खेकड्याच सुकं (क्रॅब मसाला)

गणपा's picture
गणपा in पाककृती
6 Aug 2011 - 4:37 pm

श्रावण लागलाय पण आपण काय तो पाळत नाही. श्रावणात म्हावरं स्वस्त होतं अशी एक दंत कथा आहे. हल्ली म्हणे आपल्याकडे शाकाहार वाढु लागला आहे असं कुठल्याश्या एका सर्वेक्षण करण्यार्‍या कंपनीने शोध लावला. सगळ्या अफवा आहेत.... सालं जर हे खर असतं तर आज बाजार स्वस्त नसता झाला? मटण ३०० रु किलोवर पोहोचल असत?
असो. सध्या भारतात नसल्याने त्याची प्रत्यक्ष झळ बसत नाहीये. त्यातच काल बाजारत खेकडे (स्वस्तात) मिळाल्यावर श्रावण वगैरे काही न पहाता अस्मादिकांनी ते लगेच घेतले.
काल शुक्रवार होता. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठायचं नव्हत. त्यामुळे निवांत वेळ ही हाताशी होता, म्हणुन खेकड्याचे सुके करायचा बेत केला.

साहित्य :

१/२ चमचा हळद.
१ मोठा चमचा (प्रत्येकी) लाल तिखट, भाजलेली जिरे पुड, धणे पुड, गरम मसाला.
अर्धा-पाऊण इंच दालचीनी.
१ लहान चमचा काळीमीरी.
४-५ लवंग.
२ मोठे कांदे बारीक चिरेलेले.
२ मोठे टॉमेटो बारीक चिरलेले.
१ मोठा चमचा आल लसुण पेस्ट.
१ मोठा चमचा टॉमेटो पेस्ट.
२-३ हिरव्या मिरच्या.
कढीपत्ता.
तेल, मीठ चवीनुसार .

खेकडे साफ करुन घेतलेल.

कृती :

कडकडीत तापवलेल्या २ मोठे चमचे तेलात लवंग, काळिमिरे आणि दालचीनी परतुन घ्यावे.
नंतर मिरची , कडीपत्ता आणि कांदा टाकुन, कांदा पारदर्शक गुलाबी होई पर्यंत परतावा.
मग त्यात आल लसुण पेस्ट टाकुन कांदा चांगला परतवुन घ्यावा.
उरलेले सगळे मसाले टाकुन चांगल परताव. वाटल्यास किंचीत पाणी टाकाव. मसाला कलथ्याने सतत परतत रहाव..

मसाल्याला बाजुने तेल सुटु लागलं की मग टॉमेटो टाकुन चांगल मिक्स करावं.
टॉमेटो गळुन गेल्यावर मग त्यात टॉमेटोची पेस्ट टाकुन परताव.

तयार मसाला परत तेल सोडु लागला की मग त्यात साफ केलेले खेकडे सोडावे.
थोडसं पाणी टाकुन वरुन झाकण ठेवाव आणि १० मिनिटे वाफ द्यावी.
खेकड्याच सुक हव असेल मध्यम आचेवर पाणी आटे पर्यंत शिजत ठेवावे. रस्सा हवा असल्यास ताबडतोब आच बंद करावी.

वरुन कोथिंबीर पेरुन आणि लिंबू पिळुन आडवा हात मारावा.
पण जर फुरसत असेल तेव्हाच याच्या वाटे जावे. आणि हाणुन झाल्यावर मस्त ताणुन द्यावी.

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

6 Aug 2011 - 4:44 pm | प्रियाली

खेकडे म्हणजे जीव की प्राण. कालच रेड लॉब्स्टरमध्ये जाऊन खेकड्यांच्या तंगड्या तोडल्या तरीही आज सक्काळी पुन्हा खेकडे पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटलेच.

पुढच्यावेळी नक्की खेकड्याचं सुकं.

मितभाषी's picture

6 Aug 2011 - 4:51 pm | मितभाषी

तोंपासू......
गणपाशेठ लै भारी. आहाहा....

(ओढ्याला खेकडे भाजून खाणारा) भावश्या.

सानिकास्वप्निल's picture

6 Aug 2011 - 5:20 pm | सानिकास्वप्निल

आपल्याच्याने पण काही श्रावण पाळला जात नाही, हे बघून तर तोंपासू, लगेच खावसं वाटतयं :)

विनायक प्रभू's picture

6 Aug 2011 - 6:03 pm | विनायक प्रभू

मस्त पाकृ.
बर बर.
शुकरवार च्या तपशिला बद्दल धन्यवाद.
ते हो ते शुकरवारी सकाळी उठत नाही तुम्ही.

सुनील's picture

7 Aug 2011 - 7:31 am | सुनील

ते हो ते शुकरवारी सकाळी उठत नाही तुम्ही.
मास्तर, लेखातील मूळ वाक्य असे आहे - काल शुक्रवार होता. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठायचं नव्हत.

बाकी पाकृ आणि फोटो पाहून तोंपासु...

इरसाल's picture

6 Aug 2011 - 7:18 pm | इरसाल

!! छळ मांडीयेला मिपावरी बाई !!
!! श्रावणी खेकडे खाती हो !!

जल्ला कधी बघित्लाव काय श्रावणाचा पयला दिस रैवार. कसा कंट्रोल व्हणार, खाल्ला मटन.मंग काय करुचा. सोमवारपासून श्रावण पाल्तोय इतकाच.

खेकडे बाकी डिझायनर दिसतात.

एकट्यानेच सगळे हादडल्याचा अतितीव्र निषेध.

नवीन प्रकार....माहिती बद्दल धन्यवाद

चिंतामणी's picture

6 Aug 2011 - 8:18 pm | चिंतामणी

(स्वगत-) या माणसाची मिपावरून हकालपट्टी करायचा प्रस्ताव मांडावा का???

श्रावण महीन्यात (सचीत्र) कहाण्या सांगायचे सोडुन सचीत्र पाकृ टाकुन मानसीक अत्याचार केल्याबद्दल तीव्र निषेध.

जाता जाता- नेहमीप्रमाणे फटू आणि पाकृ जबरदस्त. अजून पर्यन्त खेकडे खाउन बघीतले नाहीत. आपल्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीन म्हणतो. कधी येताय गणपाशेठ????????

चंबा मुतनाळ's picture

7 Aug 2011 - 10:13 am | चंबा मुतनाळ

आपल्याला कुठल्या 'सचित्र' कहाण्या ऐकाव्याशा वाटताहेत बरें श्रावणांत??

चिंतामणी's picture

7 Aug 2011 - 1:22 pm | चिंतामणी

ज्यांच्या पर्यन्त ज्या भावना पोहोचवायच्या होत्या, त्या पोचल्या आहेत.

आपुलकीने चौकशी केल्याबद्दल धन्स.

तो.पा.सु. गणपा. मस्तच एकदम.

वा वा वा... खेकडे म्हणजे एकदम fav.... तोंपासु.. :)

संदीप चित्रे's picture

7 Aug 2011 - 1:19 am | संदीप चित्रे

नेहमीप्रमाणेच !

चित्रा's picture

7 Aug 2011 - 4:28 am | चित्रा

नेहमीप्रमाणेच.

शुचि's picture

7 Aug 2011 - 8:07 am | शुचि

शेवटचा फोटो कातील!

मयुरा गुप्ते's picture

7 Aug 2011 - 10:22 am | मयुरा गुप्ते

जबरी! खेकड्याचं सुकं.. छानच दिसतोय प्रकार.

आम्ही खेकडे आणले की आधी नांग्या तोडुन त्याचा रस काढुन घेतो..हा हि प्रकार छान ....

खेकड्या मध्ये कढीपत्ता घातला होता का? का नुसताच फोटु साठी ठेवलायं? काही आंन्ध्रवाले, केरळीयन चिकन् मध्ये कढीपत्ता घातलेला पाहीला आहे.

बाकी नेहमीप्रमाणेच +१.

----मयुरा.

नंतर मिरची , कडीपत्ता आणि कांदा टाकुन, कांदा पारदर्शक गुलाबी होई पर्यंत परतावा.

हो कांद्याला फोडणी देताना कढीपत्ता टाकला होता. :)

पप्पु अंकल's picture

7 Aug 2011 - 12:02 pm | पप्पु अंकल

गणपा भाऊ या कावेर्‍या आहेत अस वाटतय
बाकी पाकृ एकदम मस्तच.......

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Aug 2011 - 12:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवा या गणपाला क्षमा कर. माझ्या सारख्या श्रद्धाळू आणि धार्मिक माणसाला श्रावनात खेकड्यांचा विचार नुसता मनात येणं म्हणजे पाप आहे. अशा वेळी सुके खेकड्याचे फोटो पाहिल्याने नर्काकडे जाणारी पायवाट मला दिसू लागली. आहे ;)

-दिलीप बिरुटे
(धार्मिक)

कच्ची कैरी's picture

7 Aug 2011 - 12:57 pm | कच्ची कैरी

आमच्यकडुनही काही श्रावण पाळला जात नाही तेव्हा आम्हीही फक्त श्रावण सोमवारच पाळतो .आणि ही पाकृ.बघुन तर कधी एकदा खेकडे खाइल अस झालय .

श्रावण लागलाय पण आपण काय तो पाळत नाही

नविन कॉकटेल श्रावणात टाकायचे नाही असे ठरवले होते, पण आता....

- (श्रावण पाळावा का असा (फक्त) विचार करणारा ) सोकाजी

चिंतामणी's picture

7 Aug 2011 - 2:38 pm | चिंतामणी

मग विचार करणे सोडुन देउन कृती कर. (बहुधा काल तु कृती केली असावीस असा दाट संशय आहे.;))

असो. या संदर्भात नुकताच एक sms आला होता. तुझ्यासाठी येथे ठेवतो.

डॉ. विजय मल्ल्या यांचे आवाहन

कुत्रा पाळा

मा़ंजर पाळा

कोंबड्या पाळा.

पाहीजे तर गाढवसुध्दा पाळा.

पण.........
.

