आपण
आपण
एकमेकांचा निरोप घेताना लपवले ते भाव आपण
दूर जाताना पुन्हा एकदा जवळ आलो तेच आपण
दाटले मनी जरी गालांवर ना ओघळले
आसवांमध्ये भिजून झालो चिंब ते आपण
आठवणीना दूर लोटुनी पाहतोय भविष्याची स्वप्न
तरीही भूतकाळामध्ये रेगांळूनी अडकलो ते आपण
उष्ण श्वासांनी भरलेले कुठे गेले सारे ते क्षण
गुंतलेल्या श्वासांमधुनी वेगळे झालो ते आपण
वेगळ्या वाटांनी जरी आज चालतोय हे जीवन
हरवलं ते नात शोधतोय तेच ते आपण
यशवंत
लेखनविषय:
याद्या
1515
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
छान...
छान
उष्ण श्वासांनी भरलेले कुठे
आजकाल मि पा वर काय छान छान
धन्यवाद!!!!