नमस्कार ई मासिक
नमस्कार !!! ..बर्याच दिवसानी आवतरतोय आज .. अर्थातच एका नव्या उपक्रमाच्या निमित्ताने ..गेले काही दिवस सगळ ध्यान तिकडेच होते ..तेच आज तुमच्यापुढे सविनय सादर करत आहे .."नमस्कार" ई -मासिक..
नमस्कार मागची माझी भुमिका
तर गेली जवळपास ३-३.५ वर्षे या नेट च्या विश्वात मी वावरत आहे ...पडलो ,धडपडलो ,पुढे गेलो ...सगळी काही झाले .. हे सगळ करताना मित्र परीवारही वाढत गेला . काही खुप छान संधी मिळाल्या. अशाच बर्याच ठिकाणी चर्चा,गप्पांमध्ये मराठीतील नेट विश्वाबाबत चर्चा सुरु असायची..आणि त्यातुन एक मुद्दा पुढे यायचा की . हे इ-जग अधीक छान करण्यासाठी काय काय करता येईल ? अर्थात प्रत्येकाची मते वेगळी असायची ...
पण मला स्वतःला असे वाटते की जी लोक आता नेटवर लिहित नाहीत अशा विविध क्षेत्रातील मान्यवराना नेटवर लिहायला लावले तर बराच फरक पडेल ( अगदी पुस्तकी भाषेत बोलायचे तर गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ होऊ शकेल) आणि त्यातुन अवतरले ते "नमस्कार" ई मासिक ...
नेटवरील वाचकांना विविध क्षेत्रातील मान्यवरांचे दर्जेदार विचार नेटवरच वाचायला मिळावेत हा याच्या मागचा मुळ उद्देश आहे .आणि ,अर्थातच कोणताही व्यावसायिक फायदा मिळवण्याचा उद्देश नाही .
दर महिन्याच्या २६ तारखेला हा अंक प्रकाशित होइल .
अंकातील लेखक -
अतिथी संपादक- मा. ज्ञानेश्वर मुळे ( प्रख्यात लेखक ,भारतीय उच्च्यायुक्त ,मालदिव)
लेखक -
१. अवधुत परळकर (ज्येष्ठ विचारवंत ,पत्रकार) ,
२. लीना मेहेंदळे ( लेखिका ,माजी आय ए एस अधिकारी) ,
३.राजीव तांबे ( प्रख्यात लेखक)
४.धर्मकिर्ती यशवंत सुमंत (युवा नाट्य लेखक) ,
५. संजय आवटे (पत्रकार ,संपादक ,विचारवंत)
६. लक्ष्मीकांत देशमुख ("पाणी पाणी ",इन्किलाब विरुध्ह जिहाद" आदी कादंबर्याचे लेखक ,उत्तम प्रशासक )
७.,विद्यासागर अध्यापक( नाट्य,सिनेमा आणि रेडिओ अशा विविध माध्यमात हातखंडा, "आधी बस ,मग बोलु" या सध्या गाजणार्या नाटकाचे लेखक)
८. श्रीनिवास नार्वेकर ( नाटक ,सिनेमा क्षेत्रात गेले २५ वर्ष कार्यरत )
याशिवाय थिंकबॉक्स आणि कवितेच्य गावा या सदरांमधुन विविध विचारवंत आणि कवी आपल्याला भेटतीलच ...
वाचकाला एक सर्वांगीण मेजवानी देण्याचा प्रयत्न केला आहे ..आपल्याला तो आवडेल अशी आशा वाटते ...
मिपा आणि मिपाकर यांची साथ कायम सोबत होती आणि आहे ..ती तशीच कायम राहील या खात्रीसह हा अंक तुमच्यापुढे रुजु करत आहे :)
हा अंक आपणास इथे वाचता येइल :)
http://www.misalpav.com/sites/default/files/pictures/namaskar-network-Jan-2012.pdf
अंकाबाबत ,लेखांबाबत असणार्या सर्व मत मतांतरांचे स्वागत आहे :)
आपलाच,
विनायक
नोट- १. या अंकाचे प्रकाशन नुकतेच सलील कुलकर्णी ( मराठी संगीतकार) यांच्या हस्ते झाले .
२. पहिल्या अंकाची धावपळ ,समारंभाची प्रीपोन झालेली तारीख यामुळे काही त्रुटी राहिलेल्या असण्याची शक्यता आहे .त्याबद्दल दिलगीर आहे .यापुढील अंक अधीक अधीक दर्जेदार करण्याचा प्रयत्न राहील ..
आपलाच,
विनायक
प्रतिक्रिया
अरे वा विनायका
अंक वरवर चाळला. अत्यंत सुबक
स्तुत्य उपक्रम चालवलाय....
मस्त... मासिक डाऊनलोड केलंय, आता
अभिनंदन रे , मनापासुन
अभिनंदन
पुन्हा एकदा शुभेच्छा...
शुभेच्छा.
शुभेच्छा
उपक्रमास शुभेच्छा
अभिनंदन आणि लक्ष शुभेच्छा !
शुभेच्छा!
स्तुत्य उपक्रम. अर्थातच
संपुर्णतः मान्य
शुद्धलेखनाची काळजी घ्यावी. :)
शुद्ध..
सर एका विनंती आहे.शुद्ध
अंक चाळला. छानच
अभिनंदन!
कायदेशीर कारणासाठी ठेवले
अभिनंदन अन शुभेच्छा. विनू तू
अभिनंदन.
अभिनंदन.
तुमच्या उपक्रमाला हार्दिक
विनायक पाचलग यांचे अभिनंदन !
अतिशय स्तुत्य उपक्रमास खुप
अभिनंदन आणि शुभेच्छा
छान
मस्तच
-
उत्तम उपक्रम.. मलाही या
तुमचे
इ मासिकाला व त्यासाठी
अभिनंदन आणी उपक्रमास खुप शुभेछा!!
शुभेच्छा!
फेब्रुवारीचा अंक कुठाय?
नमस्कारचा दुसरा अंक
अभिनंदन...
प्रयाग राज कुंभ मेळा :भारताचा अक्षय गौरव
आवरा!
देवकण ऊर्फ ढेकूण तर सीओईपी
सीओईपी हाष्टेल
अभियंतेच आपल्या निद्रादेवीची
डी ब्लॉक
आता सीलिंग फ्यान आहेत. बाकी
?
गैरसंबध नसावा..
ओह