एक स्वप्न प्रवास.(५)
लेखनप्रकार
या पूर्वीचा दुवा एक स्वप्न प्रवास (१) http://misalpav.com/node/1699
एक स्वप्न प्रवास (२) http://misalpav.com/node/1712
एक स्वप्न प्रवास.(३) http://misalpav.com/node/1785
एक स्वप्न प्रवास.(४) http://misalpav.com/node/1797
प्रिय ऍन्.........मला आता कळत नाही की मी तुझ्या स्वप्नात कसा येउ......स्वप्नात दिलेले वचन पाळणार्या राजा हरिश्चन्द्राच्या देशातला मी...तुला चॆट् करताना दिलेले "स्वप्नात येउन भेटेन " हे वचन मला पूर्ण करायलाच हवे. तरच राजा हरिश्चन्द्राचे नाव पुन्हा घेता येईल्.
लोक राजा हरिश्चन्द्राच्या नन्तर राजा शिबी च्या नन्तर वचन पाळणारा म्हणुन् माझे नाव घेतील्.
आता प्रश्न होता की तुझ्या स्वप्नात यायचे कसे. तू मलेशियात रहाणार आणि मी भारतात. मलेशियावर एके काळी भारतिय राजा महेन्द्रविक्रान्ताने राज्य केले होते ह इतिहास आहे म्हणुन मला तेव्हढे तरी बरे होते.विमानाने / समुद्रमार्गे / इ मेल ने तुझ्या पर्यन्त् पोहोचण्याचे स्वप्नातले सर्व मार्ग आता मला बंद होते.त्यांचा वापर करुन झाला होता. आता काहीतरी वेगळा मार्ग पहायला हवा होता.
कोणत्याही तांत्रीक गोष्टींवर अवलंबुन न रहाता लोक पूर्वी वापर करायचे तसला काहीतरी मार्ग आता वापरायला हवा.
काय करु शकतो......काय करु शकतो......काय करु शकतो......असे केले तर? इथुन मलेशिया पर्यन्त् चालत गेलो तर ? छे: तिथपर्यन्त चालत जायला केवढा वेळ लागेल. शिवाय पाय दुखतील ते वेगळेच. पाय दुखले तर दाबुन घ्यायला पुन्हा सदाशिव पेठेपर्यन्त उलटे चालत यावे लागेल.
पोहत गेले तर ? हरकत नाही.पण मधे विषुववृत्त लागते. तेथे पृथ्वीची फ़िरण्याची गती सर्वात जास्त असते. त्यामुळे फ़ार जोर करुन पोहावे लागते म्हणे. हे जरा अवघडच जाइल.
नाहीतर असे करुयात का? आपण स्वत:ला बाटलीत बंद करुन घेउ आणि ती बाटली समुद्रात फ़ेकुयात.......पण समजा ती बाटली भरकटत इतर कोठेतरी गेली आणि हजार पाचशे वर्षानन्तर कोणाला सापडली तर तो मला बाटलीतला राक्षस समजेल. आणि उगाचच् राजवाडा बांधुन मागेल. तुला भेटणे दूरच राहील. बंद बाटलीतुन प्रवास करणे तेवढे प्रॆक्टिकल वाटत नाही.
अरे.आपण कसे जायचे हा विचार करण्यापेक्षा या पेक्षा लौकर झोपायचे याचा प्रयत्न करायला हवा.
हल्ली "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" हे पुस्तक वाचुन ही झोप येत नसे त्यापेक्षा काहीतरी स्ट्रॊन्ग् उपाय करायला हवा म्हणुन मी मनोगत वर गेलो अहो आश्च्रर्यम.... तिथले घनगंभीर विषय / अनाकलनिय विषयावरच्या निरर्थक चर्चा आणि इतिहासकारांचे बुद्धी जडावणा-या तर्कांचे जंजाळ वाचुन मला लगेच झोप् आली .(झोपण्यापूर्वी मी ठरवलेसुद्धा की आता हॊस्पिटल मधल्या भूल स्पेश्यालिष्टाला हा उपाय सूचवायचाच.)
मी तुझ्यापर्यन्त कसे पोहोचायचे हाच विचार करत होतो.मी बस ने तुझ्या स्वप्नात यायचे ठरवले. बस चे बूकिंग करण्यासाठी मी तिकिट खीडकी पाशी गेलो. पलिकडल्या माणसाने विचारले की कधीचे तिकिट पाहिजे.वैषाख महिन्याची सगळी तिकिटे संपली होती. ज्येष्ठ सप्तमी पर्यन्त बूकिंग्स चालु होती.आषाढाच्या पहिल्या दिवसाचे तिकिट चालेल का ?
आषढाचा पहीला दिवस............ आषाढस्य प्रथम दिवसे. एकस्मीन यक्ष: .......मला अचानक कालीदासाचे मेघदूत आठवले. कालीदासाच्या मेघदूता मधला यक्ष ढगाला आपला दूत बनवुन प्रेयसीला संदेश पाठवतो.....आपण ही तसेच काहीसे केले तर?
त्याने मेसेज पाठवला आपण ढगावर बसुन जाउ शकतो की?
मी त्वरीत तिकिट खीडकी पासुन परत फ़िरलो.घरी येउन गच्चीवर गेलो. आकाशात पाहीले तर औषधालासुद्धा ढग नव्हता.आता ढगाचे औषध कसे करतात हे कोणालाच माहीत नाही पण अमूकतमूक औषधालासुद्धा नव्हता असा वाकप्रचार आहे म्हणुन म्हाणायचे इतकेच.
हा तर काय म्हणत होतो. .आकाशात पाहीले तर औषधालासुद्धा ढग नव्हता
आता ढग शोधायचा कोठे ? हां आठवले.बारामतीला कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी डॊप्लर रडार बसवले होते. त्या रडार ला समजते म्हणे ढग कोठे आहेत ते.मी तडक त्या कार्यलायत गेलो. त्याना विचारले की रडार कोठे आहे ? त्यावर डॊप्लर रडार हल्ली ट्वेन्टी ट्वेन्टी मॆचेसचा पावसाने विचक होऊ नये म्हणुन वापरले जाते.असे समजले.
मी मनाचा हिय्या करुन त्याच कार्यलायत "ढग आणा नाहीतर आमरण उपोषणाला बसेन अशी धमकी दिली. माझ्या धमकी चा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तेथिल लोकानी उलट माझ्या सत्कारासाठी हार फ़ुले आणायला माणुस पाठवला. उपास करणारा भारतीय माणुस हा जगातील अन्नधान्य टंचाई चा प्रश्न सोडवण्यास मदत करतो म्हणुन् माझा सत्कार करणार होते ते. सबसे तेज वाहीनी चा माणुस तर असे लोक सापडावे म्हणुन लोकाना दिवसाला अर्धा किलो तांदूळ् अशा बोलीवर रोजंदारीवर माणसे आणुन त्यांच्या उपास करणारे भारतीय म्हणुन रोज मुलाखती घेत होता.
मला इंटरेस्ट हार फ़ुलात नव्हता. तर ढगात होता. ढग तर मिळवायलाच हवा होता. मुम्बैत पूर्वी कापड गिरण्या होत्या त्यांच्या धूराड्यामुळे हमखास ढग सापडायचे. दादर च्या पुढे परळ गिरणगाव येथे तर कोणत्याही वेळी ढग असायचे.पण गिरण्यांचे मॊल झाल्यापासुन तेथले हवामन स्वच्छ झाले आणि ढग नाहीसे झाले होते.
ढ्ग आणायला मी "कारे मेघा कारे मेघा पानी तो बरसा" वगैरे फ़िल्मी गाणी म्हणुन पाहीली पण ती सगळी आकाशात असलेल्या ढगांना उद्देशुन होती. नसलेल्या ढगाला बोलावण्यासाठी एकही गाणे सापडले नाही. शेवटी मी "येउन येउन येणार कोण ढगाशिवाय आहेच कोण असे ओरडुनही पाहीले".
