झटपट क्रिस्पी कोळंबी
साहीत्य
ताजी कोळंबी (आकारमान मध्यम ते लहान. फार मोठी असल्यास तळताना क्रिस्पी होत नाहीत),कांदा,टोमेटो,ही चटणी, घरी केलेला/ विकतचा शेजवान सॉस, सोया सॉस,कॉर्न फ्लोअर,तळणासाठी तेल,बारीक चिरलेला लसुण(१ टी स्पुन), आल्याच्या काड्या,मिठ, हळद व लिंबु.
प्रथम ताजी कोलंबी आणुन तीच्यातील धागा काढावा(ही स्टेप ऑप्श्नल आहे).स्वच्छ करुन घ्यावी.
नंतर थोडे मिठ, हळद(पाव चमचा) ,लिंबु आणि वरील लाल चटणी लावुन सुमारे १५/२० मिनीटे मुरुद्यावी. घाई असल्यास ह्या मुरवण्याच्या प्रक्रियेला फाटा दिला तरी चालेल.
कढईत तेल गरम करायला ठेवा आणि मुरलेल्या कोलंबी वर कॉर्न फ्लोअर टाकुन घोळवुन घ्या. आता कोळंबी एक एक करुन तापलेल्या तेलावर खरपुस डीपफ्राय करुन घ्या.( कॉर्न फ्लोअर पावडरने कोलंबीतील जास्तीचे मॉईश्चर कमी होउन क्रिस्पी होण्यास मदत होते.)
घाई असल्यास ताबडतोब हाणायला सुरवात करा किंवा...............
तेलावर कांदा लालसर होईपर्यंत परतुन घ्या. यामधे टोमेटो,सोयासॉस(थोडासाच साधारण १ छोटा चमचा पुरे), अवडी प्रमाणे शेजवान सॉस (जास्ती स्पाईसी हवे असल्यास आवडी प्रमाणे लाल मिरची पावडर), बारीक चिरलेला लसुण (१ किंवा २ टी स्पुन आवडी प्रमाणे), आल्याच्या काड्या(ज्युलीअन्स) टाकुन एकजिव परतुन घ्या. या मिश्रणात तळलेली कोळंबी टाकुन हलकेच ढवळुन घ्या.(टॉस करा). प्लेट मधे सर्व्ह करताना पातीचा कांदा टाकुन गार्नीश करा.
आवड्त्या पेया सोबत लुटा लुत्फ क्रिस्पी कोळंबीचा.
कोळंबीच्या ऐवजी व्हेजमिपाकरांनी पनीर घेतले तरी चालेल.
बेक व्हर्जन
मुरवलेल्या कोळंबीवर ऑलीव्ह ऑईल ,बारीक चिरलेला लसुण(१ किंवा २ टी स्पुन आवडी प्रमाणे), आल्याच्या काड्या,पातीचा कांदा तसेच हिरवी पात चीरुन टाकावी. या मिश्रणास अॅल्युमिनीयम फॉईल मधे ४/५ कोळंबीची एक आशी पुरचुंडी बांधुन ती निखा-यावर / ओव्हन मधे ७/१० मिनीटे बेक करावी.
वाचन
8984
प्रतिक्रिया
19