आत्ता म.टा. वर विश्वकोश जालावर सादर झाल्याची बातमी वाचत होतो. तिथूनच मराठी विश्वकोषाची साईट उघडली. पण मध्येच म.टा. वरची बातमी कुठे गेली कुछ पता नहीं. त्यामुळे विश्वकोषाच्या साईटवरुन अध्यक्षांचे मनोगत चोप्य-पस्ते केले आहेत.
मराठी विश्वकोष आता जालावरही उपलब्ध झाला आहे. सध्या एक खंड उपलब्ध दिसतो; लवकरच इतरही उपलब्ध होतील अशी सूचनाही आहे.
मराठी विश्वकोष जालावर उपलब्ध झाल्याने मराठीतील संदर्भ शोधण्याचे काम फारच सुलभ होईल. लवकरच पूर्ण खंड जालावर पडोत ही अपेक्षा.
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
घराघरात विश्वकोश'
(एक ऐतिहासिक दस्तऐवज)
प्रिय वाचकहो ! , 'विश्वकोश' हे मराठीतील ज्ञानाचे भांडार. मराठी एन्सायक्लोपीडिया अ ते ज्ञ, पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संच. पण ग्रंथ जाडजूड असतात म्हणून आपण (महाराष्ट्र शासानाच्या वतीने मराठी विश्वकोश) त्यांचा ६ सीडींचा ४५० ग्रॅम वजनाचा सीडी संच तयार केला. ज्यात अ ते शे (अंक ते शेक्सपिअर विल्यम) अशा १ ते १७ खंडांची (२००७ पर्यंत प्रकाशित झालेले) २०,१८२ पाने समाविष्ट केली. जी संगणकावर कधीही बघता येतात. ह्यासाठी संगणक तज्ञ माधव शिरवळकरांनी बहुमोल मदत केली आहे. घराघरात विश्वकोश हे त्यापुढचे क्रांतिकारी पाऊल आहे. महाजालकावर (वेबसाईटवर) विश्वकोशाचे सर्व ग्रंथ जसे आहेत त्या स्वरुपात महाराष्ट्र शासन जनतेला मोफत उपलब्ध करुन देत आहे. तेही युनिकोडमध्ये, सीडॅकच्या सहकार्याने. विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जो १ ते १६ खंडांचा ज्ञानाचा खजिना तयार केला तो आता ऐतिहासिक दस्तऐवज आहे. तरी त्याचे महत्त्व कालातीत आहे आणि म्हणूनच इतिहासाच्या या सोनेरी खुणा आपण जतन करीत आहोत. भविष्यात पर्याप्त स्वरुपातील (अपडेटेड) विश्वकोशही याच माध्यमातून जगास स्वतंत्रपणे व मोफत अर्पिला जाईल. आज घराघरात इंटरनेट पोहोचले आहे. घराघरात संगणक आहेत. आपण त्यावर ज्ञानाचा खजिनाच उमलत्या पिढीस उपलब्ध करुन देत आहोत. त्यापैकी आजमितिस पहिला खंड युनिकोडमध्ये जसा आहे त्याच स्वरुपात तयार आहे. चित्रांसकट. जो शब्द हवा त्यावर क्लिक करा. सर्व माहिती उपलब्ध! तंत्रज्ञानाचा कुशल वापर, मराठीचा प्रभावी प्रसार हे विश्वकोशाचे ब्रीद आहे. यानंतर प्रतिमास १ खंड असे १५ महिन्यात डिसेंबर, २०१२ पर्यंत संपूर्ण १ ते १८ खंड युनिकोड माध्यमातून सीडॅकच्या सहकार्याने विश्वकोश महाराष्ट्र शासनाच्या वतीने जगास अर्पण करेल. अर्थात् त्याने ग्रंथांचे महत्त्व कमी होत नाहीच. पण केव्हाही, कुठेही हा ज्ञानमित्र उपलब्ध होतोय हीच आनंदाची बाब. माननीय डॉ. जयंत नारळीकर, विजया वाड, स्नेहलता देशमुख, अरुंधती खंडकर, रा.ग.जाधव, भालचंद्र नेमाडे यांनी या प्रकल्पास व्हिडिओ शुभेच्या दिल्या आहेत. हा ऐतिहासिक दस्तावेज मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच जगास मोफत अर्पण होत आहे. 'घराघरात विश्वकोश' ह्या आमच्या प्रकल्पाच्या संकेतस्थळाचा पत्ता www.marathivishwakosh.in किंवा www.marathivishvakosh.in असा आहे. आपली, डॉ. विजया वाड, अध्यक्ष विश्वकोश निर्मिती मंडळ http://www.marathivishwakosh.in/ वरून साभार
याद्या
4195
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम प्रकल्प!
एकदम स्तुत्य उपक्रम. इतर
+ १
In reply to एकदम स्तुत्य उपक्रम. इतर by सुहास झेले
बातमी पोचवल्याबद्दल धन्यवाद!
चांगली बातमी.
कुठे मिळतील ?
In reply to चांगली बातमी. by प्रास
पत्ता -
In reply to कुठे मिळतील ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रास.. आम्ही महाराष्ट्र
In reply to पत्ता - by प्रास
यकुशेठ,
In reply to प्रास.. आम्ही महाराष्ट्र by यकु
उपयुक्त माहिती इथे दिल्या
धन्यवाद!