Skip to main content

इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे !

लेखक धुमकेतू यांनी बुधवार, 23/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
" इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे " असे का म्हणतात ? शेतकऱ्याला बळीराजा असे का म्हणतात ? पुरानाप्रमाणे वामनाने बळीला त्याच्या मस्तकावर पाय ठेऊन पाताळात पाठवले अशी आख्तायिका आहे . बळीराजा जर वाईट होता आणि म्हणून वामनाने ( म्हणजे विष्णूने ) त्याला पाताळात पाठवले असेन तर मराठी मध्ये "इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे " अशी शब्दरचना का आहे ?

वाचने 39480
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

आता हा धागा वामन विरुद्ध बळी या मार्गाने ब्राहण विरुद्ध बहुजन असा जाणार. शंभरी ओलांडण्यासाठी धाग्याला शुभेच्छा

In reply to by JAGOMOHANPYARE

आता हा धागा वामन विरुद्ध बळी या मार्गाने ब्राहण विरुद्ध बहुजन असा जाणार
कशाला वाद घालायचा म्हंतो मी! आता वामन काय किंवा परशुराम काय एकाच विष्णुचे ड्युप्लिकेट आयडी नाहीत का?

तुमचा पुराणांवर विश्वास आहे का ?? असो .. माझी माहिती अशी बळीराजाच्या राज्यात लोक सुखी होते ..आणि दुखाशिवाय देवाची आठवण कोणाला येइना .. त्यामुळे देवांची डिमांड कमी झाली .. त्यांना नैवैद्य , नवस ,नामजप , यज्ञ असा खाउ मिळेना ...मग त्यांनी विष्णु देवाला सुपारी दिली... विष्णू बळीराजाकडे जाउन भिक्षा मागितली आणि त्यातच त्याचा गेम केला .. बाकी कुठेही बळीराजा वाईट होता असे वाचल्याचे स्मरत नाही ...

In reply to by कपिलमुनी

. बळीराजा जर वाईट होता आणि म्हणून वामनाने ( म्हणजे विष्णूने ) त्याला पाताळात पाठवले बळीराजा वाईट नव्हता. यदा यदा ही धर्मस्य.म्हणणार्‍या विष्णूने त्याच्या निर्दालनासाठी वामनावतार धारण केला. आणि बळीला फसवून त्याचे राज्य लाटले हे कमी म्हणून की काय वामनाने त्याला हद्दपार करत बळीला थेट सूत्तलात( अमेरीकेत) पाठवले

In reply to by प्रचेतस

बरोबर.... माझी चूक होत होती. मी आधी वामन , मग नरसिंह असे समजत होतो...... आधी नरसिंह झाला , मग वामन.... म्हणजे हिरण्यकश्यपु बळीचा पणजा असणार.

In reply to by JAGOMOHANPYARE

माझी चूक होत होती. मी आधी वामन , मग नरसिंह असे समजत होतो...... आधी नरसिंह झाला , मग वामन.... म्हणजे हिरण्यकश्यपु बळीचा पणजा असणार.
जामोप्या, काय तरी फुल्टू गोंधळ होतोय ब्वॉ.... हिरण्यकशिपुच्या वंशावळीत नरसिंह? वडाची साल पिंपळाला आणि पिंपळाची आंब्याला आणि आंब्याची..... जाऊ द्या, काय पडलंय कुणाला कशाचं....?

In reply to by प्रास

गोंधळू नका. आधी हिरण्यकश्यपू झाला.. त्याला नरसिंहाने मारले. मग हिरण्यकश्यपूला पणतू झाला बळी , त्याला वामनाने पाताळात ढकलले. आधी नरसिंह अवतार, मग वामन अवतार. मला वामन अवतार आधी झाला असे वाटत होते.. त्यामुळे मी बळीला हि क चा पणजोबा समजत होतो.. ते उलट आहे इतकेच...

" इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे " असे का म्हणतात ? रुढी परंपरा पद्धत शेतकऱ्याला बळीराजा असे का म्हणतात ? रुढी परंपरा पद्धत पुरानाप्रमाणे वामनाने बळीला त्याच्या मस्तकावर पाय ठेऊन पाताळात पाठवले अशी आख्तायिका आहे . बळीराजा जर वाईट होता आणि म्हणून वामनाने ( म्हणजे विष्णूने ) त्याला पाताळात पाठवले असेन तर मराठी मध्ये "इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे " अशी शब्दरचना का आहे ? रुढी परंपरा पद्धत खुश?

बळीराजाचा बळी गेला असे म्हणावे का राक्षस म्हणजे काय असुर म्हणजे काय अ + सुर की मूळचाच शब्द असुर दास दस्यु म्हणजे काय, नागलोक, विनता, कद्रु म्हणजे काय शंबर म्हणजे काय, कपिल कोण विरोचन कोण प्रल्हाद खरेच विष्णुभक्त होता का बळीचा अपराध काय बळीचा नेमका काल कोणता ? लॉट ऑफ क्वेश्चन्स !

