मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दु:खाला गालबोट!

हुप्प्या · · काथ्याकूट
बाळासाहेब ठाकरे गेले हे अत्यंत वाईट झाले पण त्यानिमित्त जो बंद पुकारला गेला त्याविरुद्ध एका तरुणीने फेसबुकवर सौम्यसा निषेध व्यक्त केला आणि तिच्या एका मैत्रिणीने ते लाईक करुन आपले समर्थन व्यक्त केले तर पोलिसांनी दोघींना तात्काळ अटक केली. समाजातील विविध घटकात तेढ निर्माण करणे असला काहीसा आरोप होता. माझ्या मते हे अतिरेकी आहे. जबरदस्तीने बंद लादला तर निषेध व्यक्तही करायचा नाही हा जुलूम आहे. ही लोकशाही नसून मोगलाई आहे. खुद्द ठाकर्‍यांना असली जोरजबरदस्ती आवडली नसती असे मला वाटते. एखाद्याच्या बंदविरोधी मतावर इतकी टोकाची भूमिका घेणे हे व्यक्तीप्रेमाचे स्तोम वाटते. महंमदाच्या कार्टून प्रकरणाची ही मराठी आवृत्ती वाटते आणि असले प्रकार आजिबात होऊ नयेत असे वाटते. अशाने नस्ते पायंडे पडतील. उद्या काँग्रेसच्या राजघराण्याचा कुणी मेला आणि त्याच्या बंदच्या वेळेस कुणी असेच मत व्यक्त केले तर त्यालाही तुरुंगात टाकतील. ह्या निसरड्या उतारावरुन घसरत परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी ह्याचा समूळ उच्छेद व्हाव हीच इच्छा. असले आततायी कृत्य करणार्‍या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर काही रेम्याडोक्या माथेफिरू तरूणांनी त्या स्त्रीच्या काकाच्या हॉस्पिटलवर हल्ला करून नासधूस केली. हे आणखी पुढे! http://ibnlive.in.com/news/antithackeray-fb-post-nine-arrested-for-vandalising-girls-uncles-clinic/306389-3-237.html इंदिरा गांधीच्या हत्येनंतर शिखांचे शिरकाण झाले त्यावर प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या थोर चिरंजीवांनी मोठे झाड पडले की बारीकसारीक झुडुपे त्याखाली चिरडली जाणारच असे "मार्मिक" "स्पष्टीकरण" दिले होते तसे इथे होऊ नये ही आशा.

वाचन 15352 प्रतिक्रिया 96