Skip to main content

केरळची भटकंती १ - किंचित कोचिन

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 06/06/2012 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास गाडीचा असो वा विमानाचा. रडणारी बाळं नेहेमी आमच्याच वाट्याला का येतात माहित नाही. चांगली दोन तीन पोर सूर लावुन होती. पैकी एक माझ्या पुढ्च्याच रांगेत. आम्ही सात जण, सहा एका ओळीत आणि पुढच्या रांगेत मी एकटा, अर्थातच खिडकीत. त्या रडणार्‍या पोराच्या गोतावळ्यापैकी एक माझ्या शेजारी होता. पोरानं उच्छाद मांडला होता. एकवेळ रडण बर पर किंचाळण नको. काही पोर अशी किंचाळतात की कोळसा इंजिनाची शिट्टी बासरीसारखी वाटावी. असो. अखेर नाना उपायानंतर ते पोर थांबल. मग माझ्या शेजारी बसलेल्याची हालचाल सुरू झाली. गडी मोठ्या हौसेनं आपल्या मोबाईलने चित्रे टिपत होता. त्याची चुळबुळ ल्क्षात घेत मी मागे सरकलो आणि त्याला खिड्कीजवळ येऊन फोटु काढु दिले. आभार मानत जागेवर बसताना त्याने सहज विचारले, 'खाली पांढरे पांढरे दिसत आहे ते काय आहे?'. 'ढग' मी उत्तरलो. मग अचानक त्याला आठवल की आपण उंचावर आहोत. असा विलक्षण प्रश्न विमानात ऐकायची माझी दुसरी वेळ. पहिला मान माझ्या मावस बहिणीचा. मागे एकदा आम्ही बंगलोरला जात असताना बाईसाहेब खिडकीत बसल्या आणि बाहेर पंखांकडे लक्ष जाताच विचारत्या झाल्या ' दादा, तिथे पंखावर पुढच्या भागात बघ लिहिले आहे - नो स्टेप्स्; आता इथे जर खिडकी उघडत नाही तर आपण कसे काय खाली उतरणार? म्हणजे पाय द्यायचा प्रश्नच येत नाही. मग असे का लिहिले आहे?' उतरायची सूचना झाली. जरा वेळातच हिरवळ जवळ दिसु लागली. green2 नारळाची झाडे आणि टुमदार कौलारु घरे स्पष्ट होऊ लागली म्हणजे आता उतरणार. green3 खरेतर कोचिन मुक्काम केवळ एक रात्रीचा. पहाटे उठा, निघा कोचिनला जा, पुन्हा पाच तास प्रवास करुन थेकडी म्हणजे अति झाले असते. त्यामुळे आदल्या दिवशी निघुन कोचिनला मुक्काम करायचा, संध्याकाळी थोडेफार पाहायचे, फिरायचे असा विचार होता. दुसर्‍या दिवशी सकाळी थेकडीला रवाना. संध्याकाळी फोर्ट कोचिनला भटकायचे ठरले. मस्त जेवुन आळसावलेल्या पोरांनी निघायला साडेसहा वाजवले आणि आम्ही काहीसे उशिरानेच पोचलो. आकाशात ढग होते, सूर्य अस्ताला गेला होता. मासेमारीची चिनी जाळी पाहायची होती. पाण्यावर पोचलो आणि मस्त रंगकाम पाहायला मिळाले. बांबूंवर दोराने ताणुन बसवलेली आणि मासेमारी संपल्याने वर घेतलेली जाळी मागे रंगीत आकाश व खाली पाणी असे सुरेख दृश्य दिसले. net3 net4 net 2 net5 आम्ही जेट्टीच्या जवळ जायचा प्रयत्न केला पण 'आता संपल, उद्या या' असे म्हणत कोळी लोकांनी आम्हाला फुटवल आणि जाळ्यांच्या जवळ जायला मज्जाव केला. आम्ही पाय फिरवले आणि जरा काठावर भटकलो. मासळीच्या अनेक टपर्‍या होत्या, समोर रुपेरी मासे पसरले होते. fish1 fish 2 शेजारी हे मांजर 'आता एखादा तरी मासा उडवाय्चाच' अशा नजरेने माशांकडे पाहत असलेले दिसले. maau फोर्ट कोचिन भागाविषयी बरेच ऐकले होते. तिथे मनसोक्त भट्कायचे होते पण उशिर झाला होता. या भागात इंग्रजी, पोर्तुगिज, डच, फ्रेंच अशा अनेक शैलींचा प्रभाव असलेली घरे पाहायला मिळतात. टुमदार व आकर्षक अशा काही बंगल्यांचे रुपांतर आता हॉटेलात झाले असावे. old hotel2 old hotel1 अशाच एका हॉटेलने लक्ष वेधुन घेतले. 'ओल्ड हार्बर हॉटेल' असे त्याचे नांव. मोठा सुरेख बंगला होता. old hotel4 आम्ही परत निघालो. बायकांना केरळी साड्या/ ड्रेसचे कापड घ्यायचे होते.

