✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कप आणी बशी

अ — अविनाशकुलकर्णी, Wed, 09/28/2011 - 16:34
कप आणी बशी ही जगत विख्यात जोडी आहे..एका लेखकाने संसाराला कप बशीच्या स्टॅंडची उपमा देत पुरुष म्हणजे कप लटकत असतात तर बश्या आरामात वर पहुडलेल्या असतात..असे वाचाल्याचे स्मरते.. आमच्या लहान पणी समाजात बशीने चहा पिण्याच्या प्रघात होता ..पण फुर्र आवाज करायचा नाहि असा दंडक होता कारण तसे करणे मागासलेपणाचे समजायचे.. पढे जसा काळ सरकत गेला तसे लोक घरात बशीने पण बाहेर मात्र कपाने चा पिवु लागले..चार चौघात बशिने चहा पिणे असभ्य/कमी पणाचे वाटु लागले.. आज तर जवळ जवळ बशीचा चहा पिण्या साठी वापर ना घरात वा बाहेर कुणी करताना दिसतो... एका मित्राने पुर्वि एक टिप दिली होति..हॉटेल मधे चहा पिताना नेहमी डाव्या हातात कपाचा कान पकडुन चहा प्यावा..कारण जवळ जवळ ९९ % लोक उजव्या हाताचा वापर करीत असल्याने त्या कपाचा भाग दुषित असण्याची शक्यता जादा असते..पण डाव्या हातने कपाचा कान पकडुन चहा प्यायला तर ति बाजु कमी लोकांनी वापरल्याने जंतु प्राद्रुर्भाव शक्यता त्या मनाने कमी असते.. ग्लासात हि ब~याच ठिकाणी चहा दिला जातो..विषेश्ता कष्टकरी व कामगार वर्गाला व बाहेरुन बारक्याने आणलेला चहा ग्लासातुनच दिला जातो... मी बशीने चहा न पिण्याचे एक कारण हि घडले..साधारण ६९-७० साल असेल पोटात गडबड झाली म्हणुन वैद्या कडे गेलो होतो..त्या काळी पुण्यात कै.लावगण कर व सरदेशमुख असे दोन निष्णात नावाजलेले वैद्यराज होते..नाडी परिक्षेने निदान करुन ते औषधे देत असत..नाडि परिक्षा इतकि अचुक असे कि रात्री तुम्ही काय खाल्ले हे पण ते सांगु शकत अशी वदंता होती... वैद्यराजांनी नाडी परिक्षा केली व पुड्या दिल्या..खरे तर पोटात गुबारा धरणे माझ्या बाबत वारंवार घडत होते..असे त्यांना सांगीतल्यावर बशीने चहा पिवु नका कारण घोटा बरोबर बरीच हवा पोटात जाण्याची शक्यता असते व त्या मुळे हि गुबारा धरु शकतो...तेंव्हा पासुन मी बशीने चहा पिणे सोडले व त्याचा गुण हि आला... कॉफी मात्र बशीने कुणी पित नाहि असे आढळते.. मग चा पण वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.. चहा हा सा~यांना लागतोच..म्हणच आहे.. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो...

प्रतिक्रिया द्या
4784 वाचन

💬 प्रतिसाद (11)

लेख वाचून आठवले :

अमोल केळकर
Wed, 09/28/2011 - 16:41 नवीन
लेख वाचून आठवले : - ---------------------------------------------------------------------------- बशी म्हणाली कपाला, चल आपण लग्न करू कप म्हणाला ठिक आहे पण तू जेंव्हा इतरांच्या ओठावर असशील तेंव्हा मी काय करु ?? :) -------------------------------------------------------------------------- अमोल केळकर
  • Log in or register to post comments

कविता...

प्रभाकर पेठकर
Wed, 09/28/2011 - 16:51 नवीन
हया (व अशा अनेक) कवितांची सुरुवात, 'एके दिवशी काय झाले SSSSSSSSSS....' अशी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

एका लेखकाने संसाराला कप

गणेशा
Wed, 09/28/2011 - 16:45 नवीन
एका लेखकाने संसाराला कप बशीच्या स्टॅंडची उपमा देत पुरुष म्हणजे कप लटकत असतात तर बश्या आरामात वर पहुडलेल्या असतात..
सहज आठवले : बशी म्हणे कपाला आपण दोघे लग्न करु ! कप म्हने बशीला आपण लग्न करु , पण जेंव्हा कोणॅए माझा कान धरुन तुला तोंड लवेल तेंव्हा मी काय करु?
  • Log in or register to post comments

@ अमोल , तुझी प्रतिक्रिया

गणेशा
Wed, 09/28/2011 - 16:47 नवीन
@ अमोल , तुझी प्रतिक्रिया वाचण्याअगोदरच प्रतिक्रिया दिली होती. दोघांना पण एकच गोश्ट आठवली
  • Log in or register to post comments

(No subject)

अमोल केळकर
Wed, 09/28/2011 - 17:02 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

एका रुखवतावर ठेवलेले हे

मृत्युन्जय
Wed, 09/28/2011 - 17:08 नवीन
एका रुखवतावर ठेवलेले हे मुक्तक आठवले एकदमः Image removed.
  • Log in or register to post comments

मजेशीर आहे

शुचि
Wed, 09/28/2011 - 19:09 नवीन
मजेशीर आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हे कपबशी तत्वज्ञान भारी आहे

मोहनराव
Wed, 09/28/2011 - 19:45 नवीन
हे कपबशी तत्वज्ञान भारी आहे बुवा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ह्यावरून आणखी एक पीजे

मराठे
Wed, 09/28/2011 - 19:15 नवीन
ह्यावरून आणखी एक पीजे आठवला: एक बशी कॉफीच्या मगाला म्हणते: काय मग ? काहीवेळाने कप बशीला विचारतो: मगाशी काय बोलत होतीस?
  • Log in or register to post comments

चहा हा आपला वीकपाईंट आहे!!!

मोहनराव
Wed, 09/28/2011 - 20:16 नवीन
चहा हा आपला वीकपाईंट आहे!!! <<चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो...>> +१०० सहमत... आणी सकाळी पेपर वाचताना हातात चहाचा कप हवाच!!! माझ्यामते चहाची सर कॉफीला येणारच नाही. चहा सुर्र.. करुन पिण्यात वेगळीच मजा आहे....कोणी काहि म्हणेल याची चिंता कशाला करायची राव? बाकी धागा आवडला!!!
  • Log in or register to post comments

घोटा बरोबर बरीच हवा पोटात जाण्याची शक्यता असते

रामदास
Wed, 09/28/2011 - 21:04 नवीन
हो ना ! ! आणि आता या वयात बर्पींग तरी कोण करणार.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा