Skip to main content

परीक्षा

लेखक विश्वजीत दीपक गुडधे यांनी रविवार, 11/11/2012 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणे त्यांच्याकडे बडी हुशारी होती ती तर पाठांतराची ओकारी होती कागदावरच त्यांनी फोडल्या डरकाळ्या पेच येता ती टोळी पळणारी होती इतिहासात पेटविली क्रांतीची मशाल संकट येता, घेतली लाचारी होती विज्ञानात केलेत अंधश्रद्धांवर वार त्यांची झुंड तर भोंदूच्या दारी होती भूगोलात केली त्यांनी जगाची सैर परि शेजारच्यास न ओळखणारी होती आयुष्याचे गणित कधी आलेच नाही तरीपण बरोबर ही गुणाकारी होती (?) मायभूचे ऋण न जाणले, झटपट शिकून त्यांना करायची परदेशवारी होती सदा शिकले चांगले, पण वागले उलटच तरीही त्यांनी घेतली भरारी होती अनुत्तीर्ण झाले परीक्षेत जीवनाच्या परि त्यांना मिळाली टक्केवारी होती footer

वाचने 1430
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

जगण्याच्या वास्तविकतेमधला विरोधाभासावर अगदी सहजपणे पण परिणामकारक भाष्य केले आहे.