Skip to main content

(प्रेमी)युगुलगीत: तुझी माझी प्रित जमली

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 30/12/2011 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी माझी प्रित जमली तो: दे हातात तुझा मला हात सजणे हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // ती: दे हातात तुझा मला हात साजणा हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // ती: लपून छपून प्रेम ते केले कधी कुणा नाही कळले आता वाट नको पाहू वेळ लग्नाची झाली हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // तो: कानी तुझ्या ग डूल डुले पायी पैंजण रुणझूण बोले गाली लाली येण्याची वेळ जुळूनी आली हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // ती: तू या शेताचा रे राजा येथेच आण तू बँडबाजा तुझ्या राणीची वरात मला स्वप्नात दिसली हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // तो: घराची होशील तू ग राणी कसा राहू तुजवाचूणी नको जावू आता दुर तारीख लग्नाची ठरली हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // तो: दे हातात तुझा मला हात सजणे हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // ती: दे हातात तुझा मला हात साजणा हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // - पाभे
लेखनविषय:

वाचने 1124
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

व्वा वा पा.भे. थंडी चांगलीच बोलायला लागलीये हो...! अता लग्नाची तारीख वगैरे ठरवलेली दिसत्ये,त्यामुळे या पुढचं गाणं लग्न झाल्यानंतरच्या पहिल्या काही दिवसातलं,लाजर्‍या/बुजर्‍या नवरा नवरीचं,अतिशय रोमँटिक/गमंतशिर पाहिजे बरं का..!