Skip to main content

(येऊ कसा तुमच्यात मी)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 09/06/2008 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
योगेश वैद्य यांची 'येऊ कसा तुमच्यात मी' ही कैफियत ऐकली आणि एकदम वेगळीच तक्रार डोक्यात रुंजी घालून गेली! ;) घालू कसा शर्टास मी? चालू कसा रस्त्यात मी? तन भारी माझे मला, मावेन का प्यांटीत मी? आरशात मावे न मी जाऊ कुठे, जाऊ कसा? संपेचना हे दोंद, का एवढा बहरात मी? आवळून पट्ट्यास ह्या पोटास ना जावू दिले एवढे जमते मला, आहे तसा निष्णात मी वाटे किती, भेटू तुला, सांगू तुला, का मी असा? पोट येते आधी जरासे आणि त्या पश्चात मी 'काटे' जरी मी मोडले ना थांबले खाणे तरी भेट घ्याया येत होतो अडकलो 'केकात' मी चतुरंग
लेखनविषय:

वाचने 3488
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया