स्टफ्ड चिकन ब्रेस्ट

गणपा's picture
गणपा in पाककृती
23 Aug 2012 - 1:37 pm

राम राम मंडळी, काय श्रावण सुटला की नाही अजुन? ज्यांनी सोडला असेल त्यांनी ही पाककृती करुन पहायला हरकत नाही आणि जे अनंतचतुर्द्शी पर्यंत थांबणार आहेत त्यांनी नुसती पहायला हरकत नाही.
नेहमी त्याच प्रकारच चिकन खाऊन कंटाळलेल्या जीवांसाठी हा थोडासा बदल. कमी तिखट, चीज यांमुळे मुलांच्या आवडीचं तर पालेभाजी, पौष्टिक अळंबी मुलांच्या पोटत गेल्यामुळे 'पालक' पण खुश. ;)

साहित्य :


२ चिकन ब्रेस्ट.


१ ते १/२ जुडी पालक.
थोडेसे मश्रुम्स्.
३ चीजच्या चकत्या.
सॉसेज (ऑप्शनल.)
२५ ग्रॅम बटर.
काळीमीरी पूड.
मीठ चवी नुसार.

कृती :


एका भांड्यात थोडं पाणी खळखळून उकळवावं. आच बंद करुन नंतर त्यात निवडलेल्या पालकची पानं ३-४ मिनिट बुडवून (ब्लांच करावी) लगेच बाहेर काढावी.
मश्रुम बारिक चिरुन घ्यावे.
पालकची पानं ही चिरुन घ्यावी.


फ्राइंगपॅनमध्ये बटर टाकुन त्यावर पालक आणि मश्रुम परतुन घ्यावे.
बटरमध्ये मीठ असतं आणि पालकमध्ये क्षार त्यामुळे चवी नुसार किंचीत मीठ घालावं.
आच बंद केल्यावर जे पाणी सुटलं असेल ते आणि थोडसं मिश्रण बाजुला काढुन ठेवावं. बाकी पालक आणि मश्रुम वेगळे काढुन ठेवावे.


चिकन ब्रेस्टला उभा चरा देउन तो उघडावा.
वरुन खालुन मीठ भुरभुरवून १५ मिनीटं तसच ठेवून द्यावं.


एका ब्रेस्टवर चीजची चकती ठेवावी. त्याच्यावर मश्रुम, पालकचं मिश्रण ठेवावं.
आवडत असल्यास १/२ सॉसेज ठेवावा.


मग ह्या चिकन ब्रेस्टचा रोल करुन घ्यावा.


ओव्हन २००° C वर ५ मिनिटं तापत ठेवावा.
अॅ्ल्युमिनियम फॉईलमध्ये चिकन ब्रेस्ट गुंडाळुन तापलेल्या ओव्हनमध्ये २०-२५ मिनिटे शिजवून घ्यावं. (ओव्हन नसल्यास फ्राइंगपॅनमध्ये केलत तरी चालेल. वेळ कमी लागेल.)


ओव्हन मधुन काढल्या नंतर फॉईल उघडावी. आत जे वितळलेलं चीज असेल ते बाजुला काढुन ठेवलेल्या पालकच्या रसात टाकावं.
फ्राइंगपॅनमध्ये १/२ चमचा तेल टाकुन त्यात १/४ चमचा लाल तिखट टाकावं आणि चिकनचे रोल त्यात १ मिनिट परतुन घ्यावे. वरुन ताजी काळीमीरी पुड भुरभुरावी.

सॉस :
फ्राइंगपॅनमध्ये बाजुला काढलेलं पालकच मिश्रण, रस आणि वितळलेल चीज (अॅवल्युमिनियम फॉईल मधला) मंद आचेवर ठेवावं.
गरजे नुसार पाणी टाकावं. १/२ चमचा कॉरन्स्टार्च पाण्यात मिसळुन ते ही टाकावं. थोडं दाट झालं की आच बंद करावी.

पुर्वप्रकाशित.

प्रतिक्रिया

नंदन's picture

23 Aug 2012 - 1:41 pm | नंदन

निव्वळ नाव वाचून आणि फोटू पाहूनच 'ऊर भरून यावा' अशी पाककृती :)
भन्नाट दिसते आहे, एक नंबर!

'कोट्या'धिश नंदनचा पहिला प्रतिसाद, भरुन पावलो. :)

संदीप चित्रे's picture

23 Aug 2012 - 11:34 pm | संदीप चित्रे

लेका न्यू जर्सीत कायतरी नोकरी वगैरे बघ की.
म्हणजे तुझ्या पाकृ नुसत्या इथे पहाव्या लागणार नाहीत!
@ नंदन -- तुझा प्रतिसाद बेष्ट रे :)

इरसाल's picture

23 Aug 2012 - 1:47 pm | इरसाल

बाकीचे वाचुन लिहीतो.

श्या... ह्या नंदन साहेबांनी माझा नं घालवला.

बाकी लोकं एक एकटे काय काय बनवुन मजा मारत आहेत ते दिसतेच आहे.
कध्धी कध्धी म्हणुन कोणाला आमंत्रण असे नाहीच.

मी_आहे_ना's picture

23 Aug 2012 - 1:45 pm | मी_आहे_ना

गणपा शेठ, जबरी पा. कृ. आणि प्रेझेंटेशन खतरनाक!
(आत्ताच जेवून आल्याने फटूनीपण तृप्त झालो)
:)

प्रचेतस's picture

23 Aug 2012 - 1:47 pm | प्रचेतस

भन्नाट सादरीकरण.

तर्री's picture

23 Aug 2012 - 1:52 pm | तर्री

काय ती पाकृ आणि काय ते फोटो !
कोम्प्लेक्ष होतो असे काही पाहून , वाचून !!

