नमस्कार मिपाकरांनो,
पुण्या मुंबईतील भटके आणि खादाड असे प्रसिद्ध झालेल्या मिपाक्ररांच्या डोक्यातुन निघालेली एक आय्डिया,
२ सप्टेंबरच्या रविवारी साता-याजवळच्या एक दोन ठिकाणी फिरायला जावं, अर्थात एक ठिकाण फिक्स आहे पाटेश्वर आणि दुसरं सज्जनगड ( जेवणासाठी) किंवा ठोसेघर धबधबा (पाण्याच्या आणि भिजण्याच्या आनंदासाठी) किंवा सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेला उरमोडीचा कॅनल ( पुन्हा भिजण्याच्या आनंदासाठी )
तर अशी सहल आयोजित करायचे ठरले आहे, नेहमीचे यशस्वी भटके आणि झोपाळु सदस्य असणारच आहेत, पण आम्हाला बोलावलं तर आलो असतो असे होउ नये म्हणुन हे आमंत्रण, सहकुटुंब आलात तरी चालेल फक्त ही अधिक महिन्यातली धार्मिक सहल नाही हे लक्षात घ्यावे ही विनंती.
सध्याच्या येणा-यांची संख्या पाहता दोन चार चाकींची व्यवस्था केलेली आहे, अजुन किती जण येणार आहेत त्यावर फायनल वाहन व्यवस्था व खर्चाचे हिशोब करायचे आहेत, त्यामुळे बुधवार दिनांक २९ ऑगस्ट पर्यंत मला किंवा वल्लीला किंवा किसन शिंदेना व्यनि करुन येणार असल्याचे कळवा अर्थात फोन नंबर सहित म्हणजे शुक्रुवारी संध्याकाळ पर्यंत बाकीचे डिटेल तुम्हाला कळवता येतील.
ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत, ते जर वाहन घेणार असतील तर आतापर्यंतच्या अनुभवाप्रमाणे रु. ५ प्रतिकिलोमिटर प्रमाणे वाहन खर्चाचा हिशोब करण्यात येईल, अन्यथा सदस्य संख्येनुसार बस ठरवावी किंवा कसे याचा विचार करण्यात येईल, येणारे किंवा न येणारे यांची या बाबतीत मदत अपेक्षित आहे, प्राथमिक अंदाजानुसार दरडोई खर्च ८०० /- अपेक्षित आहे, प्रवासखर्च, नाष्टा, दोन जेवणं (वेळेत आणि शिस्तित गेल्यास सज्जनगडावरच्या जेवणाचा खर्च वजा होईल) आणि चहा इत्यादी सहित.
आगाउ धन्यवाद.
५० फक्त.
वाचने
5662
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाटेश्वरला जाणे आहेच. इतरही
सूचना - :-p
सज्जनगड असेल तर येतो.
आमच्याही पासात्मक
शुभेच्छा...
निघणार कुठून?
निघणार पुण्यातुन आणि सोडणार
In reply to निघणार कुठून? by अभ्या..
कल्पना एकदम झकास आहे..
मोदकाला सहमत...
येउ इच्छिणा-यांना विनंती, मला
प्रस्तावित सहलीला हार्दिक
चांगला उपक्रम. सहलीला
सर्व मिपाकरांना
शुभेच्छा !!
In reply to सर्व मिपाकरांना by ५० फक्त
वर दिलेले नम्दीचे चित्र हे
@असो.......... मी येइन>>> नको
In reply to वर दिलेले नम्दीचे चित्र हे by विजुभाऊ