am | परिकथेतील राजकुमार
कोणीतरी संपादक हा विषय काढण्याची वाटच बघत होतो. धन्यवाद.
आपण जेव्हा एखादे सॉफ्टवेअर इंस्टॉल करतो, अगदी गेला बाजार फ्लॅश प्लेयर किंवा रिडर ऑनलाईन अपग्रेड करतो तेव्हा कितीवेळा आणि कोण कोणत्या सॉफ्टवेअरची धोरणे आपण वाचलेली असतात ? आपल्यापैकी किती लोकांनी फेसबुक / ऑर्कुट / जीमेल वर सभासदत्व घेताना तिथली सर्व धोरणे वाचली आहेत ? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली की मग संस्थळाची धोरणे वाचण्याची अपेक्षा धरणे किती गंमतीचे आहे ते लक्षात येईल.
सदस्यत्व नोंदवल्यावरती जी ऑटो इमेल जायची व्यवस्था करण्यात आली आहे, त्या इमेल बरोबरच काही महत्वाची धोरणे पाठवण्याची व्यवस्था करणे शक्य होईल काय ? किंवा 'सभासदत्व घ्या' वरती क्लिकल्यावरती आधी धोरणांचे पान येईल आणि तिथून मग सभासदत्वाकडे जाता येईल असे काही करता येईल का ?
आणि मग अशा सदस्यांचे नावाने शिमगा करत काही संपादकच मालकांकडे धाव घेतात. :)
7 Dec 2012 - 12:51 am | रेवती
सर्व तांत्रिक कामांसाठी मालकांना भेटावे. जे सदस्य अतिदंगा करतात त्यांचे प्रतिसाद संपादकमंडळ अप्रकाशित करते. त्यापुढील आगावूपणा मालकांच्या कानावर घालण्याची सूचना मालकांकडूनच आहे त्याचे संमं पालन करते. ज्यांना हे मान्य नाही त्यांनी तर संपादकांविषयीच्या आपल्या तक्रारी घेऊन मालकांना लगोलग प्रत्यक्ष, फोनवर किंवा जसे जमेल तसे भेटावे. मी यापुढील कोणतेही एक्सप्लनेशन देणे लागत नाही हे स्पष्टपणे सांगू इच्छिते.
7 Dec 2012 - 11:17 am | परिकथेतील राजकुमार
मी कधी आणि कुठे एक्सप्लनेशन मागितले बॉ ? मी तर उलट 'असे काही करता येईल का?' ह्या सदरात २/३ तांत्रिक चौकशा मिपाच्या पटलावरती ठेवल्या आहेत. संबंधीत (तांत्रिक विभागाशी) लोक्स ते वाचतील आणि विचार करतील. ते व्हायलाच पाहिजे, किंवा करायलाच हवे असा आमचा आग्रह नाही. रादर ज्यांना मिपावरती काय करता येईल ह्याची जाण आहे त्यांना ऑलरेडी त्यांचा संबंधीत पदभार मिळालेल आहे, ते त्याचा विचार करतीलच. त्यामुळे मालकांना वैग्रे भेटून त्यांच्या व्यस्त वेळात त्रास देण्याची इच्छा नाही. ह्या चौकशा फाट्यावरती मारल्या तरी आम्हाला काही अडचण नाही. आम्हाला फाट्यावरती मारले तरी देखील हरकत नाही.
बाकी शेवटच्या ओळीतील प्रतिसाद हा 'लेकी बोले सुने लागे' ह्या धर्तीवरती आहे हे सांगावे लागेल काय? ;) आणि मुख्य म्हणजे आम्हाला काय मान्य आहे आणि काय मान्य नाही, ह्याचा संबंधच कुठे येतो? आम्ही कोण मोठे टेकोजीराव लागून गेलो आहोत बॉ ?
आणि सगळ्यात महत्वाचे :- संपादकांच्या (दिव्य) दृष्टीने कोण सभासद अतिदंगा करणारा आहे किंवा आगाऊपणा करणारा आहे त्याच्याशी आम्हाला काय करायचे आहे ? मी कुठेही संपादकांनी काय करावे आणि काय करू नये असे सुचवलेले नाही. मी फक्त 'काही संपादक' काय करतात ते स्पष्ट भाषेत लिहिलेले आहे. ते योग्य आहे / चुक आहे/ त्यांनी तसे करावे / करु नये ह्या विषयी मी कुठलेही मतप्रदर्शन केलेले नाही.
मी यापुढील कोणतेही एक्सप्लनेशन देणे लागत नाही हे स्पष्टपणे सांगू इच्छितो. (विचारणार कोण आहे हा भाग वेगळा)
7 Dec 2012 - 11:50 am | सस्नेह
मी 'अलिखित' नियमांविषयी म्हटले, रेवती.
धोरण लिखित आहे. दोन धाग्यांमधील कालांतर कुठेही लिखित नाही.
7 Dec 2012 - 10:51 am | ५० फक्त
एक आकाशकंदिल काय लावला, केवढा उजेड पडला धोरणांवर, माताय आकाशदिवा नाही डायरेक माहितीअधिकाराचा अर्जच झाला.
नवे,जुने,वाचनमात्र,धागामात्र सर्व प्रकारचे सदस्य आणि सर्व संपादक व सल्लागार मंडळ तसेच मालक हा प्रतिसाद विनोदाने दिलेला आहे हे समजतील अशी अपेक्षा.
7 Dec 2012 - 11:33 am | मोदक
एखाद्या गोष्टीवर "प्रकाश पडला" ऐवजी त्या गोष्टीवर "आकाशकंदील लागला" अशी म्हण रूढ व्हावी काय?
7 Dec 2012 - 7:25 pm | इनिगोय
'आकाशदीवा' लागला (दि दिव्यातला नव्हे, म्हणजे 'दिव्य' या अर्थी..) असे म्हणा, नेमकं लक्षात येईल. :P
7 Dec 2012 - 10:21 pm | तर्री
हया अश्या आकाश दिव्यात "दिवा" असणे आवश्यक नाही का ?
जरा आत दिवा लावून फोटो काढला असतात तर ?
संपादित
अशी एक अती ग्रामीण म्हण आठवली .
7 Dec 2012 - 11:44 pm | दादा कोंडके
या एकोळी धाग्याच्या निमित्ताने येउद्या आणखी म्हणी! :)
7 Dec 2012 - 11:52 pm | हारुन शेख
सोज्वळ धाग्यावर अत्यंत ग्राम्य प्रतिसाद. ती म्हण आठवायची उबळ आवरता आली असती. निषेध.