✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फोटोशॉप किडे - ३ (फोकसिंग आणि polygonal lasso tool)

स
स्पा यांनी
Fri, 05/04/2012 - 11:18  ·  लेख
लेख
फोटोशॉप किडे - १ फोटोशॉप किडे - २ नमस्कार.. आजच्या भागात आपण polygonal lasso टूल चा एक उपयोग पाहणार आहोत polygonal lasso हे टूल.. selection साठी वापरल जात , इखाद्या फोटो वरचा आपण आपल्याला हवा तो भाग आपण या टूल ने सिलेक्ट करू शकतो फोकसिंग ... फोटोग्राफी मधला अत्यंत महत्वाचा भाग .. फोकसिंग मुळे फोटो खूप उठून दिसतो.. आपल्याला हव ते ऑब्जेक्ट आपण SLR कॅम ने सिलेक्ट करू शकतो. इवन डीजीकॅम मध्ये ऑटो focus ची सोय असते.. पण तरीही जर आपल्याला तसा इफेक्ट हवा असेल तर फोटोशॉप दिमतीला आहेच ... मला हवी तशी इमेज सापडत नव्हती.. म्हणून मी माझ्याच फोन च केलेलं "3d rendar " वापरतोय , नेहमी प्रमाणे इमेज चा एक layer बनवला त्यावर gaussian blur फिल्टर दिला आता डाव्या बाजूच्या टूल panel मधून polygonal lasso tool घ्या संपूर्ण मोबिल व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या आणि सिलेक्ट झालेला भाग सरळ डिलीट मारून टाका झालं काम तमाम :)

Book traversal links for फोटोशॉप किडे - ३ (फोकसिंग आणि polygonal lasso tool)

  • ‹ फोटोशॉप किडे - २ ( ब्लर फिल्टर)
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
17558 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

मस्त रे मन्या

कुंदन
Fri, 05/04/2012 - 11:23 नवीन
मस्त रे मन्या फेणे. लै भारी लेखमाला लिहित आहेस. पुलेशु
  • Log in or register to post comments

मन्या भाउ ,

चौकटराजा
Fri, 05/04/2012 - 12:27 नवीन
मन्या भाउ, सगळ्याना पार्श्वभूमी( आईच्या भाषेत background) मस्त पणे डिफोकस करायला जमत नाही किंवा कॅमेर्‍याचा मर्यादा आड येतात याना ही आयडीयेची कल्पना मस्त दिली आहेस .पण एखादे फुलपाखरू फोकस करून फुले डिफोकस केल्याचे उदाहरण अधिक चांगले ठरले असते. पुभाशु
  • Log in or register to post comments

तेच सांगतोय ना.. तसा फोटोच

स्पा
Fri, 05/04/2012 - 12:29 नवीन
तेच सांगतोय ना.. तसा फोटोच सापडत नव्हता ,.....
  • Log in or register to post comments

उदाहरण

स्पा
Sat, 05/05/2012 - 11:54 नवीन
.
  • Log in or register to post comments

लै भारी रे मन्या. अजून काही

प्रचेतस
Fri, 05/04/2012 - 12:43 नवीन
लै भारी रे मन्या. अजून काही टूल्सची ओळख करून दे.
  • Log in or register to post comments

हा धडा भलताच सोप्पा होता. :)

गणपा
Fri, 05/04/2012 - 12:52 नवीन
भ्रमणध्वनीची पार्श्वभुमी (टेबलाचा रंग) काळपट असल्याने बदल म्हणावा तसा उठुन दिसत नाही. गुर्जी पुढल्या भागात ते 'पेन टूल' कस वापरायचे तो धडा घ्या. :)
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लेख, मातृभाषेचा

सूड
Fri, 05/04/2012 - 13:00 नवीन
अतिशय सुंदर लेख, मातृभाषेचा योग्य तेवढाच केलेला वापर आवडला. panel मधून polygonal lasso tool घ्या त्यावर gaussian blur फिल्टर दिला याचं विनाकारण मराठी भाषांतर न केल्याबद्दल आभार. मराठीचा वापर हवा मान्य, पण ज्यांच्यासाठी लिहीलंय त्यांच्या डोक्यावरुन जाणार असेल तर समजेल अशा भाषेत लिहीणं केव्हाही योग्य.
  • Log in or register to post comments

हे कसं वाटतंय ?