In reply to by आशु जोग

"बळीराजा" हा विष्णुभक्त प्रल्हादाचा पणतू आहे. त्याच्या राज्यात सर्व प्रजा सुखी होती... सर्वत्र आबादीआबाद होते. इथपर्यन्त ठीक होते. परन्तु बलीने हळुहळू स्वर्गापर्यन्त आपली सत्ता पसरवली. बलात्काराने इन्द्रादि देवांना स्वर्गातून हुसकावून लावले. आणि इथेच त्याचे चुकले. एकतर तो "असुर" असूनही त्याने स्वर्गावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. "स्वर्ग" हा फक्त देवांसाठीच राखीव असतो... हे बळीराजा विसरला.... त्यामुळे देवांच्या विनन्तीनुसार विष्णुच्या पाचव्या अवतारास- बटूवामनास बळीकडे यावं लागलं.. आणि ३ पावले जमीन मागावी लागली.. आणि बळीच्या दानवृत्तीवर खूश होऊन वामनाने त्यास "सुतल" नामक पाताळाचा अधिपती बनवले. आणि त्यास "चिरन्जीवी" होण्याचाही आशीर्वाद दिला. त्यामुळे बळीराजाचे वैयक्तिकरीत्या कोणतेही नुकसान झाले नाही.. उलट फायदाच झालेला आहे. बळीराजाचा सर्वांत मोठा गुणधर्म- म्हणजे "दान करणे" आल्या अतिथीस तो कधीही विन्मुख पाठवत नसे. अ‍ॅक्चुली त्याच्या याच्च गुणधर्मामुळे या युगातही "बळीचे राज्य येऊ दे" असे म्हटले जाते..कारण राजा जितका दानी असेल.. तितके त्याचे प्रजाजन सुखी असतात. राजा जर भ्रष्टाचारी आणि वखवखलेला असेल.. तर प्रजा कधीही सुखी होऊ शकत नाही. त्यामुळे या भ्रष्टाचारी नेत्यांच्या राज्यात इडा पीडा टळो.. आणि बळीचे राज्य येवो.. हीच्च भगवान विष्णुच्या चरणी प्रार्थना! :) तात्पर्य : देवांच्या राखीव कुरणात असुरांनी प्रवेश करू नये... तसे केल्यास नुकसान त्यांचेच आहे. ;) सूज्ञ लोक "त" वरून ताकभात ओळखतीलच्च!! ;)

In reply to by मृगनयनी

बलात्काराने हाकलले? सरळ सरळ सांगा ना तुमचे देव बळीच्या ताकतीपुढे हरले म्हणून.. :) म्याडम ते वामनावतार आहे, तुम्ही तर बामनावताराचे गोडवे गाऊ लागलात. :)

In reply to by JAGOMOHANPYARE

सरळ सरळ सांगा ना तुमचे देव बळीच्या ताकतीपुढे हरले म्हणून.. Smile म्याडम ते वामनावतार आहे, तुम्ही तर बामनावताराचे गोडवे गाऊ लागलात. Smile
जामोप्या'जी... देवांकडे जास्त करून सत्व गुण आणि रजोगुण असतात. ( अपवाद- शन्कर).. आणि असुरांकडे तमोगुण जास्त असतात. आणि स्वर्ग-हे पहिल्यापासूनच देवांचे आणि फक्त देवांचेच वसतिस्थान आहे. तिथे असुरांनी चढाई करून.. स्वर्गातल्या मूलनिवासी भूमिपुत्रांना .. म्हणजे- देवादिकांना ..त्यांच्या सात्विकतेचा फायदा घेऊन हाकलून दिले.. जे पूर्णतः चुकीचे होते.. त्यामुळे या स्वर्गातील मूलनिवासी देवांनी "असूरसेफ" आन्दोलन करून महाविष्णुला साकडे घातले.. ;) ;) .. =)) =)) =)) =)) व काश्यप ऋषींच्या आणि अदितीमातेच्या पोटी भगवान विष्णुला आपला पाचवा अवतार- बटु वामनावतार घ्यावा लागला.... अत्यन्त हुषारीने बलीराजाचे किन्चितही नुकसान न करता..वामनबटूने देवांना त्यांचा स्वर्गलोक परत दिला.. :) (संपादित)

In reply to by मृगनयनी

>>>देवांकडे जास्त करून सत्व गुण आणि रजोगुण असतात>>>> देवान्चा राजा जो इंद्र त्याच्या कडे कोणते गुण जास्त आहेत? नाही त्याच्या खात्यावर बायकांच्या बाबतीत्तले गुन्हे जरा जास्तच आहेत नाही का? तसा तर रावणही ब्राम्हणच.

In reply to by स्पंदना

देवान्चा राजा जो इंद्र त्याच्या कडे कोणते गुण जास्त आहेत? नाही त्याच्या खात्यावर बायकांच्या बाबतीत्तले गुन्हे जरा जास्तच आहेत नाही का? तसा तर रावणही ब्राम्हणच
@ अपर्णाअक्षय देवांचा राजा इन्द्र याच्याकडे "रजोगुण" जास्त होते.... त्यामुळे तो सुन्दर बायकांकडे जास्त आकर्षित व्हायचा.. तसेच बर्‍याच सुन्दर बायकाही त्याच्याकडे आकर्षिल्या जायच्या.... तो राजा असल्यामुळे हे गुणधर्म त्याच्याकडे असणे साहजिकच होते. अर्थात अहिल्येला बाटवण्याचे महत्पाप त्याच्या याच रजोगुणामुळे घडले.. व गौतम ऋषींच्या शापामुळे अनेक वर्षे शरीरावर सहस्त्र भोके घेऊन इन्द्राला राहवे लागले...पुढे या शापातूनही त्याची मुक्तता झाली.... या इन्द्राचाच अंश म्हणजे- अर्जुन! याच्यातही इन्द्राचे गुण असल्याने अनेक पोरी याच्यावर फिदा असायच्या!... :) त्यामुळेच याला इतर पान्डवांपेक्षा जास्त बायकाही होत्या! असो!.. "रावण" हा ब्राह्मण आणि राक्षस यांचा सन्गम होता. त्याचे वडील "पौलस्ति" ब्राह्मण होते.. तर आई "केकसी" राक्षस होती. ब्राह्मणत्वाच्या गुणांमुळे तो कर्मनिष्ठ होता... पण राक्षसगुणांमुळे त्याला "धर्मनिष्ठ" नाही बनता आले. त्यामुळेच त्याने देवी पार्वती'ची अभिलाषा धरली.. ( व पुढे क्रमेण गोकर्णक्षेत्राची निर्मिती झाली.) त्याच्यातल्या राक्षसगुणांमुळेच त्याने सीता-हरण केले... व पुढे त्याचा नाश झाला. हेच "बिभीषण" जरी रावणाचा धाकटा भाऊ होता.. तरी त्याच्यावरचे संस्कार हे ब्राह्मणी आणि सात्विक होते. कारण त्याचे शिक्षणरावणावरचे सन्स्कार त्याच्या आईच्या वडिलांनी म्हणजे राक्षसाने केलेले होते. . त्यामुळे या दोन्ही भावांच्या संस्कृतीत खूप फरक होता.. म्हणून तर कट्टर शिवभक्त असूनही रावण शिवाच्याच एका रुपाला- महारूद्र हनुमानाला ओळखू शकला नाही. अगदी मरताना त्याला हनुमानाच्या शिवरूपाची जाणीव झाली..पण तेव्हा काही उपयोग नव्हता! आणि ब्राह्मणच असलेला बिभिषण मात्र रावणाच्या छायेत असूनही रामनाम घेत राहिला.. व चिरन्जीवी बनला... :)

In reply to by मृगनयनी

स्वतःच्या भावाला मारण्यासाठी परक्याला मदत करुन राज्य मिळवणे.. हा ब्राह्मणी दैवी गुण का? माहीत नव्हते हो! ज्ञानात भर पडली. धन्यवाद. रावण महान होता. शिव तांडव स्तोत्र रचून तोही अमरच आहे... तुमचा अमर बिभीषण कुठे तोंड लपवून बसलाय कुणास ठाऊक. बुद्धाला विष्णु अवतार म्हणणं काय, रावणाला , बळीला खलपुरुष म्हणून रंगवणं काय, सगळे ब्रह्मसमंधांचे उद्योग आहेत.

In reply to by JAGOMOHANPYARE

स्वतःच्या भावाला मारण्यासाठी परक्याला मदत करुन राज्य मिळवणे.. हा ब्राह्मणी दैवी गुण का? माहीत नव्हते हो! ज्ञानात भर पडली. धन्यवाद.
तत्वहीन आणि चुकीची कामे करणार्‍या, साक्षात महाविष्णुचा अवतार असणार्‍या रामाच्या पत्नीस पळवून तिची अभिलाषा धरणार्‍या रावणासारख्या भावाच्या नाशासाठी रामाची मदत करणे.. यात गैर काहीच नाही.. असे तत्वनिष्ठ- ब्राह्मण बिभिषणाला वाटले.. व त्याप्रमणे तो वागला.... जाम्प्या.. आपल्यासारख्यांना ही ब्राह्मणांची गोष्ट चुकीची वाटणे .. साहजिकच आहे!! :)

In reply to by JAGOMOHANPYARE

रावण महान होता हे ऐकुन धन्य झालो. तो ब्राह्मण नाही असे म्हटल्यामुळे त्याला महान म्हणता आहात काय? की तो ब्राह्मण असुनही महान होता असे तुम्हाला वाटते? कीचक आणी जयद्रथ हे महान होते काय? नाही ते ही पुराणकालीन शक्ती कपूर होते आणि ब्राह्मण नव्हते म्हणुन विचारले. बाकी ब्रह्मसमंध म्हणजे कोण?

In reply to by मृगनयनी

मृगनयनी यांचा प्रतिसाद त्यातल्यात्यात पटणारा वाटतो आहे ! असुर म्हणजे ( आक्राळ-विक्राळ ) राक्षस अशी नेहमी समजुत होत असते आपल्याकडे , अगदी लहानपणापासुन ! मला वाटते की विभागणी अगदी साधी होती - १) देव ( सुर) - अमर जनता २) उरलेलेले सगळे असुर ( मर्त्य जनता - ह्यात माणुस ( ब्राह्मण , बहुजन आणि अजुन जे काही प्रकार असतील ते) बरोबर राक्षस , नागलोक , पाताळात राहणारे आणि इतर सर्व ) आणि आत्ता असुर गटातले काही प्रतिभावान , मोठी महत्त्वकांक्षा आणि बलशाली असलेली व्यक्ती , सुर गटाला आव्हान निर्माण करत होती आणि त्यातुन सगळ्या घटना घडत गेल्या असाव्यात ! म्हणजे अप्पान सगळे दुसऱ्या गटात येतो......... चला बघू आत्ता आपपसात भांडण्या पेक्षा , " बळीचे राज्य " नक्की की होते हे शोधण्याचा प्रत्यन करू !

