मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फुलांचे..!

उपटसुंभ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
उदंड झाले वार फुलांचे, उघडले न पण दार फुलांचे चुरगळणार्‍या, सुगंध देती कसे असे व्यवहार फुलांचे तुझा हात फिरला कवितेवर शब्द शब्द होणार फुलांचे मिळे न सहवासाचे अत्तर विस्कटले बाजार फुलांचे कत्तल माझ्या बागेची अन् तिला गळाभर हार फुलांचे मोक्ष मिळावा निर्माल्याचा जीवन मी जगणार फुलांचे -- उपटसुंभ

वाचने 1337 वाचनखूण प्रतिक्रिया 4

प्रचेतस 19/06/2012 - 14:45
फुलांची रांगोळी तज्ज्ञ श्री अत्रुप्त आत्मा यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

अत्रुप्त आत्मा 19/06/2012 - 19:00
मोक्ष मिळावा निर्माल्याचा जीवन मी जगणार फुलांचे >>> --^-- सहभावनांचे कोंदण घेऊन आलास रे दोस्ता... ! रचनेवर फिदा झालो आहे. धन्यवाद.