फार फार वर्षापूर्वीची गोष्ट, आमचे काका मिलिटरीमधून निवृत्ती घेउन कोकणातल्या आपल्या गावी जाऊन राहीले.
परिस्थिती अशी की बसून खाणे शक्य
कारण अनेक आंबे फणस काजु कोकमाच्या स्वतःच्या बागा.
पण स्वस्थ बसवेना...
घराच्या पुढील बाजूस एक छोटंसं दुकान टाकलं. गिर्हाइक येऊ लागलं... लोकांच्या अपेक्षा वाढू लागल्या
मग दुकानात अधिक वस्तु ठेवणे सुरु झाले.
दुध, आइस्क्रीम, कोल्ड ड्रींक सार्याच्या एजन्सी घेतल्या.
हे एका बाजूला पण तिथल्या स्थानिक लोकांचं वागणं अजब.
शक्यतो काही काम सांगितलं की चेहेरा वाकडा. केली तर नाखुशीने अगदी छोटीशी नोकरी करायची.
रिकामा वेळ रस्त्यावर उभा राहून, येणार्या जाणार्याकडे पहात घालवायचा.
गावातली कोणतीही छोटी घटना इथे बातमी होते.
गावात कुठेही जा चार टाळकी कोंडाळं करून उभी असतात.
कोणत्याही लहान सहान गोष्टीवर चर्चा चालू असते. अगदी आज कुणी नवा शर्ट घातला किंवा
नवीन साडी नेसली तरी इथे चौकातल्या चर्चेला उत येतो.
सुरुवातीला आमच्या काकूला गावातल्या लोकांच्या या वागण्याचा बराच मनस्ताप झाला.
पुढे सवय झाली. दुसर्याची प्रगती हे इथे पोटदुखीचे कारण बनते.
गावात कुणी नवीन माणूस आला तर सगळा गाव त्याच्याकडे पहात चौका चौकात उभा राहील. आणि नव्या माणसाला निरखत राहील.
अनेक जणांचा दिनक्रमच हा आहे. सकाळी उठायचे रस्त्यावर जाऊन उभे राहायचे.
कंटाळा आला की उभा राहण्याची जागा फक्त बदलायची.
रिकामटेकडे या शब्दाचा अर्थ इथे समजतो.
आमच्या काकांनी इथल्या अनेक मुलांना कामाला लावण्याचा प्रयत्न केला.
धंदा चालू करुन देण्याची, पैसा पुरवण्याची तयारी दाखवली. पण हातपाय हलवणे कमीपणाचे वाटते.
साधी चहाची टपरी टाकणं यात काय अवघड ? ती टाकण्याचा आग्रह काकांनी काही तरुणांना करून पाहीला. पण कुणाचीच तयारी नाही.
शेवटी काकांच्या दुकानासमोर एक भैय्या चहाची गाडी लावतो.
आजकाल इथल्या बागांमधे काम करणारा मजूर बिहारी आहे.
काही नेपाळी लोकही दिसू लागले आहेत.
प्रश्न पडतो
एवढं सगळ असूनही कोकणात राहणारा कोकणी माणूस असा मागे का !
आहे यावर काही उपाय .....
वाचने
7032
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय हे ...., त्यानी डोळस
डायोजनीन ची गोष्ट
प्रश्न आणि उत्तर
जिथे पिकत तिथे विकत नाही
या विषयावर आत्ताच गेल्या दोन
आता म्हणतेच तसे. थांब. गणपाला
In reply to या विषयावर आत्ताच गेल्या दोन by गणपा
हाहाहा.
श्री आशु जोग
सर्वांना
बरोबर
In reply to सर्वांना by चिरोटा
अगदी बरोबर
In reply to बरोबर by कौतिक राव
सर्वांना
(No subject)
आम्ही ब्वॉ
अग्गाग्गा .. कुठे गुंतवताय?
In reply to आम्ही ब्वॉ by कुंदन
अरेच्चा!!!.....परत तेच!!! जो
आता तर सारी पिढी आळशी बनत
जगात सगळी कडे अस्चेच चालत असावे,
In reply to आता तर सारी पिढी आळशी बनत by अविनाशकुलकर्णी
उपाय ना?
परा, >>जग हे विचारवंतांची
कोकणस्थ माणूस मागे का..
वैदर्भिय
मी मागे नाही
अश्लिल शिर्षक!
मला वाटत नाही "कोकणस्थ" माणूस
आत्तातरी कोकणस्थ माणूस माझ्या
In reply to मला वाटत नाही "कोकणस्थ" माणूस by मदनबाण
को-कणस्थ ???
कोकणस्थचा धागा सिंधुसागरातून