हिन्दी गाणी नाहीत म्हणुन् मी मराथी गाण्यांचा शोध घेतला. पन तरीही निराशाच. मराठीतही ढगांना बोलावण्यासाठी एकही गाणे नव्हते. "येरे येरे पावसा....." हे पावसाला बोलावण्याचे गाणे. पण त्या गाण्यात मिळणारा पैसा खोटा असतो हे ठाऊक झाल्यापासुन पाउसही गाने ऐकुन येत नाही.उलट पावसाची कशी फ़जीती झाली म्हणुन हजर असलेले दोन चार ढग कडाडकन टाळ्या वाजवतात इतकेच्.
ढग कोठे मिळतील याचा विचार करत असताना मला कोणीतरी सांगितले की जेथे क्रिकेट मॆचेस् असतात तेथे पावसाचे ढग असतात. ही परिस्थिती आठ दहा वर्षापूर्वी होती. आता मॆचेस एकाचवेळेस इतक्या ठिकाणे असतात की नक्की कोठी जायचे असा ढगांनाच प्रश्न पडतो.शिवाय पाउस पाडण्या अगोदर डकवर्थ-लुइस चा नियम समजून घ्या असा आदेश काढला गेला तर काय ? या धास्तीने ढगानी मॆचला येणेच सोडुन दिले होते.
हल्ली मी "प्रयोगशाळेत ढग" तयार करतात हे ऐकुन होतो. तसा प्रयोग पहायला मी माझ्या शाळेत गेलो. तेथे तयार झालेला ढग इतका छोटा होता की त्यावर बसणे म्हणजे त्या ढगाला बालकामगार म्हणुन वागवल्याची मला शिक्षा झाली असती.
अचानक आठवले की आमच्या ऒफ़िस मध्ये सिगारेटी फ़ुंकण्यासाठीची जागा रामसे बंधुंच्या सिनेमात असते तशा धुक्याने नेहमी भरलेली असते. तेथे ढग असू शकते.
मी सिगारेट लाउंज मधे गेलो. पण तेथले धुके आपलाच तोरा सांभाळत होते. डॊट नेट कन्सल्टंट ने सोडलेला धूर जावा प्रोग्रामर ने सोडलेल्या धूरात मिसळायला तयार नव्हता. एस् ए पी कन्सल्टन्ट् ने सोडलेला धूर ओरॆकल ऎप्स वाल्याच्या धूराला आपला म्हणायला तयार नव्हता.
कॊल सेंटर वाल्यांचे धूर तर तीन वेगवेगळ्या पातळ्यात विभागले होते. अमेरिकन ऎक्सेंट वाल्याने सोडलेला धूर हा ब्रिटीश ऎक्सेंट वाल्याने सोडलेल्या धूरापेक्षा दोन इंच वरच रहात होता.
ढग मिळवण्यासाठे करावे लागणारे हे सगळे उपद्व्याप पाहुन मी वैतागलो.
आणि वैतागुन म्हणालो सुद्धा "जाउदे सालं ...तुझ्या स्वप्नात जायचं....गेलं ढगात"
एवढे बोलतो न बोलतो तोच मला जाणीव झाली....मी खरंच ढगात गेलो होतो.
(क्रमश:)............................................
वाचने
5905
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
हम्म्म... हे
विजूभाऊ
मस्त स्वप्नप्रवास........
मस्त!
आ तो शूं मज्जानुं उपाय!!!
In reply to आ तो शूं मज्जानुं उपाय!!! by पिवळा डांबिस
ए दांबिसअंकल,
In reply to ए दांबिसअंकल, by चतुरंग
अरे तमे सूं वार्ता करे छो, चतुरंग!!
हे बेष्टच