सध्या अनेक वार्तापत्रातुन प्रसीध्द होणा-या बातम्या वाचल्यावर "महाराष्ट्राचा बिहार होतो आहे का?" असा प्रश्ण पडतो आहे. आजची ताजी बातमी वाचा.
(सध्या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल अनेक अहवालांवर चर्चा चालू आहे. महाराष्ट्राचा बिहार झाला आहे याबद्दल अनेकांचे एकमत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताच एक धक्कादायक बातमी वाचण्यात आली.)
धक्कादायक
आंतरजालावरील वर्तमानपत्रातील ताजी बातमी पुढील प्रमाणे.
दिवेआगरःसोन्याच्या गणपतीची चोरी
राज्यातील मंदिरांमध्ये चो-यांचे प्रमाण प्रचंढ वाढले आहे. हिंदू नववर्षाच्या दुस-याच दिवशी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरच्या सोन्याच्या गणपतीची चोरी झाली आहे. चोरट्यांनी आज (शनिवार) मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान मंदिराच्या दोन वॉचमनना मारहाण केली आणि सोन्याचा गणपती तसेच देवाचे दागिने चोरुन पळ काढल्याचे उघड झाले आहे.
सवीस्तर बातमी येथे वाचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12388907.cms
या गणपती विषयी थोडी माहिती देतो. (खरेतर अनेकांना माहीत असेलच.)
सोन्याचा गणपती
श्रीमंत पेशव्यांच्या श्रीवर्धन तालुक्याच्या मध्यभागी दिवेआगर गाव वसलंय. श्रीवर्धनला दोन हजार वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. इ.स. पूर्वीपासूनच उत्तरेच्या दंडा-राजापुरी खाडीत असलेल्या मंदारपट्टण या बंदरातून परदेशांशी व्यापार चालत असे.
ऐतिहासिक तालुक्यातलं दिवेआगर गावही अतिप्राचीन , निसर्गरमणीय... गेल्या दहा वर्षांपासून या गावाला तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त झालंय , ते तिथे सापडलेल्या सोन्याच्या गणपतीमुळे. द्रौपदी धर्मा पाटील या १७ नोव्हेंबर १९९७ ला , नारळी-सुपारीच्या बागेत काम करत असताना जमिनीखाली सुमारे दीड फुटावर त्यांना एक पेटी सापडली. त्यात बावन्नकशी सोन्याची गणपतीची रत्नजडीत मूर्ती पाहून काही क्षण त्या निश्चल , स्तब्ध झाल्या. योगायोगानं , नव्हे दैवयोगानंच त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. हा काय चमत्कार आहे ?, हे त्यांना कळेना. आजही ही मूर्ती पाहिली की अनेकांना हाच प्रश्न पडतो. कुठल्या काळातली असेल ही मूर्ती , कुणी आणि का ती जमिनीखाली ठेवली असेल , याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जातात. त्या अनुषंगाने श्रीवर्धनच्या इतिहासावर संशोधकांनी एक दृष्टिक्षेप टाकला.
(ही माहितीसुद्धाअ म.टा.मधे दि.८ सप्टेंबर २००९ रोजी प्रसीध्द झाली होती. सविस्तर माहिती येथे वाचा.)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3046384.cms
आता ही दूसरी बातमी वाचा.
विधानसभेत मंत्री-आमदारांत शिवीगाळ
लोकशाहीचा प्रमुख स्तंभ असलेल्या विधानसभेत मंगळवारी मंत्री आणि आमदारांमध्ये शिवीगाळ तसेच हमरीतुमरीवर येण्याचा प्रकार घडला. पेशंटांनी दृष्टी गमावल्याच्या मुद्द्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावीत यांना सदस्यांनी धारेवर धरले. शिवसेनेच्या दोघा आमदारांनी शेलक्या शब्दांत त्यांना हिणवल्याने गावीत यांनी दोघा आमदारांना शिवी हासडली. त्यावर हे आमदार मंत्र्यांच्या अंगावर धावून गेले. इतर सदस्यांनी या आमदारांना आवरल्यानंतर मंत्र्यांनीही दिलगिरी व्यक्त केली. मात्र पेक्षक गॅलरीमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना हा सर्व प्रकार पाहून धक्का बसला.
