निशाणी
छेडूनी धुंद ओली , हळवी तुझी विराणी ,
मी मागतो पुन्हा का, फिरुनी नवी निशाणी.
पावूस चांदन्यांचा भिजवून काल गेला,
ग्रीष्मात मोगरयाने फसवून वार केला,
हे जाणुनी पुन्हा का, मनमोर गात गाणी,
होतो अतृप्त जरी मी अव्यक्त खंत होती ,
निशब्द वेदना ही मुरली निवांत होती ,
का छेडली पुन्हा तू, ती रागिणी दिवाणी ,
अव्यक्त भावनांचे मी गूढ गीत गातो,
स्वरमेळ ना तयाला तो तुझ्यातुनी वाहतो,
ओठांत गुंफुनी माझ्या दे आता नवी कहाणी..
छान...
हळूवार काव्य
छान भावगीत.
हे जास्त चांगल वाटतय खरं..