Skip to main content

वॅलेंटाईन डे

लेखक रघु सावंत यांनी रविवार, 19/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
वॅलेंटाईन डे खरं म्हणजे तूला सांगायची गरज नाही तुलाही माझ्या प्रमाणे ठाऊकच असणार कारण आजचा दिवसच असा आहे माझ्य मनात तूझ्या आठवणींचा ठसा आहे मला आठवते आपली ती पहिली भेट तेव्हाच माझ्या ह्र्द्याचा ठाव घेतलास थेट या सगळ्या आठवणी आज आठवतात खास कारण आजचा दिवसच असा आहे माझ्या मनात तूझ्या आठवणींचा ठसा आहे तुझी माझ्या करिता उठलेली प्रत्येक नजर माझ्या करिता एक वेगळी अदा आहे म्हणुन तर मी तूझ्यावर फिदा आहे या देहाचा रोम रोम तूझी वाट बघतोय आज कारण आजचा दिवसच असा आहे माझ्या मनात तूझ्या आठवणींचा ठसा आहे तुझं नेहमी स्वप्नात माझ्या येणं येऊन मला मोहून शहारून सोडणं मला तर ते आज पण हवं आहे कारण आजचा दिवसच असा आहे माझ्या मनात तूझ्या आठवणींचा ठसा आहे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1604
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

म्हणुन तर मी तूझ्यावर फिदा आहे या देहाचा रोम रोम तूझी वाट बघतोय आज
हे वाट बघणे जर व्हॅलेंटाईन डेला संपले, तर नक्कीच त्यांना बालदिन १४ नोव्हेंबरला साजरा करायची वेळ येईल ;) बरीये रचना.

In reply to by अन्या दातार

हे वाट बघणे जर व्हॅलेंटाईन डेला संपले, तर नक्कीच त्यांना बालदिन १४ नोव्हेंबरला साजरा करायची वेळ येईल Wink
=)) =)) =)) =)) =)) =)) वाह (क्या..).अ.दा....... एकदम परफेक्ट !!!. ;)