Skip to main content

बारावी उत्तीर्ण झालेल्यांना कुठला पर्याय योग्य ?

Published on शनीवार, 07/06/2008

याद्या 1177
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

बारावी परिक्षेत सुयश मिळवलेल्या सर्वांचे अभिनंदन

आपल्या आवडीचा पर्याय मिळाला तर कोणताही पर्याय योग्यच :)

In reply to by यशोधरा

आपल्या आवडीचा पर्याय मिळाला तर कोणताही पर्याय योग्यच पूर्णतः सहमत.

वरील सर्वांशी सहमत. आपली आपली आवड वेगळी वेगळी असू शकते. त्यानुसारच हे ठरू शकेल, की कोणत्या दिशेने पुढील शिक्षण घ्यायचे आहे. (पश्चातबुद्धी : कौलाचा विषय थोडा वेगळा असला पाहिजे असे वाटते. बारावी नंतर तुमची आवड काय? - हे चालेल का?)

कौलाचा उद्देश हा की असंख्य क्षेत्रात काम करणारे मिपाकर सध्याच्या परिस्थितीत अनुभवावरुन कुठले क्षेत्र चांगले याचे योग्य मर्गदर्शन करु शकतील. बाकी आपल्या आवडीचा पर्याय मिळाला तर कोणताही पर्याय योग्यच मी ही सहमत.

लाखो विद्यार्थी शेकडो विषय घेऊन उत्तीर्ण होतात. प्रत्येकाची आवड, क्षमता, संधी, गुण, पुढील शिक्षणासाठी उपलब्ध पैसे आणि इतर कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते त्या सर्वांची सरमिसळ होऊन 'योग्य प्रर्याय' ठरतो. तरिही मला विचाराल तर - आपल्याला आवडलेल्या, व्यवहारात मागणी असलेल्या व पुरेसा पैसा मिळू शकेल अशा कोणत्याही प्रकारचा पर्याय घ्यायला हरकत नाही. कष्टाची तयारी हवी. शिकण्याची तयारी हवी. इगो जितका कमी तेवढी प्रगती जास्त हा एक सर्वसामान्य नियम म्हणून वापरावा. योग्य मार्गाने पुढे जाण्याची जिद्द ही सर्वात महत्त्वाची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीची सतत तुलना करु नका. त्याने फारसे काही हाती लागत नाही. चतुरंग

सैन्य दलात अधिकारी पदांसाठी उमेदवारांची कमतरता जाणवतेय. एन डी ए सारखे पर्याय उपलब्ध आहेत , शिवाय पदवी नंतर एस एस बी सारखे पर्याय ही आहेत.

प्रत्येकाची परिस्थिती वेगळी ....सध्याच्या काळात पहाल तर आयटी आणि ऑटोमोबाईल मधे जॉब कमी होत चाल्लेत्.मेडिकल, पॅरामेडिकल, फार्मसी, ह्याकडे वळण्यात बराच जास्त स्कोप आहे.... हे झालं माझं वैयक्तिक मत... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt