वेलेंटाईन डे ( लग्नानंतर चा)
तारुण्य....
नव तारुण्य नव दांम्पत्य
सोबतीला दोन गुबगुबीत अपत्य
कामाच्या धकाधकित वेळ
जातो कसा कळतच नाही
सांय समयी थकुन येता
लगेच चहा नि बिस्किट
खोल्या लहान गर्दी महान
सखे तरि राहतेस प्र शांत
रात्र प्रहरी धुंद प्रणय
जिवाणु विषाणुंचा कहर
सारं काही पचवतेस
सुख हि नि दु:ख
तुझा एंटी वायरस खरंच
भारदस्त.....
अपडेट होतो आपोआपच
सकाळ ची लगबग.....
डबा नास्ता मुलांची घाई
सारं सारं आवरतेस झ्टपट
वारध्क्य.....
आता मी सेवा निवॄत्त
नि तु पण रजोनिवॄत्त
दंतकांति गमावलेले ओठ
रोजच बघतात वाट...
मी हि तोच तुहि तिच
मन अजुनही ताजतवानं
तुझा एंटी वायरस आता
अपडेटच होत नाही..
आज चिंट्या,मिंटि मित्रांसवे
असतील एलिफंटा गेट वे ला
सखे चल आजचा दिवस तरि करु साजरा
जाऊ या भायखळ्या ला
नि त्या थोर वेलेंटाईन संताला
आदरांजली नाही पण कमीत कमी
श्रधांजलि तरि वाहु या...
हम्म..
काय सांगु
@ रघु सावंत प्रत्येकाच्या
पूर्ण वाचली .. पण बरेच पल्ले
पण बरेच पल्ले गाठायचे बाकी
सुब्बु मजेत एकदम
अजय'जी... छान प्रगल्भ
मस्त. यावरुन एक
__/\__
आभार सर्वांचे स्पेषिअलि
सु.न्दर लिहिले आहेस.
१ लाईन लयच आवड्ली !!