दम (दिलेली) बिर्याणी.

स्पंदना's picture
स्पंदना in पाककृती
3 Dec 2012 - 2:31 pm

" हे बघ तू उगा मला त्या गणपा अन सानिकाची कारणे नको देउ." माझा नवरा मला जेवता जेवता सुनवत होता.
"अरे पण ऐक तरी...." मी मध्येच त्याच बोलण तोडायचा प्रयत्न केला. पण तोवर माझ्या नवर्‍याने सानिकाच्या पराठ्याचा तुकडा तोडुन तो गणपाच्या खिम्यात खुपसला होता. तुकडा भरुन गणपाचा खिमा तोंडात कोंबत त्यान पुन्हा मला फैलावर घ्यायला सुरुवात केली." ये बद, तुगलन मनजे काय सापसपाई कलनाली...ऑम ऑम्...वाटली का तुला? अग सुगरण म्हणजे कशी अशी लोणच्यासारखी स्वयंपाकघरात मुरलेली पाहिजे. खाराशिवाय जस लोणचं तशी तेलाचे, तिखटामिठाचे डाग असल्याशिवाय सुगरण" नवर्‍याने तारे तोडावे तसे शब्द तोडले.
कप्पाळ माझ!!! काय उपमा तरी सुचताहेत
तर मंडळी सीन आहे, रविवार दुपारच्या जेवणाचा. आता उगा कोणी इथे,'गणपा सुखरुप आहे का' याची चौकशी करु नये. आम्ही जेंव्हा तेंव्हा गंपाच्या खिम्यावर ताव मारत असतो, आणि तरी सुद्धा गणपा तिकडे निवांत जिवंत असतो. तसे आमच्याकडे सारे पदार्थ असे कुणाच्या तरी नावाला जोडलेलेच असतात. जागुचे मासे, रेवतीच्या इडल्या, सनिकाचे पराठे, अन स्वातिचे केक आम्ही जेंव्हातेंव्हा फस्त करत असतो. पण आज नवर्‍याला हा नविनच उद्योग सुचला होता. काय म्हणे तू सुद्धा तूझ्या (तू म्हणजे मी म्हणजे ...जाउ दे कप्पाळ!) पाककृती सादर कर.
अहो काय खाण्याची गोष्ट आहे होय मिपावर पाककृती सादर करण? काय ते चकचकीत स्वयपाकघर? काय ते मसाला ठेवण्याचे चमचे? काय ते निळ्यनिळ्या ज्वाळांचे गॅस, अन काय ती साफसफाई?
मी स्वयंपाक्घरात शिरले की माझा निव्वळ मुरारबाजी झालेला असतो. इकडे कुकरमध्ये डाळ तांदुळ, तिकडे कणकेच्या डब्यातून पिठ घेउन त्यात मिठ-तेल, त्यातलच थोड मिठ तांदळात अन तेल डाळीत. इकडे कांदे चिरायला घ्या तोवर तिकडे फ्रिजमधली भाजी काढुन घ्या. तोवर गॅसवर भांडे तापायला ठेउन, कणकेत पाणि मिसळा, तापलेल्या भांड्यात्........कळल ना?
अन हा(पक्षी नवरा..नवरा माणुसच आहे पक्षी नाही....जाउ दे कप्पाळ!) मला सांगतोय असल्या गदारोळातुन तयार होणार्‍या पदार्थांचे मी फोटो काढावेत अन त्याच्या पाककृती मी मिपावर चढवाव्या. शक्य आहे का?
" अरे पण असली बिर्याणी....." पुन्हा नवर्‍यान सानिकाच्या पराठ्याचा तुकडा गणपाच्या खिम्यात बुडवुन तोंडात कोंबला, " मग य्यांय्या कली मिलनाल्....खायला. तू टाकच ही पाककृती. मग बघ"
शेवटी हो ना करता करता मी रेसेपी टाकायला तयार झाले.