In reply to by धुमकेतू

असूर हा शब्द अहूरमझ्दा या पर्शीयन देवतेच्या नावाचा अपभ्रंश आहे. वैदीक हे असूरांच्या विरोधात असल्यामुळे त्याना असुर = वाईट्/राक्षस असे ठरवले गेले. वैदीकानी नेहमीच इतरांच्या देवताना नावे ( टिंगल) ठेवले आहेत. बुद्दू या शब्दाचा उगम कशात आहे हे साम्गायला नकोच. बुद्धाने वैदीकांच्या कर्मकांडाच्या विरोधात बोलायला सुरवात केली त्याचे सांगणे लोकप्रीय झाल्यानंतर वैदीकानी त्याला विष्णूचा अवतार ठरवले मात्र त्याने जे सांगितले ते पाखंड होते. त्याचा अनुनय केल्यामुळे पाखंडी लोकांचा नाश झाला. म्हणजेच बुद्धाने पाखंडी लोकांचा नाश केला. अशी मल्लीनाथी जोडली. अवांतरः अठरा पुराणांमधे बुद्धपुराण असा काही प्रकार नाहिय्ये

In reply to by आशु जोग

बळीचा अपराध काय कार्यारंभी ( बहुधा यज्ञाच्या) गणपती पुजन न करणे.(संदर्भः--- मुद्गल पुराण) बळी विष्णु भक्त होता,त्यामुळे गणपतीचे पुजन का करावे ? असे म्हणुन त्याने कार्य सुरु केले,त्यामुळे त्याच्या कार्यात विघ्न निर्माण झाले.

In reply to by मदनबाण

हायला... म्हणजे शंकराचार्यांचा अद्वैतवाद खोटा आहे म्हणायचा.... सगळे देव एकच आहेत तर एका देवाची पुजा केली म्हणून दुसर्‍या देवानं कोपायचं काय कारण? बरं, कोपावं तेही किती... पार मरणाची शिक्षा देण्याइतपत?

In reply to by मदनबाण

देवांकडे जास्त करून सत्व गुण आणि रजोगुण असतात. ( अपवाद- शन्कर).. आणि असुरांकडे तमोगुण जास्त असतात. >>>>>>>>>>>>>>>>>. आपली पूजा केली नाही म्हणून एखाद्यावर कोपणे हा सत्वगुण आहे का?

In reply to by मदनबाण

मुद्गल पुराण बरेच अलीकडचे. १०व्या/११ व्या शतकातल्या. गणपती ही वैदिक देवता नसल्याने किंबहुना वैदिक काळी मूर्तीपूजेची प्रथा नसल्याने कार्यारंभी गणेशपूजनाचा प्रश्नच नव्हता.

In reply to by प्रचेतस

गणपती ही वैदिक देवता नसल्याने किंबहुना वैदिक काळी मूर्तीपूजेची प्रथा नसल्याने कार्यारंभी गणेशपूजनाचा प्रश्नच नव्हता. ह्म्म्म... गणांत्वा गणपति हवामहे' हा वैदिक मंत्र आहे.ऋग्वेदात "न ऋते त्वम क्रियते किं चनारे" असे म्हंटले गेले आहे, अर्थात गणपती शिवाय कुठल्याही शुभ कार्यास सुरुवात केली जात नाही. खाली मुद्गल पुराणातले एक स्तोत्र देत आहे त्यातली ४ थी आणि ५ वी ओवी जरुर वाचावी. http://sanskritdocuments.org/doc_ganesha/shankarAdikRitaMgajAnanastotra… त्याचा अर्थ असा :---शंकर आणि विष्णु यांचे कुलदैवत हे गणपती आहे. शिवाय ही गणपतीची आरती सुद्धा जरुर वाचा. http://alturl.com/x4oiw (दुसरी ओळ)

In reply to by मदनबाण

बाणा, "गणानां त्वा गणपति" मधल्या गणपती या शब्दामुळे ते गणपतीला चिकट्ले. नाहितर मंत्रपुष्पांजलीचा आणि गणपतीचा काही संबंध नाही. गणपती हा शब्द गणांचा पती/सरदार्/मुखिया या अर्थी त्याकाळी वापरात होता. सो त्याकाळी एकाच वेळी लै गण आणि त्यांचे लै गणपती अस्तित्वात होते असे कुठेसे वाचलेले आठवते. (आणि मलातरी पटते.) मुद्गल पुराण बरेच अलिकडचे... तोपर्यन्त गणपती देवता म्हणून बर्‍यापैकी एस्टॅब्लिश्ड होता.

In reply to by JAGOMOHANPYARE

ब्रह्मसमंध / भ्रमवृंद असले फडतूस शब्दच्छल करायचे, आणी नंतर आबुआगा झाला की आपण ब्राह्मणांना बोललोच नव्हतो असा कांगावा करायचा, हा खेळ या धाग्यावर पण चालू ठेवणार का रे?

In reply to by मदनबाण

हा दुवा बघा. यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. मुद्गल पुराण अलीकडचेच असल्याने त्यातले संदर्भ हे वैदिक काळाशी जोडता येत नाहीत. नाणेघाटातला नागनिकेचा शिलालेख जो जवळ जवळ २२०० वर्ष जुना आहे त्यात सातवाहनांनी केलेल्या यज्ञाचे उल्लेख आहेत. त्यात हे प्रारंभीचे वंदन केले आहे. ओम्‌ नमो प्रजापति - नो धंमस नमो ईदस संकंसन वासुदेवानं चंदसूतानं - ..मा..अतानं – चतुंनं चं लोकपालानं यमवरून कुबेर वासवा नंनमो – कुमार-वरस वेदिसिरिस र..ओ –.. प्रजापतिला नमस्कार असो. नमस्कार धर्माला, इंद्राला, संकर्षण वासुदेव यांना आणि चंद्रसूर्यांना ,महिमावतांना, चारही लोकपालांना म्हणजे यम, वरूण, कुबेर, वासव यांना नमस्कार. कुमारवर राजा वेदिश्री याची.... यात कुठेही गणेशवंदन नाही. तसेच सातवाहनांच्या इतर कुठल्याही शिलालेखात गणेशाचे कसलेही वर्णन नाही. सातवाहन हे वैदिक धर्माभिमानी असून ब्राह्मण होते हे येथे लक्षात घ्यावे.

