काही गमतीदार किस्से .......
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
काही गमतीदार किस्से .......
आपल्या आयुष्यात अशा काही गमतीदार ,मजेशीर घटना घडतात कि त्या बरयाच काळापर्यंत आठवणीच्या कोपरयात घर करून बसतात .कधी काळी आपण निवांत क्षणी त्या गोष्टी स्मरतो अन अलगद ,नकळत आपले आपल्यालाच हसू येत , भलेही लोकाना वाटेल ह्याच्या /हिच्या डोक्याला शॉट लागला आहे का ? एकटाच / एकटीच का हसत आहे ? तरीही ................
मी शाळेत असतानाचा किस्सा आहे , मी ७-८ वीत असेन !
तेव्हा आमचा डावा हात प्लास्टरात होता कोपर्यापर्यंत ,त्यामुळे आमची सायकल धूळ खात पडणार होती निदान २ महिने तरी !
त्यामुळे आम्हाला शाळेत सोडवण्याची/आणण्याची जबाबदारी बाबांची होती , आमच्या शाळेची वेळही अशी अड- नीड(८ ते २) होती कि त्यावेळेला चुकूनही बस सापडायची नाही ,बाबाना सेकंड शिफ्ट घेण्याशिवाय पर्याय नव्हता , आमचा दिनक्रम व्यवस्थित चालू झालेला , एका हाताला जडबदक प्लास्टर अन अन दुसर्या खांद्याला दप्तर ,पुरती वाट लागून जायची , नुसते हाल जीवाचे !
एकदा आमच्या शाळेत बाहेरचे एक सर आले होते , भरतकाम हा एक नवीन आयटम शिकवण्यासाठी एक तास एक्स्ट्रा घेणार होते ते !
बाबा मला घ्यायला आले , पण आमच्या एक्स्ट्रा तासामुळे त्यांना ड्युटीला उशीर झाला असता ,काय कराव दोघांना सुचत नव्हत. आमची ही चर्चा शेजारी उभे असलेले शेख अंकल ऐकत होते ,ते हि त्यांच्या मुलाला घ्यायला आले होते
तसे ते आमच्या परिचयाचेच होते ,अन घरही फारसे लांब नव्हते एकाच रुटवर होते .
तेच म्हणाले " आप जाओ पियू के पप्पा, मे छोडता इसको ,आप जाओ बिनधास्त ड्युटीको ! "
बस्स .........प्रश्न मिटला पप्पानी प्रस्थान केले .
सरांनी त्यांच्या भरतकामाचे विविध सुंदर नमुने आणलेले होते दाखवायला अन ते करण्यासाठी एक प्रकारची वेगळीच मोठी सुई होती . त्यांनी प्रात्यक्षिकही करून दाखवले त्या सुईने ते इतके भराभर अन सुंदर विणकाम करत होते की बस्स ....ती सुई अन धागे त्यांनी विक्रीकरिता ठेवलेले होते
सुईची किंमत फक्त २ रुपये ,आम्ही फार इम्प्रेस झालो होतो या नवीन प्रकारामुळे !
आम्ही लगेच चिल्लर जमा करून घेऊन टाकली एकदाची सुई ,
सुई पण एकदम अजब पिळे -पिळे असलेली उलट्या नाकाची ,असो ........
झाल... शाळा सुटली .सगळी मेंढर धावली , आम्ही शेख अंकलच्या स्कूटर जवळ येऊन थांबलो
बराच वेळ थांबलो तरी अंकलचा पत्ता नाही ,स्कूटर एकवार निरखून पाहिली नक्की अंकलचीच आहे का म्हणून !
सगळी शाळा सामसूम पडली , शेवटी एकदाचे शेख अंकल दिसले ,त्यांचे दिवटे सुपुत्र
(मोबीन )पळता पळता पडले होते ,गुडघे फोडून घेतले होते त्यावर पट्टी करायला शाळेच्या होस्टेलमध्ये गेले होते ते दोघ !
मोबीन : उम्म्म " पप्पा मे आज आगे बैठून्गा " पिछे दीदी को बैठने दो !
शेख अंकलने स्कूटरला चार पाच किक मारल्या ,मग स्कूटर आडवी केली ,चालू झाली एकदाची टर्र - टूररर्र
करत .
मोबीन पुढे बसला ,आम्ही आमच मणभर ओझ असलेले दफ्तर घेऊन मागे बसलो.
स्कूटर धावू लागली ,अचानक एक गोष्ट लक्षात आली भरतकामाची सुई आपल्या हातातच आहे अजून , बर स्कूटर चालू झाल्यामुळे आता बॅगेत ठेवता येणे हि शक्य नव्हते ,त्यात आमच्या शाळेचा माणिकमोत्यांनी भरलेला रस्ता !
हायवेला लागलो , तसे आमचे केस आमच्याच डोळ्यात जाऊ लागले फडफड फड फड सपके नुसते !
दफ्तर सांभाळू ,केस सांभाळू ,कि मोडलेला हात, कि हातातली सुई ?
या गहन विचारात असतानाच तो आला ............
स्पीड ब्रेकर हो .....
तसे शेख अंकलने बुम्बाट चाललेल्या स्कूटरचे ब्रेक मारले पण काही उपयोय झाला नाही आम्ही मागे अर्धाफुट उंच सहज उडालो असू .
तोंडातून आवाज आला माझ्या आईग ग्ग !