(सवीस्तर बातमी येथे वाचा.)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12349754.cms
महाराष्ट्र हे भारतातील एक पुढारलेले आणि सुशिक्षीत राज्य आहे असे म्हणले जाते. विधानसभेत जर मंत्री आणि लोकप्रतिनीधी असे वर्तन करीत असतील तर आम जनतेत काय संदेश जाणार या प्रकाराचा??
आता ही तिसरी बातमी.
विधान परिषदेत राडा
सत्ताधारी आघाडीचे दोन आमदार निलंबित
गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावरील चर्चेला मंगळवारी विधान परिषदेत विपरीत
वळण लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राम पंडागळे व काँग्रेसचे जैनुद्दीन
झवेरी यांच्यात चकमक उडाली. यावेळी पंडागळे व झवेरी यांनी केलेले वक्तव्य
सभापतींनी कामकाजातून काढून टाकले. मात्र झवेरी यांना २२ मार्चपर्यंत तर
पंडागळे यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत निलंबित
करण्याची घोषणा सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केली.
गिरणी
कामगारांच्या घराबाबत चर्चा सुरू होताच राम पंडागळे उभे राहिले व त्यांनी
या विषयावर आपण आक्रमक भूमिका घेतलेली असल्याने आपल्याला मत मांडण्याची
संधी द्यावी, अशी मागणी केली. ही मागणी उपसभापती वसंत डावखरे यांनी
फेटाळली. त्यानंतर चर्चा संपली तेव्हा पुन्हा पंडागळे उभे राहिले व त्यांनी
बोलण्याची संधी देण्याचा आग्रह धरला. पक्षप्रतोद हेमंत टकले यांनी
केलेल्या विनंतीवरून त्यांना संधी दिली गेली. त्यावर पंडागळे यांनी
काँग्रेसच्या एका दिवंगत महिला नेत्याचा उल्लेख करून केलेल्या टिप्पणीवरून
काँग्रेसचे जैनुद्दीन झवेरी भडकले व त्यांनी पंडागळे यांच्याबाबत असभ्य
शब्दांचा वापर केला. ही बाब विरोधकांनी लक्षात आणून देताच पंडागळे यांनी
'आता आपण अॅट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल केल्याखेरीज गप्प बसणार नाही' असा
इशारा दिला. यामुळे सभागृहाचे कामकाज तीनवेळा ठप्प झाले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12345520.cms
वाचने
5528
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
बिहार नको खेळखंडोबा म्हणा हवं तर -
+ १ बिहारची उपमा दिवसेंदिवस
In reply to बिहार नको खेळखंडोबा म्हणा हवं तर - by कौन्तेय
हेच मराठीत लिहीतो आहे..
In reply to बिहार नको खेळखंडोबा म्हणा हवं तर - by कौन्तेय
च्यायला !!
बाकी ग्रीन कार्ड साठी प्रयत्न
In reply to च्यायला !! by परिकथेतील राजकुमार
दुबई ,परीस यांचेही पुणे ,मुंबई ...
In reply to बाकी ग्रीन कार्ड साठी प्रयत्न by चेतनकुलकर्णी_85
ग्रीन कार्ड साठी प्रयत्न करत असणार्या चिंतामणीकाकांनी
In reply to च्यायला !! by परिकथेतील राजकुमार
चिंता करितो विश्वाची.
पाडव्याच्या श्रीखंडात
हम्म..
हेच म्हणायचं होत.
In reply to हम्म.. by पैसा
पेपरवेट
In reply to हम्म.. by पैसा
वा वा!
In reply to पेपरवेट by नितिन थत्ते
आपण एक पुरातत्व महत्व असलेली
गड्या आपला गाव बरा!
वो मालक....
In reply to गड्या आपला गाव बरा! by यकु
सर, त्या इम्रान मेहंदीला धरुन
In reply to वो मालक.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१.१/५ किलो वजन होते
युती व आघाडी मधील पक्ष आपल्या
हे
>>कुठे म्हंटले जाते?
विचित्र लोक आहेत.
हो नक्कीच होतोय!
बिहार सुधारले आहे हे मान्य. पण
इतिहास जर डोळसपणे वाचला तर ...