दुनिया तुझ्यामुळे....
दुनियादारी शिकण्या शिकविण्यात, जन्म सारा चालला
दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला
ते न फसवे आता
हास्य ओठी जे दावतो
श्वास होउनी गेल्या आता
रिती ज्या मी पाळतो
न जाणो कधी कसा हा जीव, ऐहिकात रमाया लागला
दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला
सुजनाची धुंदी आता
होय मला पारखी
शब्दही लेखणीत यायला
मागतात पालखी
असा कसा फकीराचा पाय, वस्तीत रुताया लागला
दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला
दुनिया तूच सांगशी
काय करू अन करू नको
जरी सरणावर पडलो
तरी सांगशील मरू नको
अताशा न देताही मला तुझा, आदेश कळाया लागला
दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला,
दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला.....
आशयघन लिहीले आहे;पण वृत्तात
" आशयघन लिहीले आहे;" याच्याशी