आता एव्हढा नवरा या बिर्याणीचा आग्रह का धरतो आहे, याचा थोडा उहापोह. तर झाल काय आमच लग्न थोडफार मुरायला लागल होत तेंव्हाची कथा. आता लग्न मुरायला लागल कस समजाव? तर जेंव्हा दोघेही न घाबरता एकमेकाच्या खोड्या काढायला लागतात तेंव्हा. तोवर एकमेकाला जपत दिवस निघत असतात, पण लग्न मुरायला लागल; की एकमेकाच्या खोड्या काढण सुरु होत. कुठ त्याच्या चहात मिठ घालुन स्वतः साखर घालुन निवांत पित रहाणे ( तो बिचारा हीला मिठ कस लागत नाही या विचाराने हैराण) सकाळी डबा भरताना त्याच्या आत, ठोसा मारणारा हात दाबुन भरणे असले सगळे उद्योग दुतर्फा सुरु झाले अन तरीही खुसुखुसु हसुन खपले जाउ लागले की समजाव लग्न मुरायला लागलय.
हां तर काय सांगत होते लग्न मुरायला लागल तेंव्हाची गोष्ट. आता जरा मला मुळ स्वयंपाक जमायला लागला होता अन आकांक्षांना (आकांक्षा म्हणजे मुलगी नव्हे...मुरादे...म्हणजे ...जाउ दे कप्पाळ!) पंख फुटायला लागले.भाकरी जमते, पोळी जमते; आता पुरणपोळी करुन बघावी का? रस्सा जमतो, मसाला जमतो, आता बटर चिकन करुन बघावे का? असे विचार मनात रूंजी घालु लागले होते. आमच्या माहेरी अन सासरी तश्या लय बिर्याण्या शिजायच्या. तुपाचा असा हातावर थर चढायचा, अन खोबर कोथंबीरीच्या थरातल मटण अस अल्लद पोटात रिचायचं. तर अशी थराची(थर म्हणजे लेअर्स्..म्हणजे ...मटण अन भात्...जाउ दे कप्पाळ!) बिर्याणी आता मलापण जमत होती. त्यातच एक दिवस टाईम्स मधे ही एक नवी रेसीपी वाचली, अन त्या रविवारी मी नवर्‍यान आणलेल्या मटणातल पाऊण किलो मटण ताब्यात घेतल. हेऽऽऽ वाद झाला. अस कच्च मटण घालुन कधी बिर्याणी करतात का? पासुन आईला (स्वतःच्या, माझ्या नव्हे) फोन करतो बघ! पर्यंत धमक्या झाल्या. पण मी काही बधले नाही. ही नविन प्रकारची बिर्याणी मी करणार म्हणजे करणारच!
तर सारा वेळ नवरा अक्षरशः एका कोपर्‍यात बसुन मटण वाया गेल म्हणुन हळहळत होता, अन मी काय व्हायच ते होउ दे, तसाही बोकड स्वर्गालाच पोहोचलाय अश्या निर्धाराने ही बिर्याणी करत होते.
अन काय मजा? जसजसा बिर्याणी शिजल्याचा वास दरवळायला लागला तसतसा नवरा कोपरा सोडुन हळु हळु पुढे सरकायला लागला. मग मात्र तिला(बिर्याणीला...) गॅसवरुन उतरायचा अवकाश अस्सा तुटुन पडला(नवरा ) म्हणुन सांगु! मग तेथुन पुढे अगदी मला लाडीगोडी लावुन बिर्याणी करण्याचा आग्रह सुरु झाला, अन आमच्या घरातुन तुपाच्या बिर्याणीची हद्दपारी झाली.
अशीच एकदा संध्याकाळी ही बिर्याणी करत होते, अन शेजारच्या शेट्टी आंटींचा जावई त्यांच्याकडे आला होता. त्याने शेवटी माझ्ह्या घराची बेल वाजवुन घरात काय शिजतय ते विचारल. त्याने सांगितलेल सांगते एक शब्द माझा नाही. "मै नेचे लिफ्ट के लिये खडा था उधरसे सोच रहा हूं। ये बढिया स्मेल क्या है। पुरी बिल्डींग मे खुशबु फैली है।" शेवटी शेजारचा जावई आमच्या टेबलावर जेउन गेला हे काय सांगायला हव?
तर मंडळी आता गप्पा बास. फार बोलता बाई तुम्ही. अश्यान मूळ कामं कशी व्हायची म्हणते मी.
तर घ्या सामानं.
१ किलो मस्त पालव्याच मटण (गोट अथवा बोकड. शक्यतो मेंढी(शीप) नको)
१ ते १ १/४ (सव्वा) किलो सुरेख बासमती तांदुळ
मॅरीनेशन:-
४ मध्यम कांदे.