चौकटराजा
Fri, 05/04/2012 - 13:18 नवीन
Image removed. चौ रा ची उलीशीक कला - प्रथम लॅसो नंतर गॉसीयन ब्लर .
  • Log in or register to post comments

हे कसं वाटतंय ?

प्रचेतस
Fri, 05/04/2012 - 13:24 नवीन
Image removed. आमचीही उलीशीक कला - कुठलंही टूल किंवा ब्लर न वापरता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मन्या भाड्या (हे प्रेमानं

प्यारे१
Fri, 05/04/2012 - 14:47 नवीन
मन्या भाड्या (हे प्रेमानं बरं) शिक जरा काहीतरी. शिक ह्या चिंचवडवासीयांकडनं.... क्लास घेतोय क्लास! काही येतं तरी का करायला? बघ जरा वर. कसलं भारी फुलवलंय ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

येस.. मी यापुढे चौरा काकां

स्पा
Fri, 05/04/2012 - 14:54 नवीन
येस.. मी यापुढे चौरा काकां कडूनच शिकेन म्हणतो.. आणि पुढचे क्लास काकाच घेतील असे जाहीर करतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मग धडा पहिला

चौकटराजा
Fri, 05/04/2012 - 14:58 नवीन
मग धडा पहिला मनु, गॉसीयन ब्लर म्हणजे गाववाल्यानी केलेले ब्लर ! मोशन ब्लर म्हणजे जास्त मोशन झाले की डोळ्यासमोर सारं भुरकट दिसायला लागतं ते ब्लर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

छानच रे वल्ली !! तुझ्याकडे

सूड
Fri, 05/04/2012 - 15:06 नवीन
छानच रे वल्ली !! तुझ्याकडे शिकायला येईन म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चार आणे आमचेही

अन्या दातार
Fri, 05/04/2012 - 19:52 नवीन
Image removed. काहीही प्रक्रिया न करता फक्त लेन्सने केलेला फोकस. कॅमेरा: कॅनन ५०० डी (डीएसएलआर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कॅनन ५०० डी (डीएसएलआर)कॅनन

प्रचेतस
Sat, 05/05/2012 - 10:24 नवीन
कॅनन ५०० डी (डीएसएलआर) मी वापरणार मी ही हुच्चभ्रू होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

वल्ली व आपले उदाहरण मस्तच

चौकटराजा
Sat, 05/05/2012 - 10:25 नवीन
वल्ली व आपले उदाहरण मस्तच आहे पण धागा फोटोग्राफी नसून फोटोशॉप चा डिफोकस मधे उपयोग काय ? असा आहे. फोटोशॉप हा एक प्रकारे पोस्ट प्रॉडक्शन चा भाग आहे. खरे तर फोकस साठी फोटोशॉपचा फारसा उपयोग होत नाही ब्लरच्या साह्याने डिफोकस साठी होतो. अनशार्पे वापरून अगदी अल्प प्रमाणात फोकसिंग सुधारता येते. पण एकूण फोटोतील विषय फोकस न होणे या सर्वात गंभीर अपराधच ठरतो.त्याला कोणताच विडीओ एडीटर फारशी मदत करू शकत नाही. ही माझी माहिती चूक असल्यास मास्तर मन्या गुर्जी मला छडी मारतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

माझे ५ पैसे.. सायबरशॉट १२ मेगापिक्सल आणि ३ X झूम च्या मदतीने..

