नुकतेच अरविंद गोखले यांचे 'मंडालेचा राजबंदी ' हे लोकमान्य टिळक यांच्यावरील राजद्रोहाच्या तिन्ही खटल्यांची माहिती देणारे पुस्तक वाचनात आले. अरविंद गोखले हे केसरी या नियतकालीकेचे दहा वर्ष संपादक होते. लोकमान्य टिळकांचे नातू जयंत टिळक यांच्याशी त्यांचा अत्यंत घनिष्ट संबंध होता.
लोकमान्यांचे केसरीमधील लेख, त्यांची भाषणे, मंडालेच्या तुरुंगातील पत्रव्यवहार, त्यांचे वकिली कौशल्य, राजद्रोहाच्या शिक्षेची कारणे, त्याबद्दल लोकमान्यांनी दिलेले स्पष्टीकरण, मंडालेच्या तुरुंगामधील त्यांनी काढलेली ६ वर्षे, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, पाली व संस्कृत या भाषांमधील त्यांचे ज्ञान व वाचन, त्यातून जन्माला आलेला गीतारहस्य ग्रंथ, स्वराज्याबद्दल वाटणारी कळकळ व टिळकांचे मृत्यूपत्रही त्यात वाचायला मिळेल.
लोकमान्य टिळक डावपेच खेळण्यात तरबेज होते. राजद्रोहाच्या दुसऱ्या खटल्यात त्यांनी न्यायालयात स्वतः त्यांची बाजू मांडली होती.त्यावेळी साक्षीदारांची घेतलेली उलटतपासणी (खूप विस्तृतपणे लिहिले आहे) त्यांचे नैपुण्य दाखविते.
एकूणच शंभर वर्षापूर्वीचा सारा इतिहास पुन्हा पिंजून उभी केलेली एका राष्ट्राभक्ताची संघर्षगाथा...
याद्या
2949
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
धागा काढण्याचा उद्देश समजला
परिचय करून देण्याचा उद्देश
In reply to धागा काढण्याचा उद्देश समजला by प्रचेतस
सविस्तर लिहिण्याची काहीच गरज नाही...
In reply to परिचय करून देण्याचा उद्देश by अमितसांगली
सविस्तर लेखाची वाट पाहतोय
लोकमान्य टिळकांनी सुरु केलेले