..उरला पलाश आता
सगळीच राख येथे.. दिसतो विनाश आता..
नुसते वळून बघता तुटतात पाश आता..
पाहून कुंपणा त्या.. जाणीव तीव्र होते;
घर तेवढे निमाले..उरला पलाश आता..
राखेत जन्मणार्या पक्ष्यापरी स्थिती..की..
सर्वस्व जाळुनी मज दिसते अकाश आता?
अंधार तेवतांना ठिणगी महाग होती..
डोळ्यांस त्रास होतो दिसता प्रकाश आता...
आसुसल्या मनाला.. कूस तेवढी मिळेना..
आसेतलेच आर्त.. होते निराश आता..
(विषण्ण) राघव
व्वाह!!
चांगली
रचनाच मुळात विषण्ण मनोवस्थेत
सुरेख
कविता वाचून खूप्,खिन्न ,निराश
राखेत जन्मणार्या पक्ष्यापरी
मस्तच रे! चांगली जमली आहे
छान.