ithe

१ वाटी तेल.
कांदे छानसे पातळ उभे कापुन घ्या. तेल गरम करुन त्यात हे कांदे ब्राउन??? हां सोनेरी रंगाचे होइतो तळुन घ्या.
तळल्यावर कांदा काढुन घ्या अन तेल जपुन ठेवा. (येस्स्स हे तेल जपुन ठेवा त्यात काहीही दुसर तळु नका.)

ithe

आता बाकिचा मसाला-
२ टी स्पुन हळद
१ टेबल्स्पुन लाल तिखट. (हवं असल्यास जास्त घ्या. मी कमी तिखट खाते. (हो कोल्हापुरची असुनही))
२ ग्रॅम वेलदोडे ( अरांऊंड १५ ते वीस होतील)
३ ग्रॅम लवंगा (३० होतील) हे प्रमाण ऐकुन घेरी येत असली तरी अपर्णावर विश्वास ठेवा मंडळी अन एकदा करुनच बघा.
५ ग्रॅम दालचिनी. जवळ जवळ ३ इंच होइल.
चविनुसार मिठ.

ithe

हा मसाला बारिक कुटुन घ्या.
दिड इंच आल
२ हिरव्या मिरच्या
हे दोन्हीही खलबत्त्यात कुटुन घ्या.
१ वाटी दही.
आता तळलेला कांदा, लवंग दालचीनी अन वेलदोड्याची पावडर, आल-मिरची, मिठ हळद अन तिखट हे सगळ मटणात मिसळुन चांगल मिक्स करा. त्यात दही मिसळुन पुन्हा एकदा निट मिक्स करुन बाजुला ठेवुन द्या. जवळ्जवळ तासभर मुरु द्या.
तोवर थोडा खडामसाला फ्लेव्हर करता वापरुन भातासाठी पाणी उकळवा.

ithe

धुवुन निथळलेले तांदुळ त्यात घालुन अगदी खळ्खळीत मोकळा भात करुन घ्या. थोडी कणी असतानाच भात वेळुन उपसुन ठेवा.
आता एक दोन टोमॅटो पातळ चकत्यांमध्ये कापुन घ्या.
एका जाड तळाच्या (मी सँडविच बॉट्म वापरते) पातेल्यात तळाला या टोमॅटोच्या चकत्या पसरुन लावा.
त्यावर मॅरीनेट केलेले मटण पसरवा.

ithe

आता त्यावर भात पसरवुन घ्या. हाताने हलका दाबुन भात नीट सेट करा.
आपण मघाशी कांदा तळलेल तेल जे जपुन ठेवल होत ना? ते आता बाहेर काढा अन या भातावर व्यवस्थीत सगळीकडे धारधरुन ओता. अगदी कडेपर्यंत सगळीकडे तेल पोहोचल पाहिजे.

ithe

लावा झाकण. काय कणिकेचे बगैरे चोचले करायचे असतील ते या वेळी करुन घ्या. मी नाही केले क्यो की टाईम इल्ला। भुक लगील्ला।
गॅसवर एक तवा आधी गरम करुन घ्या अन त्यावर हे बिर्याणीच भांड चढवुन गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवा.

ithe

घड्याळ्यात बघा. जी काही टाईम असेल त्यात बरोब्बर ६० मिनिट मिसळा. अगदी एक तास झाल्यावरच गॅस बंद करा. तोवर अगदी कुणीही वास येतोय, जळली असेल अस काहीही म्हंटल तरी लक्ष नही देने का बाबा! ithe

एकदा तरी कराच. एकदा तरी खाच.

