Skip to main content

सर आले दुरुनी

लेखक विदेश यांनी मंगळवार, 03/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
(चालः स्वर आले दुरुनी ) सर आले दुरुनी गेल्या सगळ्या त्या मैतरणी || खुर्चीत उसासे साऱ्यांचे होस्टेलमधील त्या पोरांचे कुजबुजही नव्हती पोरींची धुसफुसही नव्हती कोणाची ऐशा रमलेल्या त्या स्थानी || वर्गात मनोरथ किति रचले गालावर हासू पाघळले काही हृदयातचि ते घुसले बाणांतुनी स्पंदन जाणवले झेली सुंदर मैत्रीण कुणी || प्रतिसाद सरांचा तो न कळे अवसान परी का पूर्ण गळे संधीच न मिळता पोरांचे घबराट पुन्हा सर ते दिसले चहाडी चुगली का केली कुणी || (पूर्व प्रसिद्धी- शब्दगाssरवा २०११)
लेखनविषय:

वाचने 793
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया