Skip to main content

एकच मागणे....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 26/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी माझी भेट झालेलं प्रत्येक ठिकाण परत परत जाऊन पाहिलंय मी........ पण निरव आणि निशब्द शांततेशिवाय आता तिथे काहीच उरलेलं नाही...... तू माझ्याशी तिथे बोललेले मोजकेच शब्दही त्याच शांततेत कुठेतरी विरून गेले आहेत.. पण विरता विरता माझ्या मनात कायमचे घर करून गेले आहेत.. तिथल्या प्रत्येक गोष्टीकडे तुझे माझे हरवलेले क्षण मी सतत मागतो.... तुझ्या आठवणीची प्रत्येक रात्र मी तळमळत एकटाच जागतो.......... आता फक्त एकच मागणे आहे...एकदा तरी तिथेच परत ये..... हरवलेले माझे क्षण माझ्यापुरते तरी परत दे.......!
लेखनविषय:

वाचने 1314
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

वाहव्वा.........! प्रेमाचा कित्ती उत्-कट आविष्कार आहे हा.........! म्येरा दिल धाकधुक करने लगा॥

पहिल्या वहिल्या कवितेला पहिला वाहिला छान प्रतिसाद...... अजि म्या ब्रह्म पहिले !