In reply to by प्रचेतस

माझ्या इथुन तुम्ही दिलेला दुवा उघडत नाहीये,नंतर पाहतो. तो पर्यंत तुम्ही हे वाचा... http://www.maayboli.com/node/3569 http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-4943429,prtp…

In reply to by मदनबाण

दुव्यांबद्दल धन्यवाद बाणा. पण हे दुवे पण गणपती वैदिक देवता नाही हेच सांगतात.
गणपती ही मूळची आर्येतर देवता असल्याबद्दल बहुतेक संशोधकांचे एकमत आहे. हनुमान, देवी, वेताळ यांसारख्या आर्येतर ग्रामदेवतांबरोबर ती खेड्यात एखाद्या झाडाखाली असे. या सर्व देवतांना शेंदूर फासला जातो. या देवतांसमोर बळी देऊन त्या रक्ताचा अभिषेक करत असत. शेंदूर हे त्या रक्ताचेच प्रतीक आहे. आर्येतरांच्या विविध प्रकारच्या मूर्तिपूजा व देवता यांचा समावेश होऊन आर्य व आर्येतरांची संस्कृती एकात्म बनू लागण्याच्या काळात, इसवी सनापूर्वी व इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांत , गणपती हा देव आर्येतरांच्या इतर देवतांबरोबरच आर्यांनी स्वीकारला असावा.

In reply to by प्रचेतस

ह्म्म... हरकत इल्ले, आत्ता तरी माझ्याकडे लिहण्या सारखे काही नाहीये. तो पर्यंत.. गणपती बाप्पा मोरया... :)

नावाला साजेसा असाच धागा काढलायत की तुम्ही ;)

हे बघा.. सोनेरी पानवाले काय म्हणतात... http://hindutwawadi.blogspot.in/2011/04/blog-post_10.html थापाडे ... जर हिरण्यकश्यपुच्याही आधीच्या पिढ्या जर भारतातच होत्या, तर बळी हा परदेशी आक्रमक कसा काय ठरतो? एकंदर एखादी व्यक्ती विदेशी आहे या मुद्द्यावर राजकारण करणं ही ब्रह्मसमंधांची जुनी खोड दिसते.. :)

In reply to by JAGOMOHANPYARE

हे बघा.. सोनेरी पानवाले काय म्हणतात... http://hindutwawadi.blogspot.in/2011/04/blog-post_10.html थापाडे ... जर हिरण्यकश्यपुच्याही आधीच्या पिढ्या जर भारतातच होत्या, तर बळी हा परदेशी आक्रमक कसा काय ठरतो? एकंदर एखादी व्यक्ती विदेशी आहे या मुद्द्यावर राजकारण करणं ही ब्रह्मसमंधांची जुनी खोड दिसते.. Smile
ओह! मा..गॉड्श!!!!! .. ट्रिन्ग ट्रिन्ग... कॉलिन्ग टू कडवे पुरोगामी- राजघराणं....... कॉलिन्ग.... ;)

ब्राह्मण वि. बहुजन ! आस्तिक वि. नास्तिक ! देशी वि. विदेशी ! च्यायला... एकाच धाग्यात कसला माल भरलाय ! आजकाल पुराणकथांवरून वर कुठलाही धागा काढला की १०० धावा नक्की !

माझ्या आई २००७ मधे देवाघरी गेल्या,त्या दर दिवाळी च्या भाउबिजे च्या दिवशी भावाना ओवाळताना म्हणायच्या अडिच पिडि च जाउ दे बळिचं राज्य येउ दे कोट दसरा,कोट दिवाळी राजाराम करा अडिच पिडि च जाउ दे बळिचं राज्य येउ दे कोट दसरा,कोट दिवाळी राजाराम करा असे तीन वेळा म्हटल्या नन्तर माझ्या आई त्यान्च्या हातातील अंगठी ने ओवाळण करायच्या कारण बळि राजा च्या राज्यात सगळे सुखी होते व भाउबिजै च्या पुढिल दिवशी बलिप्रतिपदा असते व दिवाळि पासुन हिन्दुन्चे नविन वर्ष सुरु होते,हिन्दुस्तानात पुन्हा बळिचे राज्य येइल काय कि सध्या बळि तो कान पिळि राज्य चालु आहे ते मला कळत नाहि,जर कोणा मिपा कर कडे याचे उत्तर असेल तर मला कळवा

In reply to by शकु गोवेकर

दिवाळि पासुन हिन्दुन्चे नविन वर्ष सुरु होते सगळ्या हिंदूंचे एक असे कॅलेंडर नाही. गुजरात्-राजस्थान कडील हिंदूंचे नवे वर्ष दिवाळीपासून सुरु होते परंतु, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटकातील हिंदूंचे नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरु होते.

टिपा-१)माझ्या आई २००७ मधे गेल्या तेव्हा त्यान्चे वयमान ८७ होते २)गुडीपाड व्याला हिन्दुन्चे शालिवाहन शके व दिवाळीनन्तर विक्रम शके सुरु होते.साधारण दस रा पुर्वि नविन पिके तयार होतात व शेतकरी किवा बळीराजा तेव्हा खुश असतो व त्याचे स्वागत ईडा पिडा टळुन करतात

एवढ्या देवांवर भारी. ते सुद्धा बलात्काराने. तेंव्हापासुन ही शिस्टीम होती तर.

वामन, रावण, विभीषण अथवा त्यांच्या वडीलांना ब्राह्मण म्हणणे चुकीचे ठरेल. त्या काळी ब्राह्मण नावाची कुठलीही जात नव्हती. हे सगळे लोक विप्र होते. त्या काळच्या विप्रांचा आणि आजच्या ब्राह्मणांचा काहीही संबंध नाही. (म्हण्जे त्या काळच्या विप्रांना आज ब्राह्मण म्हटले जाते असे नाही.) असे कुठेतरी वाचले होते... संदर्भ सापडल्यास जरूर चिकटवतो. बाकी चालू द्या(यला तशी कुणाचीच परवानगी लागत नाही म्हणा).

मी कट्टर बिट्टर काही नाही... सावरकर; आंबेडकर; फुले आणी गांधींवरही भाषणे देतो वैयक्तिक जात पात काढू नये ही विनंती. कडवा पुरोगामी .
ह्म्म.. एका सावरकरांशी रिलेटेड संस्थेतले आपले सदस्यत्व माहित असून त्या संस्थेशी माझाही काही कारणास्तव संबंध आलेला आहे. .. असो! म्हणूनच वरील एका प्रतिसादात जामोप्या'ने दिलेल्या स्वा.सावकर-रिलेटेड लिन्कमध्ये जी एका 'श्रोत्री' नामक माणसाने बळीराजाविरुद्ध उलटसुलट विधाने केलेली आहेत.. त्याबद्दल मी आपले मत विचारले होते.. :) आणि वैयक्तिक जातपात काढण्यात मला कसलाच इन्टरेस्ट किन्वा फायदा नाही.. परन्तु.. "म्रुगनयनी किंवा तत्सम लोकांची मते एक दिवस समस्त ब्राह्मणवर्गाचा बळी घेतील - ही भविष्यवाणी आहे !" ह्या आपल्या वाक्यामुळे मला आपली जात लिहावी लागली.. कारण माझ्या मतांमुळे कुणाचा बळी गेलेला मला आवडणार नाही!!! :) त्यामुळे जसे आपल्यास जात काढलेली आवडत नाही.. तसेच ती इतर कुणाची काढणेही चुकीचे आहे... किन्वा मग अश्या जातीवादी प्रतिक्रियांवर, वाक्यावर कमेन्ट्स करताना काळजी घ्यावी.. - कट्टर हिन्दुत्ववादी! टीप : माझे नाव "मृगनयनी" असे आहे... कृपया ते तसेच लिहिल्यास बरे होईल! * तसेच.. जामोप्या'ने दिलेल्या http://hindutwawadi.blogspot.in/2011/04/blog-post_10.html या सावरकरांच्या लिन्क वरच्या बळीराजाबद्दल'च्या विचारांबद्दल आपणास काय वाटते.. हे जाणून घ्यायला आवडेल!.. तसेही आपण सावरकर, फुले, गान्धी, आम्बेडकर... या सगळ्यांना मानता.. त्यामुळे या लिन्कबद्दल अधिक विस्तृत विश्लेषण देऊ शकाल!! :) हा प्रश्न मी आपणास बहुधा तिसर्‍यान्दा विचारत आहे.... तोही या धाग्याशी संबंधित!.. त्यामुळे कृपया हा प्रश्न टाळू नये.. ही नम्र विनन्ती.. :)

जामोप्या'ने दिलेल्या http://hindutwawadi.blogspot.in/2011/04/blog-post_10.html या सावरकरांच्या लिन्क वरच्या बळीराजाबद्दल'च्या विचारांबद्दल मी का लिहू ? सावरकरांचा फोटू लावला मग काय त्याला मी बांधील होतो ? माझ्या घरी आंबेडकरांचा फोटो लावलाय... त्यामुळे मी मुळनिवासिंच्या येडेगिरिला बांधिल नाही. तसेच सावरकरांवर पुस्तक लिहिले म्हणून त्या हिंदुत्ववाद्याच्या बावळटपणावर भाष्य करायलाही बांधील नाही. तै आता मिटवून घ्या चू भू द्या घ्या

In reply to by राजघराणं

धन्यवाद!!!.. तुमच्या पुरोगामीपणाबद्दल!!! आज पुन्हा एकदा ""ते"" ऑर्कुटवर'चे तुम्ही दिसलात!!.... :) आवडलं आपल्याला !!! ..... :)

In reply to by मृगनयनी

त्या हिंदुत्ववादीच्या ब्लॉगवाल्याला विचारा.. हा महान इतिहास त्याना कुठून मिळाला ते. सातवे सोनेरी पान असल्याच्या थाटात लिहून ठेवले आहे. वर सावरकर, अफजलखान, शिवाजी आणि बाजुला नथुराम... !!!! कशाची सांगड कशाला घालायची हे त्यालाच विचारा... तुम्हाला समजलं तर आम्हालाही सांगा. :)

