Skip to main content

क्रुसावरिल माणिक

लेखक ajay wankhede यांनी मंगळवार, 27/03/2012 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
तू आलास ,थांबलास, आणि मनाला चटका लाऊन गेलास. शब्दांना शब्दांच्याच माळेत गुंफलेस तु लय, ताल, माधुर्य सार्‍यांनाच थंड निखार्‍यावर जाळलेस तु चालावयास पायवाट होति या नागफणिच्या वनात हळुवार कोरलीस आपलीच पायवाट तू पाणी विद्रोहाचे पिऊनि, उतरलास सागरात या झेलणारा मंथने हजारो तु एकटाच देवमासा मज नाहि आज दु:ख क्रुसावरिल 'माणिका' होशिल भाग तु या मैत्रेय जातकाचा. ................................................................................................................... कविवर्य 'ग्रेस' यांना विनम्र अभिवादन
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1715
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

अजयराव , फारच बोलकी नेमकी .परत लिहिण्यात सहजता ! ग्रेस जी यांचं व्यक्तिमत्व व कर्तृत्व याचा पुरता आलेख १८ ओळीत ! कुर्बान. त्याना अढळपद आहेच मित्रा ! पुलेशू