दसरा!
रावणाशी झालेलं युद्ध संपलं. आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी हे नाव पडलं. रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर तिचा शोध, त्यासाठी सुग्रीवाशी मैत्री, त्यातून हनुमानाची भक्ती, लंकादहन, सेतूबांधणी व त्यानंतर नऊ दिवसांचं घनघोर युद्ध. अशा लांबलचक चाललेल्या प्रवासाची समाप्ती झाली. एक पर्व संपलं. आणि नवीन रामराज्य सुरू झालं.
पांडवांचा अज्ञातवास संपला. अर्जुनाने बृहन्नडेची घुंगरं पायातून काढली आणि हातात गांडिव धारण केलं. भीमाने बल्लवाचार्याचा झारा ठेवला आणि परत गदा धरली. शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली शस्त्रं अज्ञातवासातून पुन्हा बाहेर आली, त्यांच्या टणत्कारासह, खणत्कारासह. आणि एका नवीन लढ्याची तयारी सुरू झाली.
रामासाठी युद्ध संपलं, तर पांडवांसाठी सुरू झालं. रामायणात विजयादशमी वादळानंतरची शांतता म्हणून येते. नवीन युगाची नांदी घेऊन येते. महाभारतात ती वादळापूर्वीची शांतता नोंदते. नवीन काहीतरी घडवण्यासाठीच्या अटळ लढ्याची ग्वाही घेऊन येते. इतरही काही समांतर स्थळं आहेत. रामाला त्याची पळवलेली सीता परत मिळाली. पांडवांना नाईलाजाने लपवून ठेवावं लागणारं त्यांचं स्वत्व परत मिळालं. अयोध्येच्या राज्याला राम परत मिळाला, तोही पांडवांच्या स्वत्वासारखा अयोध्येपासून नाईलाजाने दूर गेला होता.
म्हणून दसरा हा नवीन सुरूवातीचा दिवस. आपल्या आयुष्यावर पडलेल्या, स्वतःच घालून घेतलेल्या सीमा ओलांडायचा दिवस. नवीन राज्य घडवण्याचा दिवस. त्यासाठी लढण्याची शस्त्र हाती घेण्याचा दिवस.
अशी नवीन सुरूवात करणं हे सोपं नसतं. आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या मर्यादेत वावरणं सुखाचं असतं. कंफर्ट झोन असतो एक. त्या आखीव चौकटीतून बाहेर पडणं कष्टाचं असेलच असं नाही. पण बऱ्याच वेळा ती कल्पनाच अधिक भीतीदायक असते. मर्ढेकरांच्या भाषेत, नदीवर चांदण्यात डुंबण्यापेक्षा घरातच पाऱ्याच्या पारव्या प्रकाशात तोतऱ्या नळाची धार डोक्यावर घेणं सोपं वाटतं.
कधी कधी नवीन सुरूवात म्हणजे केवळ कात टाकणं असतं. कधी ते अनोळखी प्रदेशात जाणं असतं. तर कधी ओळखीचा प्रदेश सोडून देणं असतं. कधी नवीन राज्याची घडी बसवणं असतं तर कधी हरवलेलं, जुनं राज्य ताब्यात घेण्यासाठी शस्त्र हातात घेणं असतं. कधी नवीन अक्षरं गिरवणं असतं, तर कधी पूर्वीची पुसून टाकणं असतं. कधी आहे त्याचा विस्तार करणं असतं तर कधी शून्यापासून सुरूवात करावी लागते.
इंग्लिश म्हण आहे, काही जण थोर म्हणूनच जन्मतात, काही थोरवी प्राप्त करतात तर काहींवर थोरपणा लादला जातो. तसंच सीमोल्लंघनाची गरजेच्या बाबतीतही म्हणता येतं. काही लोक जन्मजात भटके असतात, काही भटकेपणा शिकतात, तर काहींवर ही भटकण्याची गरज लादली जाते. जे काही कारण असेल, त्या कारणासाठी या दसऱ्यानिमित्त सर्वांनाच आपल्या कंफर्ट झोनच्या बाहेर पडण्यासाठी, कुठच्या ना कुठच्या प्रकारे सीमोल्लंघन करण्यासाठी शुभेच्छा.
विशेषतः प्रियालीला.
वाचने
11544
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
घासकडवी
सुंदर स्फुट. ओघवतं झालं आहे
प्रतिसाद
दोन पैसे
+१
In reply to दोन पैसे by क्रेमर
आशावाद आवडला.
आवडलं विशेषतः आरामक्षेत्रातुन
मस्त
छान लिहीलंय.... आखीव चौकटीतून
छान शुभेच्छा
आवडले
विचार प्रकटन खरोखरीच चिंतनीय
गरज
In reply to विचार प्रकटन खरोखरीच चिंतनीय by मनीषा
बर्याच लोकांचा असा सुध्दा
मस्त प्रकटन, राजेश. कंफर्ट
नक्कीच...
In reply to मस्त प्रकटन, राजेश. कंफर्ट by विश्वनाथ मेहेंदळे
धन्यवाद काका. सल्ला लक्षात
In reply to नक्कीच... by प्रभाकर पेठकर
मस्त प्रकटन
In reply to मस्त प्रकटन, राजेश. कंफर्ट by विश्वनाथ मेहेंदळे
छान लेख. आवडला.
फारच उत्क्रुष्ठ .... आपला
बर्याच लोकांचा असा सुध्दा
उत्तम मुद्दा
In reply to बर्याच लोकांचा असा सुध्दा by अविनाशकुलकर्णी
मराठी माणूस यांची शंका आणि
In reply to उत्तम मुद्दा by राजेश घासकडवी
स्वप्नांचा पाठलाग
In reply to उत्तम मुद्दा by राजेश घासकडवी
कम्फर्ट झोन - सुरक्षित वलय
लेखाची कल्पना आवडली.
सीमोल्लंघनाच्या शुभेच्छा
लेख आवडला!!
हा जुना लेख
In reply to लेख आवडला!! by दिपक
लेख आवडला
छान प्रकटन
सीमा म्हणजे मर्यादा हा अर्थ