.
.
.
.
.
.
.
श्रावण नका पाळू.
:D

सोत्रि's picture

10 Aug 2011 - 11:11 am | सोत्रि

कृती तर मी रोजच करतो चिंका :)

दरवर्षी "ह्यावेळी(तरी) श्रावण पाळावा का?" असा फक्त विचार करतो ;)

- (कृतीशील) सोकाजी

प्रभो's picture

7 Aug 2011 - 11:15 pm | प्रभो

भारी रे!!

विशाखा राऊत's picture

8 Aug 2011 - 2:51 pm | विशाखा राऊत

कुर्ल्या :) अहाहा.. बाकी काहिहि लिहणार नाही सारखे सारखे..

धमाल मुलगा's picture

8 Aug 2011 - 3:04 pm | धमाल मुलगा

क्काऽय ते एकेक फोटू होऽऽ....बघणार्‍याच्चं जीव र्‍हातंय कश्श्याऽला ओऽऽ...फाट्टकन गेलंच की बगा.

असो.
पाककृती बरी आहे. चांगलं जमतंय आपल्याला रांधायला. छान! आमचे पेठकरकाका, खेकड्याचे सूप फार म्हणजे फार छान बनवतात हों! (ही आपली गणप्यावरची खुन्नस! पेठकरकाकांकडे सूप हाणून झालेलं आहे. हा गणप्या काय भेटतही नाही, आणि रांधून जेऊही घालत नाही. त्यामुळं खडूस प्रतिक्रिया द्याव्यात हेच बरं. ;) )

पल्लवी's picture

8 Aug 2011 - 7:54 pm | पल्लवी

...अ‍ॅंड धिस सुक्का ऑफ खेकड्या'ज..एकदम सूं हायकल्लास !

धनंजय's picture

10 Aug 2011 - 12:04 am | धनंजय

मस्त!

(मी मात्र जिवंत खेकडे आणल्यावर रोवळीत विसळून, १० मिनिटे वाफवून, मीठ-मसाला शिंपडून पटापट खातो. मागच्या वेळी एक खेकडा रोवळीतून खसाखसा उडी मारून माझ्या हाताला कच्चकन चावला! अख्खे वाफवायचे ठरवले म्हणजे असा अपघात व्हायची शक्यता अगदीच क्वचित. पण इथे खेकडे शिजवण्याआधी साफ करायचे आहेत... साफ करण्यापूर्वी खेकडा मारायची तुमची पद्धत काय?)

शुचि's picture

10 Aug 2011 - 2:42 am | शुचि

काहीजण उकळतात.
काहीजण फ्रीझरमध्ये ठेवतात.
___________________

@ गणपा - फोटो अप्रतिम आहे!!!!

गणपा's picture

10 Aug 2011 - 4:28 am | गणपा

काहीजण फ्रीझरमध्ये ठेवतात.

हीच पद्धत आमलात आणतो.
(कोल्ड ब्लडेड मर्डरर)- गणा

धनंजय's picture

10 Aug 2011 - 9:26 pm | धनंजय

धन्यवाद, शुचि आणि गणपा

पिवळा डांबिस's picture

13 Aug 2011 - 11:57 am | पिवळा डांबिस

ए बिका? हा गणप्या तुझ्याच हापिसात आहे ना?
मग आमच्या वतीने त्याच्या कानाखाली एक जाळ काढ रे........
:)
कायतरी नसती आठवण काढून देतो!!!!!

आता उद्या उठून आधी कुर्ल्या आणायला पाहिजेत!!!!
वरील वाक्य आम्ही फक्त मनात काय म्हंटलं, पण आमच्या सीकेपी कुटुंबाला ते बरोब्बर ऐकू गेलं...
मसाले वाटायला सुरवात झाली सुद्धा....
यालाच टेलिपथी म्हणतात....
:)
बाकी गणपा एकदा माझ्याकडे येच!
तुला तू बापजन्मात खाल्ल्या नसशील अशा कुर्ल्या खायला घालतो....
कॅलिफोर्नियात रहाण्याच्या हा अजून एक फायदा!!!!
;)

आमचे ग्रह तारे तुमच्या कॅलिफोर्नियाच्या दिशेने केव्हा फिरतील तेव्हा फिरतील.. पण तोवर काकुंनी केलेक्या कुर्ल्यांचा फोटु तरी द्या धाडुन.
तुर्तास त्यावरच समाधान मानु. :)

परिकथेतील राजकुमार's picture

13 Aug 2011 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार

अजून चार पाच अशाच पाकॄ दे रे ;)

गवताळ
परा

साती's picture

14 Aug 2011 - 2:24 am | साती

मस्तच!
श्रावण सार्थकी लागला माझा.

आम्ही खेकडे आणले की आधी नांग्या तोडुन त्याचा रस काढुन घेतो

आम्ही पण.

मुक्त विहारि's picture

12 Jan 2012 - 4:16 pm | मुक्त विहारि

लाळ गळत आहे.......ती थाम्बली की मग लिहितो.......

मालोजीराव's picture

12 Jan 2012 - 5:44 pm | मालोजीराव

जल्ला फोटू का निसत नाय रं हितं ?