अजून एक आवाज आला माझी साथीला
औच..... ! हुस्स्स ....हुस्स ... हुस्स ..........................
शेख अंकलने स्कूटर स्लो केली , साईडला घेतली , मला उतरायला सांगितले
" तेरे हात मे क्या है विचारायची गरजच नव्हती ,अस्त्र आमच्या हातातच होते .
त्यांनी घाई घाई कावलेल्या जीवाने ते अस्त्र आमच्या हातातून घेऊन त्यांच्या
शर्टाच्या खिशात टाकले .
आमच्या डोक्यात प्रकाश पडला ,स्पीड ब्रेकरमुळे आदळलेल्या अंकलला फुकटचे इंजेक्शन घ्यावं लागल होत
माझ हसू दाबण्याचा मी घर येईपर्यंत पुरेपूर प्रयत्न केला
शेख अंकलने गेटसमोर स्कूटर उभी केली
मी : अंकल चलो न घरमे .पाणी -वाणी ,शरबत ?
त्यांचा तो त्रासिक ,कावलेला चेहरा आईई ग्ग !
अंकल : " नै रेहनो दो फीर कभी ,म्हणत स्कूटरला किक मारली
घरी आले दफ्तर फेकले ,नुसती असबंध हसत होते
आमचे दात काढण काही थांबत नाही हे पाहून आज्जी चक्रावली
" ए बावळे आता हसत राहशील की सांगशील काय झालाय ते.? इतक फिदफिदी का
चालुये मघापासून ?घडलेला प्रकार आईला अन आज्जीला सांगितला ,दोघीही खूप हसल्या ,अन रागावल्या पण
असा निष्काळजीपणा बरा नव्हे म्हणून ;)
***************************************
दुसरा किस्सा...
बाबाना बाहेरगावी जायचं होत
मला सुट्टी म्हणून कोमट तेलाने केसाना मालिश करून निवांत डुंबायाचा प्ल्यान होता माझा !
बाबांचा सकाळपासून आरडाओरडा चालू होता
हे कुठाय ? ते कुठाय ? वस्तू जागच्या जागी का नसतात ?कधीही ,वेळेला सापडतील तर शपथ !
हे त्यांचे नेहमीचे डायलॉग ;)
चार घास तरी बाबांच्या पोटात जावेत म्हणून आईची गडबड चाललेली
म्हणून भराभर पोळ्या लाटत होती
बाबांची घाई चाललेली , निदान चहा तरी द्या ,नाश्त्याचे राहू द्या
आई ऐकेल तर शपथ !
दोन तीन पोळ्या भराभर लाटून घेतल्या पण भाजी शिजायला अवकाश होता म्हणून लसणाची तिखट चटणी वाढली
एक घास खाल्यानंतर बाबा पुन्हा ओरडले “अरे यात तेल घालून मिळेल का मला ? “
नुसती चिडचिड , नुसता आरडा-ओरडा !
आईपण वैतागलेली ,
घाईघाईत आली तेलाची वाटी पालथी केली चटणीत !
( ह .....आता गीळा या अविर्भावात )
बाबांनी एक घास खाल्ला तोंड वेडेवाकडे केले .वाटीचा वास घेऊन बघितला
मी समोरच उभी होते मला काही कळेना काय झाल आता आणखीन ?
बाबांचा पुन्हा गडगडणारा आवाज
" ए हिकडे ये ग जरा ,काय झोपेत काम करतेस का ग ? कोणत तेल हे म्हणे ? "
आईने वाटीकडे बघितले वास घेतला ,अन जीभ चावली
आता कळाले . ........दोन फटके खाण्याचा योग चुकवत आम्ही पोबारा केला तेव्हढ्यात ;)
आईने घाईघाईत चटणीत गोड तेलाएवजी आमचे केसांचे
सुंगंधी तेल घातले होते ;)
( आपले ही काही असेच गमतीदार किस्से असतील तर शेअर करा हो ) :)
प्रतिक्रिया
मस्त किस्से :)
लेखन वाचले. काही शंका आहेत.
मी ७-८ वीत असेन ! तेव्हा आमचा
=))
मस्त गं पियुषा. दोन्ही किस्से
हम्म्म
आम्ही स्वतःच या वयात
स्वताचे पण सांगायचे का ? बर बर !
हे
ब्रदर
सुड
नशीब बचावलात. दोन बियर पोटात
बाकी देशी दारुच्या दुकानात
यु वेलकम ! (जणु काही तुला
मला मी एकदा देशी दारुच्या
हा ही एक गमतीदार किस्सा आहे
सिद्धार्थ देवरुखकर कोण???
काय पियुबाई, किती हा
मजा
बुम्बाट ???
सोकाजी, त्यांनी राईट टू कॉपी,
किस्से आवडले...
पु ल
computer च्या keyboard वर C
मीसुद्धा
सदर मिस्टेक ही बहुदा सेक्टर
हा..हा..
दोनशे रुपयाची विदेशी दारू
हा हा.
भारीच किस्से सर्वांचे .. हसुन
अजून एक...
एकदम लेटेष्ट...
पियुशा, तुमच्या शेख अंकलच्या
सॉलिड धम्माल!
एकदा मी बेसनपीठ आणी मक्याचे
हा आमच्या मित्रामुळे (आमचा
सगळ्यांत जबरदस्त किस्सा.....