प्रतिसादांची शंभरीसुद्धा गाठता आली नाही या धाग्याला आणि म्हणे वाद घालणार.. बळी आणि वामन राहिले बाजूला. भलत्याच विषयावर काथ्याकूट सुरु झाला. असो. या चर्चेत जे मुद्दे आले नाहीत त्याविषयी माहिती देऊ इच्छितो. वामनाचे मंदिर नाही, तसे बळीचेही मंदिर नाही. बळी दानी होता आणि जे मागेल ते देत असे, पण त्याचा सूक्ष्म अहंकार त्याच्या मनात निर्माण झाल्याने आणि देवलोकाचे स्वातंत्र्य धोक्यात आल्याने विष्णूने वामनावतार घेतला. या अवताराचे वैशिष्ट्य म्हणजे तो नि:शस्त्र होता. अन्य अवतारांत विष्णूला हाती शस्त्र घ्यावे लागले आहे. वामनाने तिसरे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेऊन त्याला पाताळाचा अधिपती केले आणि गर्वपरिहार झाल्यावर त्याला वरदानही दिले. पाताळात बळीच्या दारावर पहारा देण्यासाठी स्वतः उभे राहण्याचे विष्णूने मान्य केले. (मग तो वैकुंठात कधी जाणार, असे प्रश्न पडू नयेत. आमचा विष्णूदेव काहीही चिमित्कार करु शकतो म्हटलं) बळी आणि वामन या दोघांबद्दलही लोकांत आदर आहे. त्याच्या स्मरणार्थ आजही बलिप्रतिपदा आणि वामनद्वादशी या दोन तिथी साजर्‍या केल्या जातात. वामनावताराची ही कथा प्राचीन आहे. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातच तिचा व विष्णूचा उल्लेख येतो. (अर्थात हे मंडल मूळ ऋग्वेदात मागाहून जोडण्यात आले असल्याने ही कथाही नंतरच्या काळातली व म्हणूनच ऋग्वेदात घुसडली गेली असल्याची शक्यता आहेच.) विष्णू कपटी आहे म्हणून त्याला दान देऊ नकोस, असे असुरांचे गुरु शुक्राचार्य म्हणाले होते, परंतु 'प्रत्यक्ष विष्णू दान मागतोय' या अभिमानाने बळीने त्या इशार्‍याक्डे लक्ष दिले नाही. निरुपायाने शुक्राचार्यांनी एका किड्याचे रुप घेतले व दानाचा संकल्प सांगताना ते झारीच्या तोटीत जाऊन बसले. त्यामुळे बळीच्या हातावर पाणी पडेना. मग वामनाने एक दर्भाची काडी घेऊन तोटीत घातली. त्यात शुक्राचार्याचा एक डोळा फुटला आणि ते झारीतून बाहेर आले. (कामात अडवणूक करणार्‍याला 'झारीतील शुक्राचार्य' म्हणण्याचा प्रघात तेव्हापासून पडला.) ------------------------------------------------------------------------------------------------- पराक्रमाचा दुरभिमान व सीतेचे अपहरण यामुळे रावणाचा नाश झाला. पण रावणाच्या अंगी गुणसंपदा दुर्गुणांहून जास्त होती. रामानेही या शत्रूचा आदर केला आहे. रावणाला मारल्यानंतर तो लगेच मेलेला नव्हता. रावण घायाळ होऊन पडला असताना रामाने लक्ष्मणाला त्याच्याकडे पाठवले व शिष्य बनून राजनीती शिकण्यास सांगितले. त्यावेळी राम लक्ष्मणाला म्हणाला, 'तो महाज्ञानी व पंडित आहे. त्याच्यासमोर उभे राहून बोलू नकोस. पायाशी बसून नम्र भावाने ज्ञान घे. रावणानेही मरताना लक्ष्मणाला राजनीती शिकवली. रावण हा उत्तम संगीतज्ञ, वैद्य, शिवभक्त, वेदांचा अधिकारी होता. रावण जरी ब्राह्मण असला तरी ब्राह्मण हे नेहमीच रामाचे भक्त आहेत. ते रावणाचा अभिमान बाळगत नाहीत. परशुराम ब्राह्मण असला तरी त्याच्या कृत्याला इतर ब्राह्मणांनी क्षमा केलेली नव्हती. जिंकलेली भूमी कश्यप ब्राह्मणाला दान दिल्यानंतर कश्यपाने परशुरामाला, ' तू रक्तलांच्छित असल्याने आता माझ्या भूमीवरुन चालता हो' असे सांगून हाकलून दिले. त्यामुळेच परशुरामाला अपरांत भूमी निर्माण करावी लागली. परशुरामाचा संघर्ष हा सर्व क्षत्रियांशी झालेला नव्हता. केवळ बलोन्मत्त आणि समाजावर अत्याचार करणार्‍यांना त्याने आव्हान दिले. जे क्षत्रिय संघर्षातून वाचले त्यांना कश्यपाने ही भूमी पुन्हा परत दिली. (ब्राह्मण आणि क्षत्रिय असे कप्पे पाडून विचार करणारे संकुचित लोक हे बारकावे लक्षात घेत नाहीत.) ------------------------------------------------------------------------------------------------- चला पुरेशी लाकडे घातली आहेत. आता सुरु करा बघू खेळ. :)

In reply to by योगप्रभू

ऋग्वेदात १.२२.१८ मध्ये विष्णूने तीन पावलात जग आक्रमिले. इतकाच बोटभर उल्लेख आहे. त्यात वामन, बळी, शुक्राचार्य इतरांचा कुणाचाच उल्लेख नाही. हा वामनाचा उल्लेख आहे, अशी समजूत आहे. प्रत्यक्षात, विष्णू हा ऋग्वेद काळात आदित्याचेच रुप मानला जात होता.. नारायण हा विष्णू आणि सूर्य या दोघानाही समानार्थी शब्द आहे. त्याचे मूळ यातच आहे. त्यामुळे तीन ठिकाणी विष्णूने पाय रोवले. त्याच्या तेजाने जग स्तिमित झाले आणि तीन्ही लोक त्याने आक्रमिले, हे खरे तर सूर्याचे वर्णन आहे, असे काही लोकांचे मत आहे.

