सख्या मला सवे तुझ्या
सख्या मला सवे तुझ्या कवेत रे फिरायचे
नभात शुक्रचांदणे अजून ही दिसायचे
कशास लाज लाजसी घडी घडीस साजणा
मनात काय माझिया, कळेल का प्रिया तुला
मिठीतले शहार हे धुक्यात रे जपायचे
अजून "श्यामसावळ्या" कुशीत गुंतलास ना
बटेत सोनकेवडा अजून माळलास ना
नको व्रुथा करु उशीर मावळेल चांद रे
तुझ्याच आज अंगणी हरीप्रिया खुणावते
भरून टाक भांग ही हळूच कुंकवात रे
उठेल आसमंत हा जपून कोर श्वास रे
बेहेरे मकरंद
०१२०२१२०
सुरेख
मस्त जमली आहे कविता !!!
सुंदर कविता... 'जपुन कोर
व्वाहव्वा..! मस्त हाय.