__/\__
अपर्णा

प्रतिक्रिया

=))
सुरवातीच्या फोडणीमुळे खमंग झालीये बिर्याणी. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Dec 2012 - 6:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरवातीच्या फोडणीमुळे खमंग झालीये बिर्याणी

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

3 Dec 2012 - 3:09 pm | सस्नेह

वास इथपर्यंत आला की बिर्याणीचा !
शेजारचा जावई खरं बोलत असणार !
पण शेवटचा फटू नीट का दिसत नाहीये ? खल्लास झाली काय बिर्याणी?

स्पंदना's picture

3 Dec 2012 - 3:13 pm | स्पंदना

अग त्या वासाने कसाबसा फोटो काढुन मंडळी तुटुन पडली बघ. आत्ता या क्षणी पितापुत्राची जोडी उरलेली बिर्याणी खतम करतेय.

सविता००१'s picture

3 Dec 2012 - 3:24 pm | सविता००१

काय छान लिहिता हो तुम्ही!! नॉन्व्हेज खात नसल्याने आमचा पास. पण जबरी लिखाण. जामच आवडेश.

मसाल्याचं प्रमाण आहे खरच जोरदार बिल्डिंगभर वास पसरला नाहि तर नवलच !!! :) मी पण कालच केली होती पण साजुक तुपात !!

खादाड's picture

3 Dec 2012 - 3:32 pm | खादाड

म्ह्णजे कोवळी बकरी का ??

बकरी म्हणजे मेंढी म्हणजे शीप, याच्या पिल्लाला लँब म्हणतात.
गोट म्हणजे शेळीचा नवरा, बोकड. तरुण बोकडाला पालवं म्हणतात (यातला व ओढुन म्हणायचा) त्याच्या पिल्लाला इंग्रजीत किड म्हणतात.
यात अगदी खरच बाकी काहीही नाही चालत. मसाल्याचे प्रमाणसुद्धा अगदी दिलेलच. जर्रा बदलल की समतोल ढळल्यासारखी बिर्याणी ढासळते, म्हणुन काहीही हिरवं नाही.

खादाड's picture

3 Dec 2012 - 5:17 pm | खादाड

इकडे नागपूरला पाठी म्ह्ण्जे पिल्लं न झालेली बकरी आणि मला एका खानसामाने सांगितल होत की आम्ही तेच मटण वापरतो बिर्याणि साठी !!!

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2012 - 5:23 pm | परिकथेतील राजकुमार

'मूल न होणे' हा प्राण्यांच्यात देखील जीवावरती बेतणारा अपराध असतो म्हणा की.

सस्नेह's picture

3 Dec 2012 - 3:45 pm | सस्नेह


कोवळी बकरी
src="http://www.misalpav.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/lol.gif" alt="a" />
म्हनजे कोवळा मुळा किंवा कोवळी गवारी वाटलं काय ?

पियुशा's picture

3 Dec 2012 - 3:48 pm | पियुशा

बिर्याणी बिर्याणी ,,,,बिर्याणी
घरवालोंको प्यारी है बिर्याणी :)झक्कास

कुर्बानी कुर्बानी..... प्यारी है...कुर्बानी... च्या तालावर वाचावे ;)

इष्टुर फाकडा's picture

3 Dec 2012 - 4:11 pm | इष्टुर फाकडा

आवडली. बाकी शीर्षक बघून वाटलं कि मुरलेल्या चारोळ्यांवर अजून एक सु/वि ढंबण पडलं का काय :)

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2012 - 4:22 pm | परिकथेतील राजकुमार

चंगळवादी लोकांनी चंगळवादी लोकांसाठी काढलेला धागा.