In reply to by JAGOMOHANPYARE

विष्णू आणि सूर्य ही एकाच दैवताची दोन नावे असावीत, असे वाटत नाही कारण विष्णूचा उल्लेख ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात आहे आणि पहिले व दहावे मंडल हे मूळ ऋग्वेदात नंतरच्या काळात प्रक्षिप्त आहे, याचे अनेक पुरावे वाचतानाच आढळतात. सूर्य ही वेदातील मूळ उपास्यदैवतांपैकी एक. त्याचा उल्लेख मात्र मूळ मंडलांत सर्वत्र आहे. तो देवमाता अदितीचा पुत्र म्हणून त्याला 'आदित्य' नाव आहे. गंमत म्हणजे प्रारंभी सूर्य व वरुण यांना असुर मानले आहे. असुर हा शब्द त्याकाळी 'जे सुर नाहीत ते' इतकाच सूचक दिसतो. म्हणजे सूर्य व वरुण हे बाहेरुन दैवत्व प्राप्त झालेले आहेत. असेच ऋभुंच्याबाबत झालेले आहे. ऋभु , वज व विभवन् ही अंगिरसाचा वंशज सुधन्वाची मुले म्हणजे मानव, पण त्यांच्या कर्त्रुत्वामुळे त्यांचा समावेश देवमंडलात झाला. विष्णू ही वैदिक संस्कृतीत सूर्यानंतर बरीच उशिरा स्वीकारली गेलेली देवता असावी.

या धाग्यावर जातीद्वेष पसरवणारे प्रतिसाद सातत्याने काही सदस्यांकडून दिले जात आहेत. या धाग्यावर यापुढे जातीय स्वरूपाचे प्रतिसाद येत राहिले तर धागा वाचनमात्र करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.

भगवान विष्णुचा द्वापारयुगातील भाऊ "बलराम"/ "बळीराम" याला देखील शेतकर्‍याचे प्रतीक मानले गेले आहे. त्रेतायुगातील "राम" द्वापारयुगात "कृष्ण" झाला. तर "लक्ष्मण" "बळीराम" म्हणून (रोहिणीच्या पोटी) जन्मला.. तो कृष्णाचा मोठा भाऊ होता. बळीरामाकडे मुसळ, नान्गर इ गोष्टी असायच्या. त्यामुळेच बळीरामास "हलधर" असेही म्हटले जाते. युद्ध करताना देखील बळीराम मुसळ्,नान्गर इ. शेतीउपयोगी गोष्टींचाच जास्त वापर करायचा. त्यामुळे कदाचित "बळीचे राज्य येऊ दे" मधला "बळी" हा कृष्णाचा भाउ "बलीराम"ही असू शकतो... कारण वामनामुळे चिरन्जीवी झालेल्या बळीचा शेतीशी काही विशेष सम्बंध असल्याचे सन्दर्भ कुठे सापसत नाही. फक्त "या वामनाने पावन झालेल्या बळीच्या राज्यात सर्व आबादीआबाद होते" येवढीच माहिती कळते... तर कृष्णाचा भाऊ- बलीराम याचा शेतीशी सम्बन्ध असल्याचे जास्त सन्दर्भ सापडतात... त्यामुळे तो बळी हाच्च!.. असे वाटते!! :) * सम्बंधितांचे उचित प्रतिसाद अपेक्षित! :)

In reply to by JAGOMOHANPYARE

आम्ही काही जुन्या स्टोर्‍यांमध्ये, पाळण्यांमध्ये वगैरे बलरामा'चा उल्लेख 'बळीराम' असा वाचला आहे आणि ऐकला आहे. त्यामुळेच आमच्या मनी शन्केची पाल चुकचुकली... तसेच बलराम/ बळीराम याच्या हाती नेहमी नांगर धरलेले असायचे.. म्हणून याचा आणि शेतकर्‍यांचा जास्त सम्बंध वाटतो.. :) यु पी. कडे वगैरे.. बलराम असा उच्चार असला तरी पूर्वीचे मराठी लोक "बळीराम" किन्वा "बळराम" असा उच्चार करायचे / करतात.. .. .. .. :|

In reply to by मृगनयनी

शेतकर्‍याला बळीराजा हा शब्द सर्व प्रथम म. फुले यांनी वापरला . बहुतेक शेतकर्याचा आसूड या ग्रंथात. चुभूदेघे.

In reply to by प्रचेतस

मला वाटते.. म. फुल्यांच्या आधीपासून "इडा पीडा टळू दे, बळीराज्य येऊ दे" हे वाक्य प्रचलित होते.. कारण सर्व मराठी घरांमध्ये पूर्वापार बलिप्रातिपदेला बलीपूजनाच्या वेळी हे वाक्य म्हटले जाते. :) म. फुल्यांनी म्हटले असते.. तर कदाचित सर्व घरांमध्ये ते इतके प्रचलित झाले नसते.. :|