मोदक
Sun, 05/06/2012 - 14:20 नवीन
गौरीचे हात Image removed. हे काय आहे ते माहीत नाही.. Image removed. हे पण.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

ठिक आहेत

अन्या दातार
Sun, 05/06/2012 - 14:37 नवीन
<चौरा मोड ऑन> पहिल्या फोटोत तुमचे लक्ष कुणा दुसर्‍याच्या (दुसरीच्या) हाताकडे असावे असे वाटते. नक्की काय फोकस करायचे आहे ते कळलेले तरी नसावे बहुदा. इथे फोटोशॉप वापरुन थोडी बॅकग्राऊंड ब्लर करता येईल व फोटो उच्च दर्जाचा बनवता येईल. दुसर्‍या फोटोत एकापेक्षा अधिक जागा फोकस झाल्यात. उजवीकडचा काटा फोटोत रुततोय. तिसर्‍या फोटोत गवतावर का फोकस केले आहे? गवत फोकस करायचे असेल तर त्याची जागा चुकलीये असे नमूद करतो. <चौरा मोड ऑफ> (अश्याच चुका करत शिकत असणारा) अन्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अबे ३ X झूम मधून आणखी काय अपेक्षा करणार..

मोदक
Sun, 05/06/2012 - 14:54 नवीन
अबे ३ X झूम मधून आणखी काय अपेक्षा करणार.. म्हणून तुझ्या चार आण्याच्या पुढे माझे पाच पैसे असे लिहिले आहे. :-) आणि हो.. गौरीच्या हातात दिसणारा लाईट फ्लॅशचा नाहीये.. ते फूल तसेच असते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

अबे, इथे झूमचा काय संबंध? हे

प्रचेतस
Sun, 05/06/2012 - 14:55 नवीन
अबे, इथे झूमचा काय संबंध? हे काय लांबचे फोटू थोडेच आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अरे ते फूल लैच गचपणात होतं.. फोटो साठी थोडे झूम करावे लागले.

मोदक
Sun, 05/06/2012 - 15:16 नवीन
अरे ते फूल लैच गचपणात होतं.. फोटो साठी थोडे झूम करावे लागले.. :-( त्यामुळे फसला वाटते... तू क्लास कधी सुरू करतो आहेस..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी वर्ग घेत नाही

प्रचेतस
Sun, 05/06/2012 - 15:33 नवीन
मी वर्ग घेत नाही, माझे प्रकाशचित्रउपकरण पण साधेच आहे, मला प्रकाशचित्रदुकान पण येत नाही. वर्गांसाठी श्री. चौराकाका यांचेकडे नोंदणी करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

पण

चौकटराजा
Mon, 05/07/2012 - 10:09 नवीन
पण प्रकाशचित्रदुकानाची शिकवणी लावायची असेल तर प्रकाशचित्र दुकानाचे मदत पान मात्र नरेंद्र बुवा गोळे यांचेच असेल अशी पूर्वअट अर्जात घालणेत आलेली आहे. वि सू - यापेक्षा चिंचवड ठाकुर्ली त्रैमासिक पास " सहन" करता येईल ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

-१

प्रचेतस
Mon, 05/07/2012 - 10:20 नवीन
प्रकाशचित्र दुकानाचे मदत पान मात्र नरेंद्र बुवा गोळे यांचेच असेल अशी पूर्वअट अर्जात घालणेत आलेली आहे
'मदत' आणि 'अर्ज' हे फारसी शब्द असल्याने वरील सूचना फाट्यावर मारण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मराठी भाषेच्या बखरीत ...

चौकटराजा
Mon, 05/07/2012 - 10:24 नवीन
मराठी भाषेच्या बखरीत डोकावल्यास तिच्यावर पोरतुगीज , फारसी, अरबी, कन्नड गुजराती यांचा प्रभाव जाणवेल. मला वाटते बखर हा शब्दच तर फारसी नाही ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मराठी भाषेच्या सध्याच्या

प्रचेतस
Mon, 05/07/2012 - 10:36 नवीन
मराठी भाषेच्या सध्याच्या स्वरूपाकडे पाहिल्यास तिच्यावर इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज भाषांचाही प्रभाव जाणवेल. स्वतः कृष्णाजी अनंत सभासद व्हाईसरॉयचा उल्लेख विजरई असा करतो. विजरई हा शब्द मूळ मराठी नाही ना हो काका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

'मदत' आणि 'अर्ज' हे फारसी

स्पा
Mon, 05/07/2012 - 10:30 नवीन
'मदत' आणि 'अर्ज' हे फारसी शब्द असल्याने वरील सूचना फाट्यावर मारण्यात आली आहे. तुमच्या मताचा आदर आहे --धर्मेंद्र मसल्स चे गोळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

इथे फोटोशॉप वापरुन थोडी

चौकटराजा
Mon, 05/07/2012 - 10:18 नवीन
इथे फोटोशॉप वापरुन थोडी बॅकग्राऊंड ब्लर करता येईल व फोटो उच्च दर्जाचा बनवता येईल. तो हुच्च आहे अशी बतावणी करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

मोदका, गौरीच्या हाताचा पहिला

यकु
Sun, 05/06/2012 - 18:33 नवीन
मोदका, गौरीच्या हाताचा पहिला फोटो आवडला रे. गुलाबी पाकळ्यांतून फाकलेली कोटी चंद्र दिव्य प्रभा क्लास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

शेवटचा फोटो पाहून

sagarpdy
Fri, 05/04/2012 - 13:41 नवीन
शेवटचा फोटो पाहून इन्जीनीअरिन्ग च्या प्रोजेक्ट ची आठवण आली. आम्ही त्यात चित्राचा हवा तो भाग स्पष्ट ठेवून बाकी ब्लूर केला होता (चित्राला जागा कमी लागावी म्हणून). चालू द्या.
  • Log in or register to post comments

पहिल्या आणि दुसर्‍या फोटोत

यकु
Fri, 05/04/2012 - 14:25 नवीन
पहिल्या आणि दुसर्‍या फोटोत भांड्यावरचे प्रतिबिंब धुसर झाल्याने बराच फरक जाणवतोय. तेव्हा स्पाजी, भावना फोचल्या. :p फुडचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments

उत्तम , अत्यंत उपयुक्त.. लगे

गवि
Fri, 05/04/2012 - 14:38 नवीन
उत्तम , अत्यंत उपयुक्त.. लगे रहो मन्याबापू...
  • Log in or register to post comments

मस्त...

मुक्त विहारि
Fri, 05/04/2012 - 14:45 नवीन
गाववाले, अजून येवू देत...
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Fri, 05/04/2012 - 14:49 नवीन
मस्त रे, येऊ दे पुढचा धडा! :)
  • Log in or register to post comments

मस्त रे

स्मिता.
Fri, 05/04/2012 - 15:05 नवीन
अजून एक छान माहिती दिलीस. आणखी येवू दे.
  • Log in or register to post comments

सुरेख !

परिकथेतील राजकुमार
Fri, 05/04/2012 - 15:58 नवीन
छान माहिती देत आहेस रे स्पा. :) फक्त पुढच्या वेळी फोटोशॉप हे सॉफ्टवेअर ज्यांनी जन्माला घातले असे काही धुरिणी मिपावरती आहेत, त्यांना दाखवून मग इथे लेख प्रकाशित करत जा. तसेच तुझ्या लेखनात काही आंग्ल भाषेतील शब्द सतत डोकावताना दिसतात. त्यात त्वरित सुधारणा आवश्यक आहे हे ध्यानात घे.
  • Log in or register to post comments

म्ह़ंजे

चौकटराजा
Sat, 05/05/2012 - 15:14 नवीन
>पुढच्या वेळी फोटोशॉप हे सॉफ्टवेअर ज्यांनी जन्माला घातले असे काही धुरिणी मिपावरती आहेत, याचा अर्थ थॉमस नॉल मराठी शिकला की काय पुष्पा सराफ कडून ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छानच रे मण्या

प्रशांत
Fri, 05/04/2012 - 16:41 नवीन
छानच रे मण्या पुढचा भाग लवकरच येवू देत
  • Log in or register to post comments

कळलं!