मूकवाचक's picture

3 Dec 2012 - 4:26 pm | मूकवाचक

चंगळवादी लोकांनी पाकृंचे इस्लामीकरण करण्यासाठी काढलेला धागा.

स्पंदना's picture

4 Dec 2012 - 7:15 am | स्पंदना

आता परा तू कशाला चंगळवाद म्हणशील काय सांगता येत नाही.
म्हणजे आता माझ लगन झालय म्हणुनसुद्धा तू मला चंगळवादी म्हणु शकतो. (तशी तूला रेवती अक्कान नाव नोंदव म्हणुन सुचना केलीय)
मी मांसाहार करते म्हणुन सुद्धा तू मला चंगळवादी म्हणु शकतो. मी काचेच्या बशीत (प्लेट म्हणतात माहीती आहे) खाते म्हणुन्ही तू मला चंगळवादी म्हणु शकतो. मी शेजारच्या जावयाला रॉबर्ट वडेराच्या थाटात जेवायला घातल म्हणुन्ही तू मला चंगळवादी म्हणु शकतो.
तर आधी तूला नक्की काय खुपतय ते सांगीततलस तर काही तरी उपाय योजना करुन तूला वर आम्हा चंङळ्वाद्यांच्यात ओढता येइल.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Dec 2012 - 10:53 am | परिकथेतील राजकुमार

शेतकरी तिकडे पिकासाठी आसवे गाळत असताना, वादासाठी वाद म्हणून येवढी वीज जाळून भलामोठा प्रतिसाद लिहिणे हा देखील चंगळवादच आहे. ;)

परा मी शेतकरीच आहे. विसरु नको.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Dec 2012 - 11:05 am | परिकथेतील राजकुमार

चंगळवादी आणि सात्वीक अन्नाचे इस्लामीकरण करण्यास उत्तेजन देणारे शेतकरी.

स्पंदना's picture

4 Dec 2012 - 11:10 am | स्पंदना

आम्ही शेतावर जोद-उद्योग म्हणुन शेळ्या पाळतो.

प्यारे१'s picture

3 Dec 2012 - 4:25 pm | प्यारे१

खतराच....!

आपाताई,

काय गप्पा मारतात नै लोकं? गप (ग अ अ अ अ अ प) सैपाक करुन खावं ना? ते र्‍हायलं! उगा काय झालं न कसं झालं सांगत बसतेत... ;)
वेल, बिर्याणी भन्नाट झालेली दिसते आहेच. आणि कोपर्‍यात बसलेला नवरा लग्नाचं लोणचं फुल्लटु मुरलंय बरका! ;)

(स्वगतः किचन मध्ये डाव्या हातात लाटणं, उजव्या हातात उलथणं, घरगुती साडीचा पदर खोचलेला, केसांचा सैलसर आंबाडा, गाला तोंडाला पीठ लागलेलं अशी मुरारबाज स्त्री (कन्यका :) ) कोण ते ओळखायला आता वेळ लागायचा नाही...!

पैसा's picture

3 Dec 2012 - 4:27 pm | पैसा

अक्षयभाऊजी रोज असा दम का देत नाहीत ग तुला?

सुप्रिया's picture

3 Dec 2012 - 4:36 pm | सुप्रिया

मस्तच्. शाकाहारी मंडळी भाज्या घालून करू शकतात का?

नंदन's picture

3 Dec 2012 - 4:39 pm | नंदन

ज ब र द स्त! नेहमीपेक्षा थोडी वेगळी पाकृ वाटते आहे - तिखट म्हणण्यापेक्षा मसालेदार.

>>> एकदा तरी कराच. एकदा तरी खाच.
उत्तरार्धाशी सहमत :)

ज्ञानराम's picture

3 Dec 2012 - 4:55 pm | ज्ञानराम

मस्तच गं , छान छान .. मस्त गप्पा मारता हो जेवताना

इरसाल's picture

3 Dec 2012 - 5:37 pm | इरसाल

"मुरलेल्या" लोणच्या बरोबर ही बिर्याणी मस्तच लागेल.
तुम्ही अस्मादिकांप्रमाणेच सढळहस्त दिसत आहात.

स्मिता.'s picture

3 Dec 2012 - 6:01 pm | स्मिता.

बिर्याणी मस्तच दिसतेय... आम्ही चिकनाहारी मंडळी ही कृती चिकन घालून करू.

वपाडाव's picture

3 Dec 2012 - 6:49 pm | वपाडाव

आम्ही गरीब असल्या कारणाने असले चोचले पुरवु शकत नाही....

बिरियाणी... बिरियाणी... बिरियाणी...

(ज्यांनी अंग्रेज पाहिला आहे, त्यांना कळाल्या शिवाय राहणार नाही)

अंगरेजा रे माकी किर्किरी!!!!!

पाटलांचा मह्या's picture

3 Dec 2012 - 6:59 pm | पाटलांचा मह्या

पालवं आणि "मी ....असतो " हे वाचूनच कळले तुम्ही कोल्हापूरच्या ...
ह्या पध्दतीची रेसिपी नक्कीच करून बघणार आणि खाणार. वाचताना पण बऱ्या पैकी दम लागला ....

अग्ग्ग्ग्ग्ग. काय भारी पाकृ लिवलीय.
पाकृ विभागात स्वागत.मौसाहारी पाकृ असूनही शाखार्‍यांच्या हाती वाचण्यासारखे बरेच होते म्हणून उपाशी रहावं लागलं नाही. ;)छानच लिहिलय. बिर्याणी म्हटलं की पुदिना, कोथिंबीर डोळ्यासमोर येतात पण ही पाकृ धक्कादायकरित्या चांगली.
आम्हीही मिपावरच्या पाकृंना त्या त्या लेखक/ लेखिकेचे नाव देतो. या सानिका आणि गंपानं अनेकांना वेड लावलय. स्वातीताईनं तर आता बेकरी सुरू करावी या मागणीसाठी मोर्चा काढावा असंही वाट्टय. असो.

स्वाती दिनेश's picture

3 Dec 2012 - 8:08 pm | स्वाती दिनेश

बिर्याणी चांगली दिसते आहे.
आणि मुख्य म्हणजे छान लिहिली आहेस पाकृ.. अगदी गप्पा मारत...
स्वाती

निवेदिता-ताई's picture

3 Dec 2012 - 8:17 pm | निवेदिता-ताई

मस्त......................मस्त

गणामास्तर's picture

3 Dec 2012 - 8:26 pm | गणामास्तर

अगदी जबर्‍यादस्त प्रकार..अशी बिर्याणी खाल्ली नाही ब्वॉ कधी.
अशी बिर्याणी कंच्या हाटेलात मिळेल यावर जाणकार प्रकाश टाकतील काय?

जाई.'s picture

3 Dec 2012 - 9:40 pm | जाई.

मस्तच

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2012 - 10:27 pm | अत्रुप्त आत्मा

वरपासून लागलेले सगळे तर अवडले. ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2012 - 10:28 pm | अत्रुप्त आत्मा

@वरपासून लागलेले सगळे तर* अवडले. smiley>>> थर अवडले. ;-)

दीपा माने's picture

3 Dec 2012 - 11:14 pm | दीपा माने

एकदम बेफाट लिहिलंय. खुपच आवडलं तुमचं कोल्हापुरी बोलणं आणि करणं.

आनंदी गोपाळ's picture

3 Dec 2012 - 11:48 pm | आनंदी गोपाळ

बिर्याणीची ष्टोरी आवडली.
कधीतरी थोडी खायचा योग येवो आम्हालाही ;)

मराठमोळा's picture

4 Dec 2012 - 1:31 am | मराठमोळा

बघा,
संपादक झाल्यावर काय काय होऊ शकतं.. ;)
अथवा तुमच्या बिर्याणीला माझ्यासारखे खवय्येच खरी दाद देऊ शकतात.
पण अपर्णाताईच्या जेवणाला त्या संपादक असो वा नसो कुणी तोड देऊ शकत नाही हेच खरे.

हारुन शेख's picture

4 Dec 2012 - 4:18 am | हारुन शेख

मस्त घरगुती गप्पा मारल्यागत पाक्रु लिहिली आहे. त्या कांद्याच्या तेलाला केशराचे पाणी समजलो होतो आधी नंतर वाचल्यावर लक्षात आले. माझी आई बिर्याणीचा थर घालतांना मध्ये एक मसाला वेलची आणि जायपत्री का कायसे ठेवून देते.मस्त फ्लेवर येतो. या दोन्ही चीजा मला माझ्या पानात आलेल्या खूप म्हणजे खूप आवडतात त्यांचा वाफाळता गंध काय म्हणता. कल्पवृक्षाच्या फुलांना काय येईल म्हणतो मी. अहाहा ! इथे घरापासून दूर miss करतोय आत्ता. THANKS !!

सुहास..'s picture

4 Dec 2012 - 10:51 am | सुहास..

ख त र ना क !!

या बद्दल तुला मिपाची " बिर्याणीकेसरी " ही पदवी माझ्यातर्फे बहाल करण्यात येत आहे.

( बाकी मुरण्याची कथा लय भारी !! )

स्पा's picture

4 Dec 2012 - 11:26 am | स्पा

__/\__

वरील सर्वांशी सहमत

सुहास झेले's picture

4 Dec 2012 - 1:16 pm | सुहास झेले

जबरदस्त.... :) :)

सानिकास्वप्निल's picture

4 Dec 2012 - 6:22 pm | सानिकास्वप्निल

वाह अपर्णाताई बिर्याणी जबरद्स्त झाली आहे
काय सुरेख लिहिले आहेस एकदम झकास :)

श्रावण मोडक's picture

4 Dec 2012 - 7:12 pm | श्रावण मोडक

खाऊ घातलीस तर तेव्हा या धाग्यावर पुन्हा प्रतिसाद देऊन तो वर काढेन! एरवी, दुरून डोंगर साजरे!

मालोजीराव's picture

5 Dec 2012 - 3:42 pm | मालोजीराव

खाऊ घातल्यास दर ६ महिन्यातून एकदा या प्रमाणे धागा वर काढला जाईल !

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Dec 2012 - 7:32 pm | निनाद मुक्काम प...

बिर्याणी
आलामगीरास दक्षिणेस येऊन बरच काळ लोटला होता. पण मराठ्यांना हरवणे जमले नव्हते. हारजीतीचा चिवट ,रोमहर्षक खेळ सुरु होता. मोगल व मराठ्यांचा पाठशिवणीचा खेळ ऐन बहरात होता. तेव्हा एका विजया प्रीत्यर्थ आलामगीराने आपल्या बल्ल्वाचार्याला काहीतरी खास ,नवीन बनवायचे फर्मान सोडले. आता वृद्ध बादशहाचा त्याच्या तब्येतीला पचेल व खाण्यास जमेल अशी पाककृती त्या बल्लवचार्यास सुचली. अशी बिर्याणी ची जन्म गाथा आम्ही कॉलेज जीवनात ऐकून होतो.
. आज ही पाककृती पाहून आजपर्यंत खाल्लेल्या सगळ्या उत्कृष्ट बिर्याणी निमिषार्धात डोळ्यासमोर तरळल्या, ही पाककृती मस्तच आहे. एकदा करून पहिली पाहिजे. बिर्याणी चा सुंगध आसमंतात दरवळतो हेही तितकेच खरे. ह्या सुगंधाची तुलना फक्त कस्तुरीशी होऊ शकते.

शुचि's picture

4 Dec 2012 - 8:10 pm | शुचि

मस्त ग अपर्णा!!!

गौरीबाई गोवेकर's picture

4 Dec 2012 - 9:06 pm | गौरीबाई गोवेकर

बिर्याणी छानच दिसतेय. आणखी काही प्रकार सांग ना.