वाचने 8895
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

कोची हे एक अरुंद रस्त्यांचे पण टीपटाप शहर आहे . ते भारत देशातील एक उत्तम नैसर्गिक बंदर आहे. फोर्ट कोची भागात पायी चालत भटकत रहाणे हा तर अविस्मरणीय अनुभव आहे. माझे ही चार आणे धाग्याला- कोचीची मुख्य बाजार पेठ अशा मोठमोठ्या दुकानानी सजलेली आहे. हे जुवेलरीची तीन मजली दुकान. फोर्ट कोची चा निरोप घेताना सर्वसाक्षी साहेब, आपल्या या धाग्यामुळे माझ्या रम्य आठवणीना उजाळा मिळाला.

फोटू आणि वर्णन आवडले. पु. भा. प्र.

सुरेख फोटो आणि छान वर्णन. लेख लवकरच संपवल्यासारखा वाटला. पुभाप्र. बाकी ती मांजरी गर्भारशी दिसतीय.

वॉव सगळे फोटो मस्त :) तो जाळ्याचा फोटो तर अगदी क्लास आलाय रंगसंगतीमुळे ,मला माउचा फोटो भारी आवडला :)

फोटो क्र१ आवडला आणि क्र.६ खुपच आवडला अवांतर = "अखेर नाना उपायानंतर ते पोर थांबल" नाना पण होते का सोबत ? त्यांनी काय उपाय योजना केली ?

केरळचे वर्णन आवडले आणि फोटोंबद्दल तर काय बोलायलाच नको, झकासच ! पु भा प्र स्वाती

सगळे फोटो आणि वर्णन मस्तच!

फोटो मस्तच. वर्णन अजून थोडे हवे होते. शेवटून तिसरा फोटो - सहसा परदेशातील भारतीय बहुल भागाला लिटल इंडिया म्हणतात. पण भारतातल्या भारतातदेखिल लिटल इंडिया पाहून मौज वाटली!

छानच. केरळ खुपच निसर्गरम्य आहे. रस्त्यावरसुद्धा दोन्ही बाजुंनी भरपुर झाडं, झुडपं आहेत. खुप छान वाटतं. खास करुन मुंबई किंवा रखरखाटी भागातुन अशा ठीकाणी गेल्यावर. मी अजुन कोकणात गेले नाही त्यामुळे उगाच वाद घालु नये.

विमान खाली येताना काढलेले व कोळ्याच्या जाळ्यांचे फोटू झकास. बाकी रडणारी पोरं आमच्याही विमानात असतात हो.......आईवडीलांचा इलाज नसतो.

काकासाहेबांचा इयत्ता नववीतील मराठीच्या पुस्तकातील पाठाची आठवण झाली (मी पाहिलेला सूर्यास्त) कारण त्यात केरळचे सुरेख वर्णन केले होते.