Skip to main content

लडाख

लडाख

Published on 13/08/2011 - 20:18 प्रकाशित मुखपृष्ठ
गेल्या वर्षी आम्ही लडाखला गेलो होतो. परत आलो आणि दोनच दिवसांनी तिथे ढगफुटी झाली. थोडक्यात वाचलो. तेंव्हा घेतलेले हे फोटो. १. कारगिलकडून येणारा रस्ता. २. चमकणारा पर्वत. ३. सिंधु घाट. ४. शांतीस्तूप वरुन. ५. तिथूनच. ६. पँगाँग लेक. ७. सँड ड्युनस, हुंडर. ८. हुंडरचे वाळवंट. ९. कवटी डोंगर. १०परतीच्या प्रवासात. समीक्षा व्हावी ही विनंति.
लेखनविषय:

याद्या 9974
प्रतिक्रिया 36
तुम्ही काढलेले फोटो अति उत्तम. हवांतर: तुमचा नाव आणि कार्लेले फोटू म्यात्च न्हाय होवू ऱ्हायाले. म्हणजे नाव मानुस्घाने आणि फोटू माणूस आवडे

In reply to by इरसाल

हवांतर: तुमचा नाव आणि कार्लेले फोटू म्यात्च न्हाय होवू ऱ्हायाले. म्हणजे नाव मानुस्घाने आणि फोटू माणूस आवडे -दिलीप बिरुटे

मस्त शॉट!!! अप्रतिम लँड स्केप फोटोग्राफि.

कवटी डोंगर आवडला. बाकी, फोटोही झकास. -दिलीप बिरुटे

खुप छान आहेत फोटो. थोडीशी माहीती लिहायची होती असं वाटुन गेलं.

लडाखची सुंदर चित्रमय सफर फोटो सुरेख आलेत

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. माहिती लिहिली नाही कारण ती आजकाल सहज उपलब्ध असते. बर्फाचे फोटो दिले नाहीत कारण ते अनेक ठिकाणी बघायला मिळतात. हवांतरः नांव माणूसघाणे असले तरी आहे माणूसच. मिपावरील कुठल्याच सदस्याच्या बाबतीत मी माणूसघाणा नाही हे या निमित्ताने स्पष्ट करतो.

In reply to by तिमा

हवांतरः नांव माणूसघाणे असले तरी आहे माणूसच. मिपावरील कुठल्याच सदस्याच्या बाबतीत मी माणूसघाणा नाही हे या निमित्ताने स्पष्ट करतो. साहेब त्याबद्दल काहीच वाद नाही. पण तुमचा नाव कसनुसं वाटत. राग मानू नये.

अतिशय म्हणजे अतिशयच सुंदर फोटोज... जायला नक्कीच आवडेल.. अवांतर : आमचा लेह-लद्दाखचा ट्रेक बारगळल्याचं प्रचंड दु:ख होतंय राव हे फोटोज पाहून...

आवडली छायाचित्रे ... छायाचित्रांच्या अधे मधे खुसखुशित प्रवासवर्णन असते तर अजुन बहार आली असती. मला काही सुचना कराव्याश्या वाटतात... पहा पटल्या तर... १ - पर्फेक्टली एक्स्पोज्ड.. त्या ट्रकला रस्त्याच्या सुरुवातीला पकडले असते तर माझ्या मते फ्रेम मधे येतोय असे वाटले असते.. २. क्षितीजसमांतर नाहिये... मुद्दाम तसाच घेतलाय का? ३. घाटावर काही विषय असते तर अजून छान वाटला असता.. घाट बराच ओकाबोका वाटतोय... ढगांचे नाट्य छान पकडलेय.. ४. ते स्तूप आले असते तर... ढग सूंदर.. डोंगर तितकासा बरा वाटत नाहिये फ्रेम मधे... ५. ऊन सावलीचा छान खेळ.. खालचा उजवीकडचा डोंगर फ्रेममधे नको हवा होता. तो नाहिये अशी कल्पना करून पहा.. अजुन छान भासेल.. ६. पँगाँग लेक- फ्रेमिंग मस्त.. ऑटो-बॅलन्स चा थोडा घोळ वाटतोय.. डोंगर निळे आलेत. बर्फावरती फोकस करून एक्स्पोजर मीटर केले होते का? ७. सॅड ड्यूनस छान ... खालच्या वायर्स .. वरची गाडी/माणसे नसती तर... ८. वाळवंट छान.. माणसांच्या प्रतिमा मस्त घेतल्यात.. ओवरएक्स्पोज्ड डोंगर वगळता मस्त फ्रेम. ९. कवटी डोंगर मस्त आलाय .. फ्रेमच्या तळाचा दगड्मातीचा भाग वगळला असता तर उत्तमच.. १०. मला सर्वात आवडलेली फ्रेम... बघणार्‍याची नजर बरोब्बर हिमाच्छादीत शिखरांकडे जातेय... एक मनुष्याकृती असती त्या पर्वतांकडे पाहणारी तर दुग्धशर्करा योग... माफ करा... तुमच्या प्रत्येक छायाचित्रांत मी काही ना काही तरी सुचवलेय... मी ही एक हौशी छायाचित्रकार असल्याने राहावले नाही.. माझ्या मते तुम्ही क्लिक करायच्या आधी पूर्ण फ्रेम कॅमेर्‍याच्या चौकटीतून नीट पाहीलीत तर खूप सुरेख चित्रांची मालिका मिळेल ... पुढच्या सफरीसाठी आणि क्लिक्लिकाटासाठी शुभेच्छा...

In reply to by मर्द मराठा

आपल्या समीक्षेबद्दल धन्यवाद. मी एक साधा फोटो काढणारा प्रवासी आहे. माझा कॅमेराही साधाच आहे. एसएलआर नसल्यामुळे जे फ्रेममधे दिसतं तेच फोटोत येईल याची शाश्वती नाही. तरी तुम्ही दाखवलेल्या चुका १००% पटल्या. त्या सुधारण्याचा प्रयत्न करीन. --- तिरशिंग

येकदम ज ब र्‍या द स्त ! फटू खूप आवडाले. कवटी डोंगराचा फटु तर लै भारी. ह्या विषयी अधिक माहिती देता येईल काय ?

फोटो छानच आहेत, तुम्ही जेव्हा तेथे गेलात तेव्हा तुम्हाला काय वाटले, काही वेगळे अनुभव आले का? कारगिल कडून येणारा रस्त्यावर असताना नक्कीच काही वेगळी भावना मनात आली असेल, त्या वाटेने जाताना भारतीय जवानांचा कॉनवॉय दिसला का? त्यांना सॅल्युट करावासा वाटला का? असे काही अनुभव शेअर केले असते तर फोटोंचा आणखी आनंद मिळाला असता... स्वाती