गौरीबाई, खरंतर अपर्णाताई या पाकृतल्या नव्हेतच. त्या आहेत लिखाणातल्या. तुम्ही जश्या खाँ साहेबांच्या भक्त, तश्या त्या माँसाहेबांच्या भक्त आहेत. त्यांच्या नातीने.....सॉरी, मुलीने मदत केली की पुढील पाकृ येईलच. ;) (हलके घ्या).

ते एक लोणचं असतं
जितकं मुरलेलं तितकं चविष्ट लागतं :)

बादवे, अक्षयरावांचा जयजयकार असो... त्यांच्या दमामुळे एवढी मस्त बिर्याणी मिपावर अवतरली (चढवली गेली) :)

मस्त पाककृती अपर्णाताई!

मला कधीही बिर्याणी, मसाले भात असे प्रकार चांगले जमत नाहीत, सगळेच खिचडीच्या आसपास जातात असे वाटते, कितीही चांगले बनविण्याचा प्रयत्न केला तरीही.

एकदा मी पण केला होता. घरच्यांना व मित्रमंडळींना दम देउन देउन खायला भाग पाडल होत.
रेसिपी फक्कड जमली आही. अभिनंदन.
श्रा.मों तुमच्याशी १०००......दा सहमत. नेमक मनातल बोललात.

सुप्रिया's picture

20 Dec 2012 - 1:34 pm | सुप्रिया

मी भाज्या घालून करून बघितली. छान झाली होती.

अत्रन्गि पाउस's picture

23 Feb 2015 - 7:55 pm | अत्रन्गि पाउस

हि कृती वाचली होती ... आज दुपारी आठवण आली तर तव्यावर कुकर कच्चे मटण एवढेच कि वर्डस आठवत होते ...शोध शोध शोधली हो २ ३ तासांनी 'नवरा' आठवला ...मग मटण + नवरा शोधले तर चट्कन सापडले

आम्ही खातो पण शिजवू शकन नै नं घरी ...त्यामुळे आता हे कुणाला तरी सांगणे आले ...

आनन्दिता's picture

23 Feb 2015 - 8:15 pm | आनन्दिता

नवरा+मटण

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2015 - 11:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कॅनिबालिझम असं जर का गुगल वर शोधलं असततं तर बर्‍याचं चविष्ट रेसिपि मिळाल्या असत्या नै? =))

स्पंदना's picture

24 Feb 2015 - 7:48 am | स्पंदना

देवा माझ्या!!
नवरा + मटन ?????

:))))

मस्तानी's picture

24 Feb 2015 - 1:01 am | मस्तानी

काय खुसखुशीत लिहिलंय ! अशी बिर्याणी जरूर करून बघण्यात येईल लवकरच :) योगायोगाने या विकांती बिर्याणी प्रयोग करण्याची हुक्की मलाही आली होती पण मटण खात नसल्याने प्रयोग साहित्य बदलून अंडे वापरले … घ्या म्हणजे "हि पाकृ अंडे घालून बनवता येईल का" या प्रश्नातून आधीच सुटका … तर हा आमच्या बऱ्यापैकी (७५ - ८०% म्हणूया) सफल प्रयत्नाचा फटू …

Egg Biryani

आधी 'याच शीर्षकाने वाचलेली पाककृती नव्या लेखिकेकडून उद्भवली काय?' असं वाटलं, पण लक्षात आलं की "स्पंदना" म्हणजे "अपर्णा अक्षय" यांचा नवा अवतार असावा... (की या अपर्णाताई वेगळ्या अहेत?)

अमित मुंबईचा's picture

25 Feb 2015 - 4:33 pm | अमित मुंबईचा

आपण कणीक न लावता बिर्यानी बनवता पण खरा दम त्यातच आहे. बाहेर सुगंध येण्या पेक्षा तो भातात मिसळला तर अधिक जास्त चव येते.