थंडी माघाची
थंडी माघाची
थंडी पडलीया माघाची
राया माघाची
घाई करा तुमी येण्याची ||धृ||
लवकर या हो
जवळ घ्या हो
जरातरी फिकीर करा वेळेची ||
नका नका आसं करू नका
जिव माझा फुका जाळू नका
एकटेच का दुर र्हाता तिथं
पेटवा शेकोटी माझ्या ज्वानीची ||
थंडीनं जिव केला येडापिसा
उन उन उबेला जवळी बसा
हातावर हात आन पायावर पाय
पहा चोळून राहिलेय मी केव्हाची ||
कालचा दिस आठवा ना
रुसवा गोडीनं मिटवा ना
आणलय काय दावून जरा
मुठ उघडा हाताची ||
- पाभे
मस्त
येकदम रोम-अँटिक
शाहीर
पाषाण भेदा -वा लई भारी लवकर
एकटेच का दुर र्हाता
ऐन थंडीत कानशिल गरम केलीत
चाचु मुझे पसिने क्यु आ रहे??
व्वा