ड्रीमकॅचर
काळपट ओट्यावरून
पाण्याचा हात फिरवून झाल्यानंतर
रात्रीच्या अंधारात तिने पाहिले
खिडकीबाहेर ते स्वप्न
खुणावत अजून उभेच होते -
**
पलंगावर टाकून
आपले श्रांत क्लांत अंग
भिंतींवरून सरकणार्या
गाड्यांच्या सोबतीने झोपण्याआधी
तिच्या लक्षात आले
स्वप्न आत येऊ पाहत होते
लगबगीने
**
उठून तिने स्वप्नांची
काढली गाळणी ठेवणीतली
लटकावून दिली
बेडरूममधील खिडकीवर.
कुशीवर मग वळून तिला
झोप कधी लागली कळलेच नाही.
छान
स्सही रे स्सही.......!
चित्र चांगलं आलय...
छान!
वाह!
क्या बात है
कल्पना आवडली.
व्वा !
सही काव्य आहे
मस्त कविता.
उत्स्फुर्त व सहज झालेली कविता
+१
आवडली.
कल्पना
धन्यवाद.
हम्म... कविता आवडली. काय
कविता छान.. स्वप्नांची गाळणी
मस्त! कल्पना छान आहे.. आवडली
मस्त कल्पना!
छान
कविता
छान
छान
धन्यवाद
छान कविता... कुंभकर्णा सारखे
सुंदर कल्पना. गाळणीचे रूपक
बंदा रुपया आहे दि कविता.
कविता म्हणून इतके दिवस हा
वा!
सुन्दर कविता.
सर्वांचे