एक साधी, छोटी सहल ज्यातून पावसाचा आनंद मिळावा आणि रोजच्या त्या रटाळ कामातून थोडा 'चेंज'/आराम मिळावा ह्या असल्या अगदी माफक हेतूने आम्ही काही मित्र मागच्या विकांताला भंडारदराला गेलो आणि प्रवासाच्या सुरवातीपासून (नाशिक-भंडारदरा) ते शेवटापर्यंत निसर्गाने जे काहि त्याचे मनोहारी रुप दाखवले, जी काही करमणूक केली... अहाहा.. त्याचे वर्णन करायला शब्दच नाहीत..
हेच वर्णन फोटोतून करावे हा एक प्रयत्न. केवळ प्रयत्नच कारण फोटोंपेक्षा प्रत्यक्ष ते अनुभवणे ह्यात अर्थात खूपच फरक आहे...
(खुप मुसळधार पाऊस/वारा ह्या मुळे बरेच फोटो गाडीत बसूनच काढले आहेत, काही चालू गाडीत काढले तर काही फोटोंमध्ये पाण्याचे थेंब दिसतील जे पावसामुळे लेन्स वर सतत पडत होते... खास कॅमेरा आणि फोटो चांगले यावे यासाठी तिथे एक नवीन छत्री ही घेतली, पण वाराच एवढा की तिनेही जास्त काळ साथ दिली नाही. उल्टी-पाल्टी होउन नंतर उडूनच गेली, कदाचित तिलाही पावसात मनसोक्त हुंदडायचं होतं :))
१. नाशिक-भंडारदरा रस्त्यावरील एक गावं (परदेस वाडी)
२. हिरवीगार परदेस वाडी
३. भंडारदरा येथील 'आर्थर लेक' - सायंकाळच्या वेळी. हा लेक खुप शांत आणि त्याचवेळी खुप भयानकहि वाटत होता...कदाचित तुफान वारा आणि मुसळधार पावसामुळे.....
४.
५.
६.
७.
८.
९. (गाडीतून काढलेला फोटो...खिडकीच्या काचांवर ओघळणार्या पाण्यामुळे हा फोटो एखाद्या चित्रा सारखाच दिसतो नाही? :))
१०.
११
१२.
१३.
१४.
१५.
१६. असंख्य धबधबे आणि धुके...
१७.
१८.
१९.
२०.
२१.
२२.
२३. भाताची शेती आणि शेतकरी
जसं कडक उन्हातून एकदम सावलीत वा घरात अल्यावर अपल्याला अंधारी येते ना तसंच मला ह्या सहलीला जाउन घरी आल्यावर डोळ्यावर 'हिरवळी' येत होती :D ...दोन दिवस सतत आणि चारही बाजूंनी एवढी हिरवळ बघत होतो की ती डोळ्यापुढून जातच नव्हती.
कधी कधी खूप काही व्यवस्थित ठरवून / प्लॅन करुन काढलेल्या सहलीत अपेक्षेप्रमाणे मजा येत नाही आणि कधी कधी ह्या अश्या 'झटपट' आणि 'अनप्लॅनड' सहली आपल्याला खूप काही आनंद देउन जातात... तुमचीही अशीच एक पावसाळी सहल होवो ह्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा :)
वाचने
9554
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त भटकंती !
अतिशय तृप्त करणारे फोटो.
+१
In reply to अतिशय तृप्त करणारे फोटो. by बॅटमॅन
पावसाळ्यातली हिरवाई, धुक्याची
प्रचंड मस्त!
फोटो १८ व १९ चे फ्रेमिंग
मस्त फोटो,एखादा फोटो रन्धा
काय अफलातून फोटो आहेत सर्व.
सुरेख
खास्करुन पहीला पावुस झाला की
In reply to सुरेख by प्रचेतस
१ नंबर भावा.. खुप मस्त सतेज
झकास.
छान
एकच नंबर आल्यात फोटू
प्रसन्न
+१
In reply to प्रसन्न by सर्वसाक्षी
+२
In reply to +१ by स्पा
वा... अगदी हिरव गार वाटल फोटो
एकदम झकास!
अप्रतिम फोटो
अप्रतिम !!!
अप्रतिम, सुंदर फोटो.
क्या बात है.
काय हिरवाकंच निसर्ग आहे
लाजवाब !
छान सफर अमोल केळकर
सिनेमामध्ये
इतकं बरं वाटलं फोटो पाहून!
वा! मस्त फोटो
१५