प्रभो's picture

23 Aug 2012 - 1:55 pm | प्रभो

ह्म्म्म

सानिकास्वप्निल's picture

23 Aug 2012 - 1:55 pm | सानिकास्वप्निल

उत्कृष्ट!!
जबरदस्त पाककृती आणी तेव्हढेच क्लास फोटो :)

स्मिता.'s picture

23 Aug 2012 - 1:55 pm | स्मिता.

त्या चिकनला नक्कीच मोक्षप्राप्ती झाली असेल! भन्नाट पाकृ आहे.

दिपक's picture

23 Aug 2012 - 2:03 pm | दिपक

खत्री सादरीकरण आणि पाकृ. बरं झालं जेवण झाल्यावर धागा पाहिला. उपाशीपोटी हे पाहणे आरोग्याला घातक असु शकते. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

23 Aug 2012 - 2:08 pm | परिकथेतील राजकुमार

कलिजा खलास झाला...

सुहास झेले's picture

23 Aug 2012 - 10:58 pm | सुहास झेले

अगदी अगदी.....

Mrunalini's picture

23 Aug 2012 - 2:12 pm | Mrunalini

मस्तच.... tempting आहे एकदम... :) नक्की करुन बघेल.

गवि's picture

23 Aug 2012 - 2:19 pm | गवि

आहा.... जबरा मस्त..... काय आयडिया आहे..

करुन पाहिली जाईल याची खात्री आहे..

झक्कास कसली आयडियाची कल्पना आहे..

सहज's picture

23 Aug 2012 - 2:32 pm | सहज

पौष्टीक म्हणजे बिकांना आवडणार व डिशच्या नावातच सगळे आले असे बिका म्हणाल्याचे कुंदन, ताम्हनकरांना सांगताना पाहील्याचे प्रभोने रराआजोबांना चेपूवर कळवले.

सस्नेह's picture

23 Aug 2012 - 2:34 pm | सस्नेह

काय चमचमीत फोटो आहेत !
जिभेसोबत डोळ्यांनाही पार्टी !
पण सद्या शाकाहारी असल्याने डोळ्यांनीच भूक भगवली आहे.

उदय के'सागर's picture

23 Aug 2012 - 2:37 pm | उदय के'सागर

मांसाहारी नाही पण गणपाशेठ तुमच्या पाकृ पहायला/वाचायला जाम अवडतात हो! .... असेच नियमित पाकृ टाकत रहा :)

बाकि फोटो जबरदस्त!!!

पैसा's picture

23 Aug 2012 - 2:46 pm | पैसा

घेतलास परत एका कोंबडीचा जीव? तिचं काळीज अगदी तडफडलं असेल हो! ;)

इरसाल's picture

23 Aug 2012 - 3:04 pm | इरसाल

श्रावण संपता संपता गणपाहाती स्वर्ग लाभला या आनंदात ती क्वॅक क्वॅक करीत स्वतःहुन फ्राईंग पॅनमधे चढली असावी.

जाई.'s picture

23 Aug 2012 - 3:09 pm | जाई.

झकास!!!

अत्रुप्त आत्मा's picture

23 Aug 2012 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा

--^-- त्या कोंबडीस मोक्ष मिळला असणार हे नक्की...

मेघवेडा's picture

23 Aug 2012 - 4:33 pm | मेघवेडा

आहा!

नाना चेंगट's picture

23 Aug 2012 - 6:48 pm | नाना चेंगट

श्रावण तसाही नसतोच आम्हाला... तरीही पाकृ श्रावण सोडायचा अशा उद्देशाने पाहिली :)

रेवती's picture

23 Aug 2012 - 6:59 pm | रेवती

अरे बापरे! भारीच प्रकार आहे!
आम्ही फक्त 'बघे' असलो तरी पाकृ आवडली.

मराठे's picture

23 Aug 2012 - 9:35 pm | मराठे

सॉल्लीड!
करून बघायला (सांगायला :) ) हवी!

धागा पाहिला गणपाशेठ.
तूर्तास इतकंच.....

उदय ४२'s picture

24 Aug 2012 - 4:49 pm | उदय ४२

सध्या आधिक महिना सुरू आहे. या महिन्यात धोण्डे करतात. म्हंजे पूर्वी करायचे. या धोंड्याची पाकृ कुणी देणर काय? गण्पाराव?

गणपा, मशरुम्स ऐवजीकाय वापरता येईल?
ओव्हनमध्ये न ठेवता फ्राईंग पॅनमध्ये शिजवायचे असले तरी फॉईलमध्ये चिकन गुंडाळायचे का? तसे करताना पाणी ओतयचे का थोडे पॅनमध्ये? नाहीतर फॉईल जळल्यासदृश होईल का असे वाटले म्हणून विचारते.

अळंबीला पर्याय म्हणुन टोफु चालेल, किंवा मग रंगीत भोपळी मिरची.

फॉईल मधला रोल मी स्वतः फ्राईंगपॅन मध्ये कधी ठेवला नाही. पण काही जणांच्या मते ऑक्सिडेशन होण्याचा संभव असतो, म्हणुन असा रोल फ्रिजमध्ये थोडा वेळ ठेउन सेट करावा आणि नंतर फॉइल काढुन फ्राय करावा.

यशोधरा's picture

24 Aug 2012 - 10:48 pm | यशोधरा

ओके. करुन पाहीन आणि सांगेन. :)
धन्यवाद.

स्पंदना's picture

27 Aug 2012 - 6:00 am | स्पंदना

बनवुन सांगण्यात येइल.
बाकि फटु बघुनच जीव कोंबडी बरोबर स्वर्गाला गेलाय.