पैसा
Fri, 05/04/2012 - 19:21 नवीन
पुढचा भाग लवकर दे!
  • Log in or register to post comments

सर्वात अधी मन्या मला

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/04/2012 - 20:51 नवीन
सर्वात अधी Image removed. मन्या मला तुझ्याकडून हे खास शिकायला लागणार,माझ्या फुलांच्या रांगोळ्यांच्या फोटूंना काय बहार आणता येइल नै..? Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Fri, 05/04/2012 - 22:14 नवीन
लेख हो, मनोबा. बाकी पराशी बाडिस! फोकसवरून हा क्यामेरा आठवला - https://www.lytro.com/learn
  • Log in or register to post comments

मा.श्री.स्पाजी, मागच्या

५० फक्त
Sat, 05/05/2012 - 07:09 नवीन
मा.श्री.स्पाजी, मागच्या धड्यांपेक्षा थोडा कमी प्रतीचा आहे हा धडा, तुम्हाला जे शिकवायचे आहे ते तुम्ही दिलेल्या छायाचित्रांवरुन समजत नाही.
  • Log in or register to post comments

वा चान

सौरभ उप्स
Sat, 05/05/2012 - 12:08 नवीन
वा चान फोटोशोप न येनार्यान्साठी हे उत्तम प्रशिक्षण आहे, उदाहार्नासठी आमचा फोटो वापरल्याबद्दल धन्यवाद.......
  • Log in or register to post comments

सौरभ काका.. तुम्ही लिहा कि

स्पा
Sat, 05/05/2012 - 12:09 नवीन
सौरभ काका.. तुम्ही लिहा कि आता.. तुम्ही आमचे गुरु
  • Log in or register to post comments

स्पा

अमृत
Sat, 05/05/2012 - 15:03 नवीन
एक्दम मस्त... आपल्याला तुमची ही मालिका आवडलेली आहे हे पहिल्या भागातच बोललो आहे... अजुन येउ द्या स्वागत आहे... अवांतर - सोबतच जर तुमच्या त्या भयकथा परत सुरु करू शकाल तर सोने पे सुहागा अमृत
  • Log in or register to post comments

@अवांतर - सोबतच जर तुमच्या

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/05/2012 - 15:18 नवीन
@अवांतर - सोबतच जर तुमच्या त्या भयकथा परत सुरु करू शकाल तर सोने पे सुहागा >>> +1 च.चा. मोड ऑन>>> लिही ना गं परत भयकथा... मनुकडी<<<च.चा. मोड ऑफ ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

काय गुर्जी आज भारी लाडात आला

स्पा
Sat, 05/05/2012 - 15:20 नवीन
काय गुर्जी आज भारी लाडात आला आहात एकच प्रतिसाद ३ ३ वेळा लिहित आहात अवांतर : झेंडा उंच रहे हमारा
  • Log in or register to post comments

ए...ते मोबॉइल वर असल्यामुळे

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/05/2012 - 18:44 नवीन
ए...ते मोबॉइल वर असल्यामुळे चुकुन पडलेत... आणी वाक्य माझं असलं,तरी लाडाच्या आत तुझा लाडिक च.चा. हाय ना..? ;-) अ-वांतर- गेंडा धष्टपुष्ट रहे हमारा :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हा माझा एक

मदनबाण
Sun, 05/06/2012 - 22:09 नवीन
Image removed. हा माझा एक प्रयत्न... सॉफ्टवेयर न-वापरता. :) कॅमेरा:--- निकॉन पी-१००
  • Log in or register to post comments

धागा बाजूला राहिला

चौकटराजा
Mon, 05/07/2012 - 10:15 नवीन
चौ रा मोड ऑन धागा बाजूला राहून कॅमेरा डिफोकसचे पेव फुटले. अंकीय- प्रकाशचित्र- यंत्रात मृदुमाल असतोच की ! चौ रा मोड ऑफ चित्र सुंदर आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा